Join us  

लोणच्याची बरणी खूपच तेलकट झाली आहे ? एक सोपी ट्रिक तेलकटपणा व मसाल्यांचे डाग होतील गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2023 11:42 AM

How To Clean Dirty Pickle Glass Bottle Without a Brush : लोणच्याच्या बरणीत असलेल्या अतिरिक्त तेल व मसाल्यांमुळे ही बरणी अतिशय चिकट व तेलकट होते, अशी बरणी स्वच्छ करण्याचा एक सोपा उपाय...

'लोणचं' हा भारतीय थाळीमधील अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. थाळीतील एका बाजूला कोपऱ्यात याचे स्थान असले तरीही लोणच्याशिवाय जेवण अपूर्णच आहे. जेवताना सगळ्या पदार्थांसोबत तोंडी लावायला काहीतरी चटकमटक हवे म्हणजे जेवणाला चव येते. यासाठीच ताटात कितीही पंचपक्वान्न असली तरीही लोणच्याचे विशेष महत्व असतेच. वेगवेगळ्या प्रकारचं घरगुती लोणचं उन्हाळ्यांत बनवून ते वर्षभरासाठी साठवून ठेवणे ही भारतीय परंपरा आपल्याकडे खूप पूर्वीपासून सुरु आहे. आपल्या घरातील वयस्कर, अनुभवी व्यक्ती हे लोणचं कस बनवायचं, वर्षभर ते खराब न होता कसं साठवून ठेवायचं याच्या काही खास टिप्स आपल्याला कायम सांगत असतात. 

चटकदार, चमचमीत, झणझणीत लोणचं खायला कोणाला आवडणार नाही. लोणच्याचा स्वाद एकदम चटपटीत असतो आणि रोजच्या जेवणाची चव देखील चटकन वाढवतो. लोणच्यामध्ये अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो ज्यामुळे लोणच्याची चव अधिक चविष्ट लागते. ही लोणची वर्षभर चांगली टिकून राहावी म्हणून याची खूप काळजी घेतली जाते. जसे की लोणच्याच्या बरणीला ओला हात लावू नये, लोणचं चांगले टिकून राहण्यासाठी त्यात भरपूर तेल, मीठ घातले जाते, लोणचं काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीतच व्यवस्थित साठवले जाते. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेतो. परंतु हे लोणचं खाऊन संपल्यानंतर त्याची तेलकट बरणी स्वच्छ धुणे हा खूप मोठा टास्कच असतो. बरणीत असलेल्या अतिरिक्त तेलामुळे बरणी खूपच तेलकट आणि चिकट होते. अशी बरणी स्वच्छ करण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात(How To Remove Oil Stains From Dirty Pickle Glass Bottles Without Harsh Washing). 

लोणच्याची तेलकट बरणी स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक... 

लोणच्याची बरणी लोणच्यामध्ये असणाऱ्या अतिरिक्त तेल, मसाले आणि मीठ यामुळे खूप खराब व चिकट होते अशी बरणी धुणे आणि आतून व्यवस्थित स्वच्छ करणे अतिशय अवघड होऊन बसते. अशावेळी करता येईल असा एक सोपा उपाय... 

अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करा १० मिनिटांत, सोलापुरी चटणीची पारंपरिक रेसिपी...

१. सर्वप्रथम लोणच्याच्या बरणीमध्ये गरम पाणी ओतून घ्यावे. ही तेलकट बरणी गरम पाण्याने संपूर्ण भरून घ्यावी. 

२. त्यानंतर या बरणीमध्ये डिश वॉश लिक्विडचे ८ ते १० थेंब घालावेत. 

३. आता एक टिश्यू पेपर घेऊन त्या टिश्यू पेपरचे छोटे - छोटे तुकडे करून घ्यावेत हे तुकडे या बरणीमध्ये टाकावेत. 

४. त्यानंतर बरणीचे झाकण गच्च लावून घ्यावे व बरणी हातात घेऊन जोरजोरात खळखळून हलवावी. 

गरमागरम वरणभात आणि तोंडी लावायला जवसाची चटणी, पावसाळ्यात ही पारंपरिक चटणी पोटाला बरी...

पिझ्झासोबत लोणचं कोण खातं? प्रियांका चोप्रा म्हणते नाही मला लोणच्याशिवाय जेवण जात म्हणून...

५. आता एक गाळणी घेऊन या बरणीतले सगळे पाणी गाळून घ्यावे. 

६. यानंतर गरज असल्यांस पुन्हा एकदा डिश वॉश लिक्विड व स्पंजचा वापर करून बरणी स्वच्छ धुवून घ्यावी. 

७. बरणी धुतल्यानंतर स्वच्छ सुती कापडाने पुसून वाळवण्यास ठेवावी. 

अशाप्रकारे आपण लोणच्याची चिकट व तेलकट झालेली बरणी अगदी अगदी चुटकीसरशी न घासता किंवा रगडता कमी कष्ट घेऊन स्वच्छ करू शकतो.

टॅग्स :अन्न