आपल्याकडे बहुतेकदा सकाळच्या नाश्त्याला इडली, डोसा असे पदार्थ आवडीने बनवून खाल्ले जातात. हे पदार्थ बनवायचे म्हणजे त्याचे पीठ व्यवस्थित तयार करण्यापासून ते इडली, डोसा बनवून होईपर्यंत खूप मोठा टास्क एखाद्या गृहिणींपुढे असतो. इडली, डोशाचे पीठ तयार करताना त्यात डाळ व तांदूळ यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे. नाहीतर काहीवेळा हे पीठ फसू शकते. एवढेच नव्हे तर हे पीठ आंबवण्यासाठी ठेवले असता उष्णतेमुळे काहीवेळा हे पीठ गरजेपेक्षा जास्त आंबवले जाऊन आंबट होते(Hacks To Prevent Dosa Batter From Turning Sour).
यामुळे इडली, डोशाची चव बिघडते व आपल्याला हवी तशी इडली व डोसा तयार न झाल्यामुळे आपला हिरमोड होतो. अशावेळी हे पीठ आपण फेकून देतो. परंतु हे पीठ फेकून न देता आपण काही सोप्या ट्रिक्स वापरुन उन्हाळ्यात इडली, डोशाचे पीठ आंबट (How to remove sour taste from idli dosa batter) होण्यापासून टाळू शकतो. इडली डोशाचे पीठ आंबट होऊन खराब होऊ नये यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवू , ज्यामुळे तुमचे इडली, डोशाचे बॅटर आंबट होऊन खराब होणार नाही(tips on how to reduce sourness in dosa batter).
इडली डोशाचे पीठ जास्त आंबट झाल्यास...
१. आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट :- इडली डोशाचे पीठ आंबवण्यासाठी ठेवले असताना काहीवेळा त्या पिठाला खूप जास्त प्रमाणात आंबटपणा येतो अशावेळी आलं आणि हिरव्या मिरचीचा वापर करावा. या आंबट झालेल्या पिठात आले आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातल्यास पिठाला चव येते तसेच पिठाचा आंबटपणाही दूर होतो. यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडस आलं आणि हिरव्या मिरच्या घेऊन त्यात वाटून घ्याव्यात. ही वाटून घेतलेली पेस्ट आंबट झालेल्या पिठात मिक्स करुन घ्यावी. यामुळे आलं आणि हिरवी मिरची या दोन्ही पदार्थांची चव या आंबट पिठाला येईल. फक्त पिठात हि पेस्ट घातल्यानंतर पीठ चांगले ढवळून घ्यावे.
२. साखर किंवा गूळ :- इडली डोशाच्या पिठाचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण साखर किंवा गुळाचा वापर करु शकतो. या दोन्ही पदार्थांमुळे पिठाचा आंबटपणा कमी होतो आणि चवही चांगली येते. परंतु पिठाचा आंबटपणा कमी करण्यासाठी साखर किंवा गुळाचा वापर करताना हे दोन्ही पदार्थ योग्य प्रमाणात वापरावेत नाहीतर इडली डोशाची चव बिघडू शकते. त्यामुळे आधी थोडीशी साखर किंवा गूळ घालून पिठाची चव घ्यावी. प्रमाण कमी वाटल्यास पुन्हा साखर किंवा गूळ घालून पीठ ढवळून घ्यावे.
कारल्याची कुरकुरीत भजी खाऊन तर पाहा, भर पावसात कारल्याची भजीही लागतील खमंग...
३. तांदुळाचे पीठ किंवा रवा :- पिठाचा आंबटपणा कमी करण्यासाठी पिठात थोडे तांदुळाचे पीठ किंवा बारीक रवा घातल्याने त्याचा आंबटपणा कमी होतो. आणि इडलीला थोडा घट्टपणाही येतो. इडलीचे पीठ आंबट झाले असेल तर त्यात थोडे तांदुळाचे पीठ किंवा रवा घातल्यास आंबटपणा कमी होतो. त्यामुळे पिठाला थोडा घट्टपणाही येतो यामुळे इडल्या छान, मऊ होतात तसेच डोशा कुरकुरीत आणि क्रिस्पी होण्यास मदत मिळते.
रात्री उरलेल्या शिळ्या पुऱ्या दुसऱ्या दिवशी सकाळीही राहतील ताज्या - मऊ, ४ सोप्या टिप्स...
४. ताजे फ्रेश पीठ वापरा :- जर इडली डोशाचे पीठ खूप आंबट झाले असेल तर आपण त्यात ताजे फ्रेश पिठ तयार करुन मिक्स करु शकता. यामुळे पिठाचा आंबटपणा कमी होतो. इडलीचे पीठ खूप आंबट झाले असेल तर त्यात थोडे ताजे पीठ घालून आंबटपणा कमी करता येतो. ताजे फ्रेश पीठ घातल्याने आंबट चव बॅलेन्स करता येते आणि इडलीची चवही चांगली लागते. या पद्धतीमुळे इडलीचा मऊसर पोतही कायम राहतो.
५. पीठ तयार करताना थंड पाण्याचा वापर करा :- इडली डोशाचे पीठ तयार करताना आपण पाण्याचा वापर करतो. हे पीठ तयार करताना जर आपण बर्फाच्या थंड पाण्याचा वापर केला तर पीठ अगदी परफेक्ट तयार होते. बर्फाचे थंडगार पाणी घातल्याने पिठाचा पोत सुधारतो. त्याचबरोबर पिठाला गुळगुळीत आणि मलईदार टेक्श्चर येण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. हे पीठ तयार करताना नॉर्मल टेम्परेचर असणाऱ्या पाण्याचा वापर केल्यास या बॅटरमध्ये बॅक्टेरियाची वाढ लवकर होते त्यामुळे पीठ लवकर खराब होते. याउलट जर आपण यात थंड पाण्याचा वापर केल्यास बॅक्टेरियाची वाढ रोखली जाऊन पीठ दीर्घकाळ स्टोअर केले तरीही ते खराब न होता चांगले टिकून राहते.
ब्रेड शिळा झाला म्हणून फेकून देता? ३ भन्नाट ट्रिक्स, शिळा ब्रेड होईल फ्रेश - आणि खाताही येईल पटकन...