उन्हाळ्याच्या दिवसांत काही पदार्थ बऱ्याच काळासाठी टिकवून ठेवायचे म्हणजे खूप कठीण काम असते. काहीवेळा तर काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवून देखील लगेच खराब होतात. उन्हाळ्यात पदार्थ नासण्याचे प्रमाण हे इतर ऋतुंपेक्षा अधिक असते. या ऋतूंमध्ये दूध, दही, किंवा काहीवेळा शिजवलेले अन्नपदार्थ वाढत्या उष्णतेमुळे नासण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात वारंवार अन्नपदार्थ नासण्याच्या समस्येमुळे अन्नाची खूप मोठ्या प्रमाणावर नासाडी होते.
आपल्याकडे बहुतेकदा सकाळच्या नाश्त्याला इडली, डोसा असे पदार्थ आवडीने बनवून खाल्ले जातात. हे पदार्थ बनवायचे म्हणजे त्याचे पीठ व्यवस्थित तयार करण्यापासून ते इडली, डोसा बनवून होईपर्यंत खूप मोठा टास्क एखाद्या गृहिणींपुढे असतो. इडली, डोशाचे पीठ तयार करताना त्यात डाळ व तांदूळ यांचे प्रमाण योग्य असले पाहिजे. नाहीतर काहीवेळा हे पीठ फसू शकते. एवढेच नव्हे तर उन्हाळ्यांत हे पीठ आंबवण्यासाठी ठेवले असता उष्णतेमुळे काहीवेळा हे पीठ गरजेपेक्षा जास्त आंबवले जाऊन आंबट होते. यामुळे इडली, डोशाची चव बिघडते व आपल्याला हवी तशी इडली व डोसा तयार न झाल्यामुळे आपला हिरमोड होतो. अशावेळी हे पीठ आपण फेकून देतो. परंतु हे पीठ फेकून न देता आपण काही सोप्या ट्रिक्स वापरुन उन्हाळ्यात इडली, डोशाचे पीठ आंबट होण्यापासून टाळू शकतो(How To Remove Sour Taste From Idli, Dosa Batter In Summer Season).
उन्हाळ्यांत इडली डोशाचे पीठ आंबट होऊन खराब होऊ नये यासाठी एक सोपी ट्रिक :-
उन्हाळ्यांत शक्यतो बरेचसे अन्नपदार्थ नासण्याची समस्या गृहिणींपुढे असते. काहीवेळा हे नासलेले अन्नपदार्थ फेकून देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. अशापरीस्थित, उन्हाळ्यांत इडली डोशाचे पीठ आंबट होऊन खराब होऊ नये यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवू , ज्यामुळे भर उन्हाळ्यांतही तुमचे इडली, डोशाचे बॅटर आंबट होऊन खराब होणार नाही.
१. उन्हाळ्यांत इडली, डोशाचे बॅटर बनवून ठेवल्यानंतर काहीवेळा वाढत्या उष्णतेमुळे ते खराब होऊ शकते. असे होऊ नये याकरिता इडली, डोशाच्या तयार बॅटर मध्ये एक ते दिड ग्लास थंड पाणी घालावे. त्यानंतर या पिठात १ टेबलस्पून मीठ घालून घ्यावे. त्यानंतर हे पीठ २ ते ३ वेळा चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. ढवळून घेतल्यानंतर या पिठाच्या पातेल्यावर झाकण ठेवून २ तासांसाठी ते पीठ तसेच ठेवून द्यावे. २ तासांनंतर या पिठावर एक प्रकारच्या आंबट पाण्याचा एक थर जमा होईल हा थर अलगद वरचेवर एका पळीने किंवा डाउलने काढून घ्यावा. या पाण्याचा संपूर्ण थर काढून टाकल्यानंतर बॅटर परत एकदा चमच्याने ढवळून घ्यावे. भर उन्हाळ्यांत वाढत्या उष्णतेमुळे इडली डोशाच्या पिठाला आलेला आंबटपणा अतिशय सहजरित्या तुम्ही काढू शकता. या ट्रिकमुळे आंबट झालेले पीठ पुन्हा पाहिल्यासारखे होऊन त्या बॅटरचे इडली व डोसा तुम्ही बनवू शकता.
इडली -डोशाचे पीठ छान आंबावे म्हणून त्यात सोडा घालता? तज्ज्ञ सांगतात, ते तातडीने बंद करा कारण...
इडली डोशाचे बॅटर बनवताना या चुका टाळा :-
१. पीठ आंबण्याची प्रक्रिया ही सर्वस्वी हवामानावर अवलंबून असते. उन्हाळ्यात पीठ लवकर येते. तर हिवाळ्यात पीठ यायला थोडा उशीर लागतो. त्यामुळे पीठ लवकर फुलून येण्याची घाई करु नका. तसेच पीठ लवकर फुलून येण्यासाठी त्यात बेकिंग सोडा, किंवा तत्सम पदार्थाचा वापर करणे टाळावे.
२. डोसा आणि इडली यांचे बॅटर वेगळे असणे फारच गरजेचे असते. इडली या चिवट असून चालत नाही. त्या हलक्या हव्यात नाहीतर त्या गिळताना फारच चिवट लागतात. त्यामुळे इडलीचे पीठ भिजवताना तांदूळ दोन वाटी असेल तर अर्धी वाटी उडीद घाला. तरच बॅटर छान होईल. तर डोसाचे बॅटर घालताना तुम्हाला दोन वाटी तांदूळला एक वाटी उडीद असे प्रमाण ठेवावे लागते.
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत....
३. अनेक जण मेथी दाण्याचा वापर करतात. मेथी दाण्यामुळे चव वाढते ही गोष्ट खरी असली तरी त्याच्या अधिक वापरामुळे तुमचे बॅटर कडू होऊ शकते. त्यामुळे जरा जपून ज्यावेळी तुम्ही तांदूळ भिजत घालत असाल त्याचवेळी तुम्हाला काही मेथी दाणे भिजत घालायचे आहेत.
४. बॅटर मिक्सरमध्ये वाटताना तुम्हाला पाणी ही जपून घालायचे असते म्हणजे नुसतेच पीठ कोरडे वाटून घ्या. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घाला. जर तुमचे पीठ फारच पातळ झाले तर त्याचे डोसे आणि इडली दोन्हीही होऊ शकणार नाही.
५. एकदा बॅटरचा उपयोग करुन झाला की, ते फ्रिजमध्ये ठेवावे म्हणजे पीठ आंबणार नाही. खूप जण बॅटर बाहेरच ठेऊन देतात त्यामुळे ते लवकर आंबते. जितक्या पीठाचा वापर करणार आहात तितकेच पीठ तुम्ही काढून घ्या. सगळ्या बॅटरमध्ये हात घालू नका.
६. जर तुमचे बॅटर तुम्हाला जास्तच आबंट झाले आहे असे वाटत असेल तर त्यात नारळाचे दूध घालावे. अशापद्धतीने तुम्ही इडली- डोशाचे बॅटर तयार करू शकता.
डोसा करताना तुम्हीही हमखास करत असाल ५ चुका, शेफ संजीव कपूर सांगतात डोसा सिक्रेट...
७. पीठ फुगून आले हे तुम्हाला कळू शकते. कारण पीठ दुप्पटीने वर येतं. तुम्हाला पीठावर बुडबुडे आलेले सुद्धा दिसतात. जर असे झाले असेल तर तुमचे पीठ तयार झाले असे समजा.