Join us  

ऑफिस किंवा शाळेतून आल्यावर घासले तरी डब्यांना दुर्गंधी येते? ५ सोपे उपाय डबे होतील स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 12:55 PM

How To Remove Bad Odour From Lunch Boxes : Easy Tips & Tricks : लंच बॉक्स तेलकट राहतात, त्यांना दुर्गंधी येते ते साफ करण्याचे सोपे उपाय...

दुपारच्या जेवणाचा टिफिन बॉक्स किंवा लंच बॉक्स हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. घरांतील लहान मुलांना शाळेत जाताना किंवा तुम्हाला ऑफिसला जावं लागत असेल तर आपण आवर्जून दुपारच्या जेवणासाठी टिफिन बॉक्स नेतो. दुपारचे जेवण आपण घरात करत नाही. आपण आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा मुलं शाळेत असताना दुपारचे जेवण करतात. अशावेळी आपण आपले दुपारचे जेवण टिफिन बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करुन आणतो. दुपारी हा टिफीनबॉक्स खाल्ल्यानंतर आपण तो बंद करुन तसाच बॅगेत भरुन ठेवतो. मात्र, संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतल्यानंतर टिफिन बॉक्स स्वच्छ करतांना  अतिशय दुर्गंधी येत असल्याचे आपल्या लक्षात येते. दुपारी जेवण झाल्यानंतर पॅकिंग करुन ठेवलेला टिफिन घरी गेल्यावर उघडताच त्यात घाणेरडी दुर्गंधी सुटते. आपण आपला टिफिन बॉक्स रोजच्या रोज व्यवस्थित धुतो. परंतु काहीवेळा हा टिफिन बॉक्स कितीही धुतला तरीही त्यातून घाण दुर्गंधी येत राहतेच. 

स्टीलच्या डब्यांपेक्षा प्लास्टिकचा डबा स्वच्छ करणे म्हणजे गृहिणींच्या डोक्याला ताप असतो. डब्यांच्या कोपऱ्यांमध्ये तेल अन्नाचे दाणे तसेच अडकून राहतात. हे तेल दिर्घकाळ राहिल्याने डब्याला उग्र वास येऊ लागतो. पण शाळा कॉलेज ऑफिसमध्ये सरसकट सर्वकडे प्लॅस्टिकचे डब्बे वापरतात. पण हे डब्बे साफ करताना देखील खूप गोष्टींना समोरे जावे लागते. डब्ब्याचे हट्टी डाग जाता जात नाहीत. काही वेळानी डब्ब्यातून उग्र वास देखील येऊ लागतो. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या टिफिन बॉक्समधून दुर्गंधी येत असली तरी, तरीही काही छोटे उपाय आहेत, ज्याचा अवलंब करून या दुर्गंधीच्या समस्येवर सहज मात करता येते(How To Remove Stains And Pungent Smells From Lunch Boxes).

टिफिन बॉक्समधून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी नक्की कोणते उपाय करावेत ? 

१. टिफिन बॉक्स उघडा करुन ठेवा :- अनेकदा असं होत की आपण काही रस्सेदार, भरपूर मसालेयुक्त भाज्या डब्यांतून नेतो. नंतर हा डबा कितीही स्वच्छ धुतला तरीही त्या मसाल्यांचा आणि भाज्यांचा वास त्यात राहतोच. डब्याला येणाऱ्या या उग्र वासाने त्यात परत दुसरा पदार्थ ठेवायची इच्छा होत नाही. बरेचदा  आपण टिफिन बॉक्स स्वच्छ करतो आणि नंतर तो लगेच बंद करतो. मात्र, टिफिन बॉक्सचा वास दूर करायचा असेल तर तो बंद करण्याऐवजी काही काळासाठी तसाच उघडा ठेवा. डबा स्वच्छ धुतल्यानंतर त्याचे झाकण लगेच लावू नका. असे केल्यावर टिफिन बॉक्समधील अतिरिक्त पाणी तर निघून जातेच शिवाय त्यातून येणारा वासही आपोआप नाहीसा होतो.

२. कच्चा बटाटा आणि मिठाचा वापर करा :- बटाटा हा फक्त खाण्यासाठीच उपयुक्त ठरत नाही, तर साफसफाईसाठीही तितकाच उपयुक्त आहे. विशेषतः, टिफिन बॉक्समधून येणारा मसाल्यांचा तिखट वास दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर केला जाऊ शकतो. टिफिन बॉक्समधून येणारी दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी कच्च्या बटाट्याच्या तुकड्याला मीठ लावून याने डबा घासून घ्यावा. १५ ते २० मिनिटे या बटाट्याच्या तुकड्याने डबा व्यवस्थित स्वच्छ करुन घ्यावा. त्यानंतर टिफिन बॉक्स साबण व पाण्याने धुवून घ्यावा. कच्चा बटाटा व मिठाचा वापर केल्यास डब्यांतील तेलकट डाग तर जातातच त्यासोबत दुर्गंधीही निघून जाण्यास मदत होते. 

मायक्रोवेव्हची स्वच्छता आणि डोक्याला ताप? घ्या ५ सोप्या टिप्स, मायक्रोवेव्ह होईल स्वच्छ- नव्यासारखा...

३. दालचिनीचा वापर करा :- टिफिन बॉक्समधून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी आपण दालचिनीचादेखील वापर करु शकतो. वास्तविक, दालचिनीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे टिफिन बॉक्समधून येणारा वास कमी करण्यास मदत करतात. यासाठी एका भांड्यात थोडे पाणी आणि दालचिनीची काडी ठेवा. आता हे पाणी उकळून घ्यावे. हे पाणी टिफिन बॉक्समध्ये ओतून घ्या. दालचिनीचे हे गरम पाणी टिफिन बॉक्समध्ये १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्यावे. शेवटी, टिफिन बॉक्स कोमट पाणी व साबणाने स्वच्छ धुवून घ्यावा. 

४. लिंबाच्या सालीचा वापर करा :- अनेकदा आपण लिंबू पिळून त्याचा रस काढतो आणि त्याची साल फेकून देतो. खरे तर लिंबाची साल साफसफाईसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. लिंबाच्या सालीमध्ये असलेले सायट्रिक अ‍ॅसिड डब्यातील तेलाचे डाग स्वच्छ तर करतेच, पण त्यासोबत टिफिन बॉक्समधून येणारा वासही दूर करते. यासाठी ताज्या लिंबाच्या साली पाण्यात उकळा. यानंतर तुम्ही हे पाणी टिफिन बॉक्समध्ये ओता आणि साधारण अर्धा तास असेच राहू द्या. शेवटी पाणी व साबणाच्या मदतीने टिफिन बॉक्स स्वच्छ करा.  

  चहा- कॉफीची इलेक्ट्रिक केटल कशी स्वच्छ करायची? ४ टिप्स, किटली होईल स्वच्छ चकचकीत....

५. मिठाचा असा करा वापर :- डब्याचा तेलकटपणा किंवा वारंवार येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी डब्यांत १ टेबलस्पून मीठ घालावे त्यानंतर त्यात थोडे गरम पाणी ओतावे. हे मिश्रण डब्यांत २० ते ३० मिनिटे ठेवून दयावे त्यानंतर साबण व कोमट पाण्याचा वापर करुन डबा स्वच्छ धुवून घ्यावा. अशाप्रकारे मिठाचा वापर करुन आपण डब्याला येणारी दुर्गंधी व तेलकटपणा सहज घालवू शकता.

टॅग्स :किचन टिप्सअन्न