Lokmat Sakhi >Food > काचेच्या बाटलीवरचे स्टिकर्स निघता निघत नाही? १ सोपा उपाय, झटपट काम फत्ते...

काचेच्या बाटलीवरचे स्टिकर्स निघता निघत नाही? १ सोपा उपाय, झटपट काम फत्ते...

How To Remove Sticker Gum From Glass Bottles : काचेच्या बाटलीवरील चिकट गोंद लगेच काढण्यासाठी एक सोपा व लगेच करता येणारा उपाय समजून घेऊयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 12:03 PM2023-01-07T12:03:00+5:302023-01-07T13:47:48+5:30

How To Remove Sticker Gum From Glass Bottles : काचेच्या बाटलीवरील चिकट गोंद लगेच काढण्यासाठी एक सोपा व लगेच करता येणारा उपाय समजून घेऊयात.

How To Remove Sticker Gum From Glass Bottles... 1 easy solution.... | काचेच्या बाटलीवरचे स्टिकर्स निघता निघत नाही? १ सोपा उपाय, झटपट काम फत्ते...

काचेच्या बाटलीवरचे स्टिकर्स निघता निघत नाही? १ सोपा उपाय, झटपट काम फत्ते...

दर महिन्याला लागणारा किराणा आपण महिन्यांतून एकदा भरतो. यात आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची, सॉस किंवा इतर घरात लागणाऱ्या महत्वाच्या वस्तूंची खरेदी करतो. प्रामुख्याने लोणची, सॉस बाहेरून विकतचे आणल्यावर सहसा ते काचेच्या बॉटलमध्ये पॅकिंग केलेले असतात. लोणची, सॉस खाऊन झाल्यानंतर या रिकामी काचेच्या बाटल्या अनेक गृहिणी फेकून देत नाहीत. गृहिणी या बाटल्या स्वच्छ धुवून, पुसून, वाळवून त्याचा पुनर्वापर करतात. या बाटल्यांमध्ये आपण कधी कधी मनी प्लांट किंवा छोटी छोटी रोपे लावतो. घरात जर काही सरबत, लोणची, मसाले तयार केले असतील तर ते देखील या छोट्या काचेच्या बाटल्यांतून भरून रोजच्या वापरासाठी काढले जाते. या बाटल्यांचा पुनर्वापर करताना फक्त एकच अडचण येते ती म्हणजे या बाटल्यांवरील चिकट स्टिकर्स लगेच निघत नाहीत.बाटल्यांवरील चिकट स्टिकर्स एका धुण्यात निघत नाहीत आणि जरी निघाले तरी त्यावरील चिकटपणा जाता जात नाही. अशा परिस्थिती काय करावे? हा प्रश्न प्रत्येकीला पडतो. काचेच्या बाटलीवरील हा चिकट गोंद लगेच काढण्यासाठी एक सोपा व लगेच करता येणारा उपाय समजून घेऊयात(How To Remove Sticker Gum From Glass Bottles).

Seema's Smart Kitchen या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत काचेच्या बाटलीवरील चिकट गोंद लगेच कसा काढायचा याचा सोपा उपाय सांगितला आहे.  

नक्की उपाय काय आहे समजून घेऊयात... 

१. लोणची, सॉस यांच्या बाटलीवरील चिकट स्टिकर आधी काढून घ्या.
२. स्टिकर काढल्यावर त्या स्टिकरचा गोंद तसाच बाटलीला चिकटलेला असतो. थोडेसे नेलपेंट रिमूव्हर कापसाच्या बोळ्यावर घ्या. 
३. या कापसाच्या बोळ्याने जिथे बाटलीचा चिकट भाग आहे त्यावर लावून घ्या. 
४. नेलपेंट रिमूव्हरने बाटलीवरचा चिकटपणा लगेच निघण्यास मदत होईल. 
५. जर तुमच्याकडे नेलपेंट रिमूव्हर नसेल तर तुम्ही त्या ऐवजी डिओड्रंटचा देखील वापर करू शकता. 
६. कोणतेही डिओड्रंट घेऊन बाटलीच्या चिकट भागावर स्प्रे करा आणि कापसाच्या बोळ्याने पुसून घ्या. 
७. नंतर ही बाटली स्वच्छ धुवून घ्या. 

अशा प्रकारे बाजारातून आणलेल्या लोणच आणि सॉसच्या काचेच्या बाटलीवरील स्टिकर्सचा चिकटपणा घालवून त्याचा पुनर्वापर करू शकता.

Web Title: How To Remove Sticker Gum From Glass Bottles... 1 easy solution....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.