भेंडीची भाजी ही आपल्याकडे अतिशय लोकप्रिय भाजी म्हणून ओळखली जाते. भेंडीच्या भाजीव्यतिरिक्त आपण त्याची मसाला भेंडी, कुरकुरी भेंडी, भरली भेंडी, रस्सा भेंडी असे असंख्य (Tired of sticky mess when chopping Lady Finger) प्रकार बनवतो. भेंडीची भाजी ही थोडी बुळबुळीत व चिकट होत असल्यामुळे बहुतेक लोक ती खायला नाक मुरडतात. भेंडीचे वेगवेगळे पदार्थ करायला अगदी सोपे असले तरी ती कापायला आणि धुवायला खूप वेळ लागतो(How To Remove Stickiness Of Lady Finger On Hands & Knife).
काही गृहिणींना भेंडी म्हणजे नकोशीच वाटते, कारण भेंडी चिरताना त्यातील चिकट पदार्थ बाहेर येऊन सगळे हात चिकट - बुळबुळीत होतात. इतकेच नाही तर काहीवेळा या बुळबुळीतपणामुळे सूरी हातातून सटकून हात कापण्याची देखील भीती असतेच. एवढेच नाही तर, हातांना लागलेला हा भेंडीचा चिकटपणा अगदी सहज देखील निघत नाही. हा चिकटपणा घालवण्यासाठी किमान २ ते ३ वेळा हात स्वच्छ धुवावे लागतात. तसेच या चिकटपणामुळे भेंडी चिरण्यात बराच वेळ जातो. यासाठी भेंडी चिरताना हात चिकट - बुळबुळीत होऊ नये यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात.
भेंडी चिरताना आता हात चिकट - बुळबुळीत होणार नाहीत कारण...
१. मोहरीचे तेल आणि मीठ :- भेंडी चिरण्याआधी, एका बाऊलमध्ये चमचाभर मोहरीचे तेल आणि १ टेबलस्पून मीठ घालावे. हे दोन्ही पदार्थ चांगले कालवून मीठ विरघळवून घ्यावे. आता हे मोहरीचे तेल व मिठाचे एकत्रित मिश्रण बोटांच्या मदतीने सूरी आणि हातांवर लावून घ्यावे. त्यानंतर भेंडी चिरावी. या उपायामुळे भेंडी सूरी किंवा हाताला अजिबात चिकटत नाही, तसेच भेंडीचा चिकट - बुळबुळीतपणा देखील हातांवर चिकटून राहत नाही.
उन्हाळ्यात करा केळीचे वेफर्स, कुरकुरीत-स्वादिष्ट आणि ताजेताजे! मुलांनी खाल्ले तरी नो टेंशन...
२. फ्रिजरमध्ये ठेवा :- भेंडी चिरण्याआधी फक्त ५ मिनिटे फ्रिजरमध्ये ठेवून द्यावी. ५ मिनिटांनंतर भेंडी फ्रिजरमधून काढून थेट चिरावी, यामुळे भेंडीचा चिकट - बुळबुळीतपणा हातांवर चिकटून राहात नाही. तसेच भेंडी अगदी पटकन चिरुन होते.
केसांत गजरा माळण्याच्या १० नव्या सुंदर स्टाइल्स, ५ मिनिटांत साधीशी हेअरस्टाइल दिसेल खास...
३. भेंडी धुवून व्यवस्थित सुकवा :- भेंडी धुवून लगेच कापू नका. अन्यथा त्यातील पाणी मिसळल्यानं भेंडी जास्त चिकट होते. भेंडीची भाजी धुवून व्यवस्थित सुकवा आणि मग कापा. शक्य असल्यास रात्रीच भेंडी स्वच्छ धुवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कापा. यामुळे भेंडी चिरताना हात, सूरी चिकट - बुळबुळीत होणार नाही.
खरबुजाच्या बिया फेकून नुकसान करु नका, करा १० मिनिटांत खरबूज बियांचे मिल्कशेक! उन्हाळा गारेगार...
४. जास्त बारीक काप करू नका :- भेंडी चिरताना त्याचे जास्त बारीक काप करु नका. भेंडीचा चिकट - बुळबुळीतपणा दूर करण्यासाठी ती नेहमी मोठ्या तुकड्यांमध्ये कापा आणि मग कमी तेलात फ्राय करा. यामुळे भेंडी चिरताना हात चिकट - बुळबुळीत होत नाही तसेच भाजीला देखील चिकटपणा येत नाही.