Lokmat Sakhi >Food > बटाटा जास्तच गोड लागतोय, गुळचट चवीमुळे भाजी खराब? ४ सोप्या ट्रिक्स, गोडसर चव होईल कमी, स्टार्चही निघेल

बटाटा जास्तच गोड लागतोय, गुळचट चवीमुळे भाजी खराब? ४ सोप्या ट्रिक्स, गोडसर चव होईल कमी, स्टार्चही निघेल

How To Remove Sweetness From Potatoes : बटाटा अनेकदा चवीला गोड लागतो, पण यामुळे पदार्थ फेकून देऊ नका, ४ घरगुती उपाय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2023 01:32 PM2023-12-07T13:32:37+5:302023-12-07T13:33:17+5:30

How To Remove Sweetness From Potatoes : बटाटा अनेकदा चवीला गोड लागतो, पण यामुळे पदार्थ फेकून देऊ नका, ४ घरगुती उपाय करून पाहा..

How To Remove Sweetness From Potatoes? | बटाटा जास्तच गोड लागतोय, गुळचट चवीमुळे भाजी खराब? ४ सोप्या ट्रिक्स, गोडसर चव होईल कमी, स्टार्चही निघेल

बटाटा जास्तच गोड लागतोय, गुळचट चवीमुळे भाजी खराब? ४ सोप्या ट्रिक्स, गोडसर चव होईल कमी, स्टार्चही निघेल

भारतीय पदार्थांमध्ये बहुतांश डिशमध्ये बटाटा (Potatoes) असतोच. बटाटा कोणत्याही भाजीत फिट बसतो. बटाट्याची भाजी, आमटी, भजी, पराठे यासह नानाविध पदार्थ केले जातात. बटाट्याशिवाय उपवासाचे पदार्थ अपूर्ण आहे. बटाटा घालताच पदार्थाची चव वाढते. शिवाय दोन घास पोटात एक्स्ट्रा जातात. पण काही वेळेला बटाटे चवीला गोड लागतात. ज्यामुळे पदार्थाची चव तर बिघडतेच, शिवाय संपूर्ण पदार्थ वाया जातो.

पदार्थ खाताना हिरमोड होतो तो वेगळाच. बटाटे जुने झाले तर, चवीला गोड निघण्याची शक्यता असते (Kitchen Tips). बटाटे गोड आहेत की नाही, हे पहिलेच चेक करणं जरा अवघडच. पण आपण बटाट्यातील गोडवा काही टिप्सच्या मदतीने कमी करता येऊ शकते. बटाट्यातील गोडवा कमी करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर ठरेल. पाहूयात(How To Remove Sweetness From Potatoes).

सैंधव मीठ

सैंधव मिठाचा वापर बहुतांश घरांमध्ये होतो. सैंधव मीठ आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण याचा वापर आपण बटाट्यातील गोडवा कमी करण्यासाठीही करू शकता. प्रथम, एका भांड्यात गरम पाणी घाला, त्यात सैंधव मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात बटाटे घालून २० मिनिटांसाठी भिजत ठेवा. यामुळे त्यातील गोडसर चव कमी होईल.

कपभर हिरव्या मुगाला द्या पाकिस्तान स्टाईल तडका, पाहा त्यांची डाळ करण्याची युनिक पद्धत, चवीला भारी-खाल पोटभर

व्हिनेगर

व्हिनेगरच्या वापराने आपण बटाट्यातील गोडवा कमी करू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात २ चमचे व्हिनेगर घालून मिक्स करा. नंतर त्यात बटाटे घालून १० मिनिटांसाठी भिजत ठेवा. १० मिनिटानंतर पाण्यातून बटाटे काढून त्याचा वापर करा.

चिंचेचा कोळ

बटाटा चवीला गोड आहे की नाही, हे त्याची चव घेतल्यानंतर कळते. जर बटाट्याची भाजी चवीला गोड झाली असेल तर, त्यात एक चमचा चिंचेचा कोळ घालून मिक्स करा. यामुळे बटाट्याची चव गोड लागणार नाही. शिवाय भाजीची चव दुपट्टीने वाढेल. पण जर आपण बटाट्याची भाजी करत असाल तर, बटाटे चिरून झाल्यानंतर काही वेळेसाठी मिठाच्या पाण्यात ठेवा. नंतर त्याची भाजी तयार करा.

विकतचा कशाला? घरीच २ वाटी चणा डाळीचा करा गुजराथी स्पेशल खमण ढोकळा, ना इनोची गरज - ना अधिक मेहनत

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर जेवणात होतो. आपण याचा वापर बटाट्यातील गोडवा आणि स्टार्च काढण्यासाठी करू शकता. यासाठी बटाटे चिरून पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये एक कप पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. नंतर त्यात चिरलेले बटाटे घालून २० मिनिटांसाठी भिजत ठेवा. २० मिनिटानंतर आपण बटाट्याचा वापर करू शकता. यामुळे बटाट्यामधून गोडवा तर कमी होईलच शिवाय स्टार्चही निघून जाईल.

Web Title: How To Remove Sweetness From Potatoes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.