पालक, पत्ताकोबी, फूलकोबी, ब्रोकोली, मटार यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये लहान लहान किडे दिसून येतात. वेळीच या किड्यांवर लक्ष दिलं नाहीतर ते जास्त दिवस राहतात आणि भाज्या खराब करतात. भाज्यांमधले किडे काढून टाकण्यासाठी तुम्ही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. कारण अळ्या, किडे असलेल्या भाज्या खाल्ल्यानं आरोग्यावर विपरीत परीणाम होऊ शकतो. पोटदुखी, जुलाब, ताप येणं, उलट्या अशी लक्षणं दिसून येतात. (How to remove worms from vegetables)
1) फुलकोबीतील किडे कसे घालवावेत?
फुलकोबी, मटार यांसारख्या भाज्यांमधले लपलेले किटक पटकन दिसून येत नाही आणि जेवणाद्वारे पोटात पोहोचतातत. म्हणूनच भाज्या बनवण्यापूर्वा ज्या गरम पाण्यात उकळवून घ्या आणि चिरताना व्यवस्थित तपासून मग फोडणीसाठी भाज्या घालाव्यात. या भाज्यांमध्ये किडे खूप जास्त असतात. म्हणूनच खाण्याआधी व्यवस्थित पाहा. चिरताना मोठ्या तुकड्यांमध्ये चिरा. जेणेकरून अळ्या लगेच दिसून येतील. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात १ चमचा मीठ घाला. त्यानंतर या पाण्यात कोबीचे तुकडे घालून काही वेळासाठी तसेच ठेवा जर भाजीमध्ये किडे असतील तर पाण्यावर तरंगतील. कोमट पाण्यात मीठ आणि हळद पावडर घालून त्यात कोबी काही वेळासाठी ठेवा. यामुळे किडे बाहेर निघतील.
२) पालेभाज्यांमधून अळ्या कशा काढाव्यात
पावसाळ्यात पालेभाज्या जरा पाहूनच खाव्यात कारण. दुषित पाण्यात पिकवलेल्या पालेभाज्यांमुळे पोटाचे विकार होतात. पालकासारख्या भाज्या धुवून कापणं त्यातील अळ्या काढून टाकणं हे खूपच कठीण काम असतं. कधीकधी पानांवर लहान किटक लपलेले असतात, जे सहज दिसत नाहीत. पालेभाज्यांची पानं शिजवण्याचा विचार करत असाल तर प्रथम या भाज्या मिठाच्या पाण्यात काही वेळ सोडा. साधारण या भाज्या मिठाच्या पाण्यात किमान 10-15 मिनिटे सोडा. यानंतर, साध्या पाण्याने दोन ते तीन वेळा चांगले धुवा आणि शिजवा. (पोट, कंबरेची चरबी फारच सुटली? रामदेव बाबांचे खास उपाय; स्लिम पोट-दिसेल मेंटेन फिगर)
3) पत्ताकोबीतून किडे कसे काढावेत
रिसर्चनुसार या भाजीतील किडे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. यामुळे मेंदूला नुकसान पोहोचते.म्हणूनच पत्ताकोबी कापताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. त्याच्या वरच्या दोन लेअर्स काढून टाका. पत्ता कोबी हळदीच्या कोमट पाण्यात बुडवून बराचवेळ राहू द्या. नंतर १५ मिनिटांनी दुसऱ्या भांड्यांमध्ये काढा नंतर साध्या पाण्यानं १ ते २ वेळा धुवा. यामुळे भाज्यांमधली घाण बाहेर निघण्यास आणि किडे बाहेर पडण्यास मदत होईल. (डासांनी घर भरतं, रात्री खूप डास चावतात? 5 सोपे उपाय करा,आसपासही येणार नाहीत डास)