बहुतेकवेळा आपण हॉटेलमध्ये गेल्यावर रोटी आणि एखादी दाटसर ग्रेव्ही असणारी भाजी ऑर्डर करतो. भाज्यांमध्ये आपण शक्यतो पनीर असणाऱ्याच भाज्याच जास्त आवडीने खातो. पनीर मसाला, व्हेज कोल्हापुरी, पनीर हंडी, पनीर लबाबदार, पालक - पनीर अशा वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर करतो. जेव्हा आपण पालक - पनीरची भाजी ऑर्डर करतो तेव्हा आपल्या समोर आलेल्या भाजीचा रंग आणि स्वाद पाहून आपण ती कधी खातो असे होते. या भाजीचा ग्रेव्हीचा रंग दाट हिरवागार असा असतो. याउलट हीच पालक - पनीरची भाजी जेव्हा आपण घरी करतो तेव्हा या भाजीच्या ग्रेव्हीचा रंग हा काळपट दिसतो(How To Make Greenest Palak Paneer).
हॉटेलच्या ग्रेव्हीसारखा छान हिरवागार रंग (How to retain green color of spinach while blanching) घरच्या पालक - पनीरला येत नाही. अशावेळी ती भाजी बघून आपला हिरमोड होतो. हॉटेलसारखी भाजी घरी करायची म्हणून आपण फार मेहेनत घेतो. परंतु या भाजीला हवा तसा रंग, स्वाद आला नाही तर अशी भाजी खावीशी वाटत नाही. खरंतर, पालक - पनीरची भाजी घरी करताना आपण काही बेसिक चुका करतो, यामुळे ग्रेव्हीला हिरवागार रंग येत नाही. पालक - पनीर करताना या दोन चुका टाळल्या म्हणजे घरी केलेली पालक - पनीरची भाजी हॉटेलसारखी छान हिरवीगार होईल. या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूयात(How to retain the green color of palak).
पालक - पनीर करताना ग्रेव्हीला छान हिरवागार रंग यावा म्हणून...
पालक पनीर करताना त्याची ग्रेव्ही छान हिरवीगार व्हावी यासाठी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी एक खास टिप सांगितली आहे. ही टीप जर तुम्ही फॉलो केली तर नक्कीच तुमच्या पालक - पनीरच्या ग्रेव्हीचा रंग हा छान हिरवागार होईल.
१. पालक - पनीर करताना सर्वात आधी आपण पालक पाण्यांत उकळवून मग त्याची पेस्ट करुन घेतो. अशावेळी पालक आधीच पाण्यांत घालूंन मग ते पाणी आणि पालक दोन्ही एकदम एकाच वेळी उकळवल्याने पालकची ग्रेव्ही काळपट होते. पालक आणि पाणी एकदम उकळायला ठेवू नका. सर्वात आधी पाणी व्यवस्थित उकळवून घ्या पाणी उकळवून झाल्यानंतरच त्यात पालक घाला. यामुळे तुमच्या पालकच्या ग्रेव्हीचा रंग काळा न होता छान हिरवागार होईल.
पितृपक्ष: चविष्ट भाज्यांसाठी करा ‘खास’ वाटण, स्वयंपाक तर झटपट होईलच-भाज्याही लागतील चवदार...
सकाळी कामाच्या गडबडीत नाश्ता करायला वेळ नाही? खा ५ हेल्दी पदार्थ, पोट भरेल - राहाल फिट...
२. पालक पाण्यांत घातल्यानंतर तो जास्तवेळ पाण्यांत ठेवू नये. पालक फक्त २ ते ३ मिनीटांसाठीच पाण्यांत ठेवावा. पालकाचा हलकासा रंग बदलल्यानंतर लगेच पालक गरम पाण्यांतून बाहेर काढावा.
३. पालक - पनीर करताना किंवा पालकचे इतर पदार्थ करताना शक्यतो आपण आधी पालकची प्युरी करून घेतो. ही पालकची प्युरी किंवा ग्रेव्ही काळपट होऊ नये म्हणून पालक गरम पाण्यांत उकळवून घेताना त्यात १ टेबलस्पून मीठ घालावे. मीठ घातल्याने पालकची प्युरी किंवा ग्रेव्हीला काळपट रंग येत नाही.
पापडाची चटणी खा, झणझणीत कुरकुरीत सुकी चटणी म्हणजे निव्वळ सुख, तोंडाला येईल चव...