Lokmat Sakhi >Food > दिवाळीतल्या शेव- चकल्या खूप उरल्या? ३ रेसिपी ट्राय करा, घरातले सगळेच आवडीने ताव मारतील

दिवाळीतल्या शेव- चकल्या खूप उरल्या? ३ रेसिपी ट्राय करा, घरातले सगळेच आवडीने ताव मारतील

Cooking Tips: दिवाळीत केलेल्या किंवा विकत आणलेल्या शेव- चकल्या खूपच जास्त उरल्या असतील तर त्यांचा वापर करून या काही रेसिपी करून पाहा..(best recipies from leftover Diwali faral)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2024 02:38 PM2024-11-05T14:38:54+5:302024-11-05T14:39:39+5:30

Cooking Tips: दिवाळीत केलेल्या किंवा विकत आणलेल्या शेव- चकल्या खूपच जास्त उरल्या असतील तर त्यांचा वापर करून या काही रेसिपी करून पाहा..(best recipies from leftover Diwali faral)

how to reuse Diwali faral, best recipies from leftover Diwali faral, recipe using shev and chakali from Diwali faral | दिवाळीतल्या शेव- चकल्या खूप उरल्या? ३ रेसिपी ट्राय करा, घरातले सगळेच आवडीने ताव मारतील

दिवाळीतल्या शेव- चकल्या खूप उरल्या? ३ रेसिपी ट्राय करा, घरातले सगळेच आवडीने ताव मारतील

Highlights फराळाच्या पदार्थांमध्ये जर शेव, चकली हे दोन पदार्थ भरपूर प्रमाणात उरले असतील तर त्यांचा कसा मस्त चटकदार वापर करायचा ते पाहा..

दिवाळीच्या निमित्ताने आपण फराळाचे वेगवेगळे पदार्थ घरी करतो किंवा मग विकत आणतो. आपल्या नातेवाईकांकडून, मित्रमंडळींकडूनही फराळ येतो. मग घरात एवढे पदार्थ होतात की त्यातले सगळे खाल्ले जात नाहीत. त्यातही आता जवळपास प्रत्येक घरात कोणी ना कोणी डाएट करणारं असतंच. त्यामुळे मग दिवाळीनंतर हे पदार्थ सहसा जास्त खाल्ले जात नाहीत. किंवा दिवाळीच्या दिवसांमध्ये हे पदार्थ एवढे जास्त खाणं होतात की त्यानंतर ते पुन्हा खाण्याची इच्छा होत नाही (best recipies from leftover Diwali faral). त्यामुळे त्यांचं काय करावं, हा प्रश्न पडतोच. या फराळाच्या पदार्थांमध्ये जर शेव, चकली हे दोन पदार्थ भरपूर प्रमाणात उरले असतील तर त्यांचा कसा मस्त चटकदार वापर करायचा ते पाहा..(recipe using shev and chakali )

दिवाळीतल्या शेव- चकल्या खूप उरल्या?

 

१. चटपटीत शेव मसाला पोळी

शेव जर उरली असेल तर चटपटीत शेव मसाला पोळी रोल करण्यासाठी तिचा मस्त उपयोग करता येतो. ही रेसिपी करण्यासाठी कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या. तवा गरम करायला ठेवा. त्यावर थोडं तूप टाका आणि घरात तयार असलेली पोळी त्या तुपावर टाका.

केस अजिबात वाढत नाहीत- खूप पातळ झाले? ७ पदार्थ रोज खा, भराभर वाढून लांबसडक होतील

आता पोळीच्या वरच्या बाजुने टोमॅटो सॉस लावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, तिखट, चाट मसाला आणि घरातली शेव असं सगळं टाका. पोळी खालच्या बाजुने खमंग भाजली गेली की ती दोन्ही बाजुने दुमडून तिचा रोल तयार करा. चटपटीत शेव मसाला पोळी झाली तयार..

 

२. शेव भाजी 

घरात उरलेली शेव जर थोडी जाडसर असेल तर घरच्याघरी खमंग शेवभाजीचा बेत करा आणि त्यामध्ये घरात उरलेली फराळाची शेव वापरून टाका. नेहमीपेक्षा थोडी वेगळ्या प्रकारची, वेगळ्या चवीची शेवभाजी खायला मिळेल.

 

३. भाज्यांमध्ये ग्रेव्ही

शेव, चकल्या खूप जास्त प्रमाणात उरल्या असतील तर शेव थोडी हाताने चुरून घ्या. चकल्यांचे तुकडे करून घ्या. शेव आणि चकली दोन्ही मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर करून घ्या.

पणत्यांमधून गळणाऱ्या तेलामुळे फरशीवर डाग पडले? २ सोपे उपाय- डाग जाऊन फरशी होईल चकाचक

ज्या भाज्या आपण डाळीचं पीठ किंवा बेसन तसेच दाण्याचा कूट लावून करतो, त्या भाज्यांमध्ये पीठाऐवजी किंवा कुटाऐवजी चकल्यांची किंवा शेवेची मिक्सरमधून बारीक केलेली पावडर वापरा. चवीमध्ये बदल झाल्याने भाज्या सगळ्यांनाच खूप आवडतील.

 

Web Title: how to reuse Diwali faral, best recipies from leftover Diwali faral, recipe using shev and chakali from Diwali faral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.