दिवाळीनिमित्त घरोघरी शेव, चकली, अनारसे, करंजी असे तळणाचे पदार्थ केले जातात. फराळ तळून तर होतो, पण कढईमध्ये तेल मात्र तसंच राहतं. शिवाय फराळाचे पदार्थ चांगले फुलावेत यासाठी अनेक जणी जरा जास्तीचंच तेल टाकतात. नंतर ते तेल उरलं की एवढं महागाचं तेल टाकून द्यावं वाटत नाही, शिवाय आरोग्याची काळजी असल्याने ते खावंही वाटत नाही. अशावेळी या तेलाचं काय करायचं असा प्रश्न पडतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्या तेलाचे कसे उपयोग करता येतात ते पाहा (best reuse of fried cooking oil).. तळणाच्या तेलाचा पुन्हा उपयोग करण्याआधी ते स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. ते कसं करायचं ते ही आता पाहूया (Uses of fried cooking oil)...
तळणाचं तेल स्वच्छ कसं करायचं?
तळणं झाल्यानंतर कढईमध्ये जे तेल उरलेलं असतं त्यात अन्नपदार्थांचे अनेक कण असतात. शिवाय तेलाचा रंगही अन्नपदार्थांच्या कणामुळे बदललेला असतो. हे तेल स्वच्छ करण्यासाठी कॉर्नफ्लॉअर वापरता येतं.
त्यासाठी एका वाटीमध्ये ३ टेबलस्पून कॉर्नफ्लॉअर घ्या. त्यात पाणी टाकून त्याची थोडी घट्ट पेस्ट करा. कढईमध्ये तेल तापायला ठेवा. तेल तापलं की त्यात कॉर्नफ्लॉअरची पेस्ट टाका. ही पेस्ट टाकताच तेल फसफसेल आणि कढईतले अन्नपदार्थ कॉर्नफ्लॉअरला चिटकतील. त्यानंतर कॉर्नफ्लॉअरचा गोळा कढईतून काढून घ्या. तेलाचा रंग आता बदललेला असेल. तेल जर स्वच्छ वाटलं नाही, तर पुन्हा हा उपाय करा.
स्वयंपाकाव्यतिरिक्त तळणाचं तेल कशासाठी वापरावं?
१. तळून झाल्यानंतर उरलेलं तेल जर वर सांगितलेल्या पद्धतीनुसार स्वच्छ करून घेतलं तर दिवाळीत आपण अंगणात, जीन्यात, पायऱ्यांवर ज्या पणत्या लावतो, त्या पणत्या लावण्यासाठी तुम्ही या तेलाचा वापर करू शकता.
मुलं पळतात- विचित्र चेहरे करतात, करिना कपूरलाही दिवाळीत परफेक्ट फॅमिली फोटोसाठी करावी लागली धडपड
२. बऱ्याचदा आपल्या घरातले दरवाजे, खिडक्या किंवा कपाटाची दारे यांचे जॉईंट्स किरकिरतात.. त्यामध्ये टाकायला या तेलाचा वापर तुम्ही करू शकता.
३. थंडीच्या दिवसांत पाय उलतात. तळपायाला भेगा पडतात. अशावेळी रात्री झाेपताना तळपायाला तेल चोळा आणि पायात सॉक्स घाला. भेगा मऊ पडतील.