Lokmat Sakhi >Food > भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!

भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!

How To Reuse Rasmalai Ras Or Rabdi : Make 3 New Food Dishes From Leftover Rasmalai Ras Or Rabdi : Bhai Dooj Special Recipe : सणावाराला आणलेल्या रसमलई, रबडीचा रस उरला तर न फेकता त्यापासून करा इन्स्टंट पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2024 11:30 AM2024-11-03T11:30:00+5:302024-11-03T11:30:02+5:30

How To Reuse Rasmalai Ras Or Rabdi : Make 3 New Food Dishes From Leftover Rasmalai Ras Or Rabdi : Bhai Dooj Special Recipe : सणावाराला आणलेल्या रसमलई, रबडीचा रस उरला तर न फेकता त्यापासून करा इन्स्टंट पदार्थ...

How To Reuse Rasmalai Ras Or Rabdi Make 3 New Food Dishes From Leftover Rasmalai Ras Or Rabdi | भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!

भाऊबीजेला आणलेल्या रसमलईचा रस उरला? फेकून न देता करा झटपट होणारे ३ सोपे पदार्थ, चवीला उत्तम!

सणवार म्हटलं की गोडधोड मिठाया खाणं होतंच. यातही भाऊबीजेचा सण आला की बहीण भाऊ गोड पदार्थ भरवून एकमेकांचे तोंड गोड करतात. भाऊबीज असो किंवा कोणताही सण तो गोड पदार्थ आणि मिठाया यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. भाऊबीज सणानिमित्त बहिणी भावंडांची भेट होतेच अशावेळी दिवाळीचा (Diwali 2024) फराळ आणि गोडधोड मिठायांवर ताव मारला जातो. गोड मिठाईच्या प्रकारांमध्ये रसमलई आणि रबडी हे दोन बहुतेक सगळ्यांच्याच आवडीचे पदार्थ आहेत(How To Reuse Rasmalai Ras Or Rabdi).

रसमलई मध्ये असलेला मऊ, मुलायम रसगुल्ला पटकन खाऊन संपवला जातो आणि रस तसाच उरतो. शक्यतो पाकातील किंवा रस असलेले गोड पदार्थ आणले की त्यातील मिठाई संपवली जाते आणि रस तसाच डब्यांत शिल्लक राहतो. अशावेळी इतक्या महागामोलाची आणलेली मिठाई किंवा त्याचा रस फेकून देणे म्हणजे जीवावर येते. अशा परिस्थितीत, आपण या उरलेल्या रसाचा वापर करुन नवीन पदार्थ तयार करु शकतो. यामुळे उरलेला रस देखील संपवला जाईल तसेच यापासून तयार झालेला आणखी एक नवीन पदार्थ खाण्याचा आनंद मिळेल(Make 3 New Food Dishes From Leftover Rasmalai Ras Or Rabdi).

रसमलईचा रस किंवा रबडी उरली तर असा करा वापर... 

१. रसमलई फ्लेवर्ड मिल्क शेक :- एका मिक्सरच्या भांड्यात रसमलईचा उरलेला रस, साखर, बर्फाचे खडे आणि थोडेसे दूध घालून हे सगळे पदार्थ एकत्रित मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. त्यानंतर हे रसमलई फ्लेवर्ड मिल्क शेक (Instant Rasmalai flavoured  Milkshake) एका ग्लासात काढून त्यावरुन ड्रायफ्रुटसचे काप भुरभुरवून थंडगार पिण्यासाठी सर्व्ह करावे. 

२. रसमलई पुडिंग :- रसमलईचा रस आणि उरलेली रबडी एका भांड्यात घेऊन एकत्रित मिक्स करून घ्यावी. आता हे एकत्रित मिश्रण गॅसच्या मंद आचेवर ठेवून त्यात साखर घालवी. त्यानंतर हे मिश्रण उकळवून घ्यावे. उकळल्यानंतर यात पनीरचे तुकडे मॅश करून घालावेत. आता हे सगळे मिश्रण शिजवून घ्यावे. आता एका ट्रे मध्ये हे मिश्रण काढून थोडे गार होऊ द्यावे. गार झाल्यावर हा ट्रे फ्रिजरमध्ये २ ते ३ तासांसाठी ठेवून पुडिंग व्यवस्थित सेट होऊ द्यावे. त्यानंतर या सुरीच्या मदतीने या पुडिंगचे (Rasmalai Milk Pudding) लहान तुकडे पाडून घ्यावेत. 

३. फ्रुट सॅलॅड किंवा कस्टर्ड मध्ये वापरा :- फ्रुट सॅलॅड किंवा कस्टर्डसाठी सर्वात आधी आपल्या आवडीच्या फळांचे कापून लहान तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये उरलेल्या रसमलईचा रस घ्या. या रसात आपल्या आवडीनुसार फळांचे तुकडे घालावेत. त्यानंतर वरुन एक टेबलस्पून मध ओतून चमच्याने हलकेच मिक्स करून घ्या. आता हा बाऊल तासभर फ्रिजमध्ये ठेवून फ्रुट सॅलॅड किंवा कस्टर्ड (Rasmalai Flavour Fruit Custard) थोडे थंड होऊ द्यावे. थंड झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करावे. 

अशाप्रकारे आपण उरलेल्या रसमलईच्या रसाचा किंवा रबडीचा वापर करुन हे साधेसोपे झटपट होणारे पदार्थ तयार करु शकतो.

Web Title: How To Reuse Rasmalai Ras Or Rabdi Make 3 New Food Dishes From Leftover Rasmalai Ras Or Rabdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.