चपाती हा आपल्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. काहीजणांना सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत चपाती ही लागतेच. मऊ, लुसलुशीत टम्म फुगलेली चपाती खायला सगळ्यांनाच आवडत. काहींना चपाती शिवाय जेवण झाले आहे असे वाटतच नाही. चपाती रोजच्या जेवणात हवीच असते, पण ती रोज बनवण्याचा काहीजणींना कंटाळा येतो. चपाती बनवण्यासाठी कणीक मळा, गोळे करा, मग चपाती लाटा, चपाती भाजा यात बराच वेळ खर्ची होतो(How to Roll Out Dough Evenly Without Sticking).
परफेक्ट गोल, मऊ, टम्म फुगलेल्या चपात्या बनवणं हे कोणत्याही कलेपेक्षा (How can I keep a rolling pin from sticking to dough) कमी नसत. चपात्या बनवताना अनेक अडचणी येतात. काहीवेळा कणीक योग्य पद्धतीने भिजवली जात नाही तर कधी चपात्या लाटताना त्या लाटण्याला चिकटतात. अनेकदा चपाती बनवताना ती पोळपाट किंवा लाटण्याला चिकटते. अशी चपाती चिकटून ती फाटते. अनेकदा पोळपाट आणि लाटण्याला कणीक चिकटते त्यामुळे चपाती नीट होत नाही. मग अशावेळी पुन्हा एकदा पीठ मळण्याचा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय सतत लाटणं साफ करावं लागतं आणि ते नकोसं वाटतं. इतकंच नव्हे तर, लाटण्याला कणीक चिकटू नये म्हणून सतत त्यावर जर सुके पीठ आपण लावत राहिलो तर त्यामुळे चपाती अधिक कडक बनते. ही समस्या सोडविण्यासाठी नेमकं काय करायचं हे घाईगडबडीच्या वेळी लक्षात येत नाही. चपाती लाटताना ती पोळपाट किंवा लाटण्याला चिकटू नये म्हणून काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(How to Roll Out Dough Evenly Without Sticking).
चपाती लाटताना ती लाटण्याला चिकटू नये म्हणून....
१. कणीक पोळपाट अथवा लाटण्याला चिकटू नये यासाठी सर्वात प्रभावी पहिला उपाय म्हणजे कणीक योग्य पद्धतीने भिजवणे. चपाती लाटण्यापूर्वी कणीक भिजवून ती तिंबवून ठेवणे गरजेचे असते. कणीक नीट सेट न झाल्यास पोळपाट वा लाटण्यास चिकटते हे लक्षात घ्या. तसंच कणीकेचा गोळा लाटण्यापूर्वी लाटणं आणि पोळपाटावर थोडे सुके पीठ पसरवा मगच चपाती लाटा.
२. लाटण्याला चपाती चिकटू नये म्हणून चपाती लाटण्याआधी लाटण फ्रिजरमध्ये ठेवून गार करून घ्यावे. अशा गार लाटण्याने चपात्या लाटाव्यात. यामुळे चपात्या लाटताना त्या लाटण्याला चिकटत नाहीत.
हाताला कणभर पीठ न लागता कणीक मळा, पाहा ही पीठ भिजवण्याची जादूई पिशवी....
३. ऍल्युमिनियम फॉईल लाटण्यावर गुंडाळून घ्यावी आणि मग चपात्या लाटाव्यात. या उपायामुळे चपात्या लाटताना त्या पोळपाट किंवा लाटण्याला चिकटत नाहीत.
४. चपाती लाटताना ती पोळपाट किंवा लाटण्याला चिकटू नये म्हणून कणीक भिजवून झाल्यानंतर त्यावर थोडेसे तेल घालावे. त्यानंतर हे मळलेले कणीक थोडा वेळ कापड घालून झाका ठेवावे. यामुळे चपाती लाटताना कणीक चिकटत नाही. तसेच तुम्ही लाटण्यावर कुकिंग ऑईल स्प्रे करून घेऊ शकता.
कडक गूळ चिरण्याच्या २ झटपट ट्रिक्स, गूळ होईल किसून, हातही दुखणार नाहीत...
५.कणीक खूप पातळ मळली गेली असेल तर ती पोळपाट लाटण्याला चिकटते. त्यामुळे कणीक मळून झाल्यावर लगेच पोळ्या करु नका. मळलेली कणीक थोडा वेळ मुरायला ठेवा. कणीक हलक्या हाताने मळा. कणकेचा गोळा घेऊन पोळी लाटताना लाटणं सलग फिरवू नका. सतत उचलून लाटणं फिरवा.
६. कणीक खूपच पातळ झाली असेल तरीही चपात्या लाटताना त्या लाटण्याला चिकटतात अशावेळी १० ते १५ मिनिटांसाठी मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर पोळ्या लाटा.
आता घरीच करून ठेवा वर्षभर टिकणारी लसूण पावडर, स्वयंपाक होईल रुचकर...