Join us  

फराळ केल्याने गॅस सिलेंडर लवकर संपते? ५ टिप्स, सिलेंडर जास्त दिवस चालेल, बचत होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 8:44 PM

How To Save Cooking Gas : गॅस सिलेंडरची बचत होण्यासाठी नॉन स्टिक भांड्यांमध्ये जेवण करा. कारण यात लवकर स्वंयपाक होतो.

महागाई वाढल्यापासून घर खर्च खूपच वाढला आहे. गॅस सिलेंडचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे.  गॅस सिलेंडरवर कोणतंही काम करायचं म्हटलं तर गॅस सिलेंडर लवकर संपेल अशी धास्ती असते.  दिवाळीच्या दिवसांत वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅस लागतो. (LPG Gas Saving Tips) ज्यामुळे लवकर गॅस लवकर संपतो.

अनेकदा स्वयंपाक करताना  सिलेंडर संपण्याची भिती असते. घरात गॅस सिलेंडर लवकर संपत असेल तर काही ट्रिक्स तुमच्या कामात येऊ  शकतात. ज्यामुळे गॅस सिलेंडर लवकर संपणार नाही,भरपूर दिवस चालेल. (How To Save Cooking Gas)

१) मोकळ्या भांड्यात स्वंयपाक करण्यापेक्षा प्रेशर कुकरमध्ये स्वंयपाक करता ज्यामुळे कमीत कमी वेळात स्वंयपाक होतो आणि गॅसची बचत होते.

२) जेव्हा कोणताही पदार्थ शिजत असेल  तेव्हा झाकण ठेवायला विसरू नका. त्यामुळे लवकर स्वयंपाक बनतो आणि गॅस कमी लागतो.

डोक्यावर पांढरे केस खूपच चमकतात? पाण्यात ३ पदार्थ मिसळून प्या, लगेच काळेभोर होतील केस

३) कधीच गॅस सिलेंडरवर ओली भांडी ठेवू नका. भांडं गरम व्हायला जास्त वेळ लागला तर गॅससुद्धा जास्त वाया जाईल. गॅस लवकर संपतो असं तुम्हाला वाटत असेल तर सतत गॅस लावून स्वंयपाक करण्यापेक्षा दोन किंवा तीन वेळा  डाळी किंवा भाज्या बनवून फ्रिजमध्ये ठेवून द्या. 

४) गॅस सिलेंडरची बचत होण्यासाठी नॉन स्टिक भांड्यांमध्ये जेवण करा. कारण यात लवकर स्वंयपाक होतो.  याशिवाय  नॉनस्टिक भांड्यात जेवण चिकटण्याची भिती नसते. अनेकदा फ्रिजमधून दूध काढून  किंवा अन्य सामान काढून  त्वरीत गॅसवर चढवले जाते. ज्यामुळे दूध गरम करायला जास्त गॅस लागतो.

मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

५) फ्रिजमधून कोणतीही वस्तू  काढल्यानंतर ती सामान्य टेंम्परेचरवर येऊ द्या त्यानंतर गॅसवर गरम होण्यासाठी ठेवा. हे उपाय  केल्यास गॅस सिलेंडर कमी प्रमाणात लागेल आणि याचा तुम्ही दीर्घकाळ वापर करू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स