Lokmat Sakhi >Food > हिरव्यागार मटारचा सिझन संपत आला! पाहा मटार वर्षभर टिकवून ठेवण्याच्या सोप्या टिप्स, करा लवकर

हिरव्यागार मटारचा सिझन संपत आला! पाहा मटार वर्षभर टिकवून ठेवण्याच्या सोप्या टिप्स, करा लवकर

Simple Home Hacks To Store Green Peas For Years: मटारचा सिझन संपत आला आहे. त्यामुळेच ते आता स्टोअर कसे करून ठेवायचे ते पाहा...(how to save green matar or green peas for long?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 16:49 IST2025-02-20T09:15:40+5:302025-02-20T16:49:55+5:30

Simple Home Hacks To Store Green Peas For Years: मटारचा सिझन संपत आला आहे. त्यामुळेच ते आता स्टोअर कसे करून ठेवायचे ते पाहा...(how to save green matar or green peas for long?)

how to save green matar or green peas for long, simple home hacks to store green peas for years  | हिरव्यागार मटारचा सिझन संपत आला! पाहा मटार वर्षभर टिकवून ठेवण्याच्या सोप्या टिप्स, करा लवकर

हिरव्यागार मटारचा सिझन संपत आला! पाहा मटार वर्षभर टिकवून ठेवण्याच्या सोप्या टिप्स, करा लवकर

Highlightsमटार जास्त दिवस ताजे, फ्रेश राहावेत यासाठी ते काेणत्या पद्धतीने साठवून ठेवावेत याविषयी काही खास टिप्स..

हिरव्यागार, कोवळ्या मटारच्या शेंगा हे हिवाळ्याचं खास आकर्षण असतं. त्याच्यापासून कित्येक वेगवेगळे पदार्थही अगदी हौशीने तयार केले जातात. हिवाळा जसा सरत जातो तसं तसं या शेंगा विकायला येणंही कमी होऊन जातं. त्यानंतर मग फ्रोजन मटार विकत घेऊन खावे लागतात. हे फ्रोजन मटार तसे खूपच महाग असतात. त्यामुळे दरवेळी ते घेणं परवडत नाही. म्हणूनच आता विकतचे महागडे फ्रोजन मटार घेण्यापेक्षा सध्या अगदी स्वस्त ताजे मटार मिळत आहेत (simple home hacks to store green peas for years). ते भरपूर प्रमाणात घ्या आणि एकदमच साठवून ठेवा. मटार जास्त दिवस ताजे, फ्रेश राहावेत यासाठी ते काेणत्या पद्धतीने साठवून ठेवावेत याविषयी काही खास टिप्स..(how to save green matar or green peas for long?)

 

मटार वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी टिप्स

१. मटारच्या शेंगा आपण जेव्हा बाजारातून विकत घेतो तेव्हा काही शेंगा अगदीच कोवळ्या असतात आणि त्यांचा दाणासुद्धा चवीला गोडसर असतो. असे लहान दाणे लवकर खराब होतात. त्यामुळे शेंगा निवडताना अशा कोवळ्या शेंगांचे लहान दाणे आधीच बाजूला काढून ठेवा आणि ते वेगळ्या पदार्थांसाठी वापरून टाका. मोठ्या आकाराचे पुर्ण भरलेले दाणेच स्टोअर करण्यासाठी वापरावे, कारण ते जास्त टिकतात.

दही की ताक? तुमच्या आरोग्यासाठी दोन्हीपैकी अधिक चांगलं काय? बघा कसं ओळखायचं... 

२. निवडून घेतलेले दाणे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरा. तुम्ही यासाठी झिपलॉक बॅगसुद्धा वापरू शकता. दाणे भरून तुम्ही जेव्हा बॅग पॅक कराल तेव्हा त्यातली हवा शक्य तेवढी काढून घ्या आणि घट्ट गाठ मारून पिशवी फ्रिजरमध्ये ठेवून द्या.


 

३. एअरटाईट डब्यांमध्येही तुम्ही मटारचे दाणे घालून ते साठवू शकता.

४. काही जण असंही सांगतात की मटारच्या दाण्यांना हलकेसे मोहरीचे तेल लावून ठेवावे. यामुळे दाणे खराब न होता जास्त दिवस टिकण्यास मदत होते.

Shower Head Cleaning: शॉवरच्या छिद्रांमध्ये अडकलेली घाण हातही न लावता स्वच्छ करण्याचा भन्नाट उपाय 

५. कॅप्सूल मटार किंवा पेन्सिल मटार हा मटारचा प्रकार बाजारात मिळतो. जर तुम्हाला मटार जास्त दिवस साठवून ठेवायचे असतील तर या प्रकारचे मटार वापरा. कारण या मटारमध्ये स्टार्च जास्त प्रमाणात असल्याने ते जास्त दिवस टिकतात, असं काही जण सांगतात. 

 

Web Title: how to save green matar or green peas for long, simple home hacks to store green peas for years 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.