पावसाळ्यात घरातल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. त्यात स्वयंपाकघराची तर फारच. स्वयंपाकघराच्या स्वच्छतेपासून् स्वयंपाकाच्या जिन्नसापर्यत प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. पावसाळ्यात ओल्या आणि आर्द्र हवेमुळे स्वयंपाकाच्या जिन्नसात किडे, अळ्या लागून (bugs in foos) ते खराब होण्याची शक्यता असते. थोडंसं दुर्लक्ष झालं तर किडे अळ्यांमुळे रवा/ बेसन टाकून देण्याची वेळ येते. तांदळाला, गव्ह्याच्या पिठाला लागलेले किडे स्वयंपाक करतानाचा वैताग वाढवतात. हे असं होवू नये म्हणून पावसाळ्यात वेळीच काळजी (how to take care of food in rainy season) घ्यायला हवी. त्यासाठी फार वेळ खर्च करण्याची आणि कष्ट करण्याची गरज नाही. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांचा खुबीने उपयोग करुन स्वयंपाकाच्या जिन्नसाला किड लागण्यापासून वाचवता येतं. आणि जरी किड लागली तरी मसाल्याच्या पदार्थांनी किड लवकर दूर होते. मसाल्याशी निगडित सोप्या युक्त्यांनी (tips for protect food from bugs) स्वयंपाकघरातलं प्रत्येक जिन्नस नीट नेटकं राहू शकतं.
Image: Google
1. रव्याला किडे लागू नये म्हणून रव्याच्या डब्यात लवंगा टाकून ठेवाव्या. रव्यात असलेले किडेही निघून जातात.
2. रव्यात दालचिनीचा मोठा तुकडा ठेवल्यास किड लागत नाही. मात्र रव्याला दालचिनीचा वास येण्याची शक्यता असते. रव्यात अळ्या होवू नये म्हणून रव्यात मोठी वेलची किंवा स्टार फुल ठेवावं.
Image: Google
3. पावसाळ्यात तांदळाला पाकोळ्या , पोरकिडे होतात किंवा अळ्या होतात. ते होवू नये म्हणून तांदळाच्या डब्यात 3-4 तमालपत्रं ठेवावी. तमालपत्रांमुळे किडे होत नाही आणि असलेले किडेही निघून जातात.
4. तांदळात किडे होवू नये म्हणून सूती कपड्यात मोठी वेलची बांधून ठेवावी. यामुळे किडे होत नाही आणि वेलची कपड्यात बांधून ठेवल्यानं तांदळाला वेलचीचा वासही लागत नाही.
5. कणकेत किंवा डाळीच्या पिठातही पावसाळ्यात किडे होतात. ते होवू नये म्हणून सूती कपड्यात 3-4 लवंगा, 7-8 मिरे बांधून ती पुरचुंडी कणकेत आणि डाळीच्या पीठात ठेवावी. कणकेतले किडे निघून जाण्यासाठी लवंग आणि तमालपत्रं यांचाही उपयोग करता येतो.