Lokmat Sakhi >Food > नवाकोरा दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य करण्याची पाहा योग्य पद्धत, फार झंझट नाही - अवघड तर काहीच नाही...

नवाकोरा दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य करण्याची पाहा योग्य पद्धत, फार झंझट नाही - अवघड तर काहीच नाही...

How to Season a Brand New Mortar & Pestle : Stone Khalbatta : दगडी खलबत्ता विकत तर आणला, पण तो वापरण्यायोग्य करण्याची पद्धत माहित नाही ? या घ्या सोप्या टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2024 12:55 PM2024-07-02T12:55:30+5:302024-07-02T13:07:57+5:30

How to Season a Brand New Mortar & Pestle : Stone Khalbatta : दगडी खलबत्ता विकत तर आणला, पण तो वापरण्यायोग्य करण्याची पद्धत माहित नाही ? या घ्या सोप्या टिप्स...

How to Season a Brand New Mortar and Pestle How to Season a Mortar and Pestle Stone Khalbatta | नवाकोरा दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य करण्याची पाहा योग्य पद्धत, फार झंझट नाही - अवघड तर काहीच नाही...

नवाकोरा दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य करण्याची पाहा योग्य पद्धत, फार झंझट नाही - अवघड तर काहीच नाही...

खलबत्ता हा अनेकींच्या किचनमध्ये असतोच. खलबत्त्याचा आपण रोज फारसा वापर करत नाही. याचा नियमित फारसा वापर होत नसला तरी तो किचनमध्ये (Basics of the Kitchen Tool) असणे महत्वपूर्ण असते. काही विशेष पदार्थ करायचा असेल तरच या खलबत्त्याचा वापर केला जातो. पूर्वी मिक्सर नसल्यामुळे पाटा - वरवंटा आणि खलबत्त्याचा (Mortar & Pestle) वापर पदार्थ बारीक करण्यासाठी होत असे. परंतु आता मिक्सर असल्यामुळे आपण या खलबत्त्यांचा वापर जास्त करत नाही. अगदीच आपल्याला घाईच्या वेळी मिक्सर लावायला वेळ नसेल किंवा जाडसर भरड पेस्ट हवी असेल तरच आपण खलबत्त्याचा वापर करतो. अनेक भारतीय घरांमध्ये चहा बनवला जातो तेव्हा आले आणि वेलची ठेचण्यासाठी खलबत्ता वापरतात. अनेकवेळा भाजीमध्ये लसूण, मसाले, आले आणि हिरवी मिरची वगैरे कूटण्यासाठी खलबत्ता (Stone Khalbatta) वापरतात. एवढाच काय तो आपण खलबत्त्याचा वापर करतो.

 अनेक घरांमध्ये अ‍ॅल्युमिनियम, लोखंड किंवा दगडी खलबत्त्याचा वापर केला जातो. काहीजण दगडी खलबत्त्याच्या ऐवजी मेटलचा खलबत्ता आणतात.  मेटलच्या खलबत्त्यात मसाले चांगल्या प्रकारे कुटले जात नाही. यासाठी दगडी खलबत्त्याचा (When you buy a new Stone Khalbatta, the following steps need to be done & only after that it’s ready to use) वापर करावा लागतो . दगडी खलबत्ता वजनी असल्यामुळे त्यात मसाले चांगल्या प्रकारे कुटले जाते. त्यातही काळ्या दगडाचा खलबत्ता अतिशय चांगला मानला जातो. दगडी खलबत्ता वापरण्यापूर्वी तो वापरण्यायोग्य करावा लागतो. यासाठी दगडी खलबत्ता (Khalbatta) नेमका वापरण्यायोग्य करण्याची सोपी पद्धत पाहूयात. 

नवाकोरा दगडी खलबत्ता वापरण्यायोग्य कसा करावा ? 

१. सगळ्यांतआधी स्क्रबरच्या मदतीने हा दगडी खलबत्ता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 

२. त्यानंतर या खलबत्त्यात भिजवलेले तांदूळ गोल गोल पद्धतीने फिरवून वाटून घ्यावेत. या भिजवलेल्या तांदुळाची जी पेस्ट तयार होतील ती पेस्ट संपूर्ण खलबत्त्याला आतून - बाहेरून लावून हातांनी खलबत्ता रगडून घ्यावा. त्यानंतर पाण्याने खलबत्ता धुवून घ्यावा. 

३. आता सुक्या खोबऱ्याची एक वाटी घेऊन ती गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्या. त्यानंतर हे सुकं खोबर गरम असतानाच खलबत्त्यात घाला त्यावर १ टेबलस्पून मीठ घाला. आता हे खलबत्त्यांत व्यवस्थित बारीक पूड होईपर्यंत कुटून घ्या. याची बारीक पूड झाल्यावर ही पूड संपूर्ण खलबत्त्याला लावून याने खलबत्ता घासून घ्या. त्यानंतर पाण्याने खलबत्ता स्वच्छ धुवून घ्या. 

फणसाचे गरे पोटाला बरे, म्हणूनच खा फणसाचे कुरकुरीत वेफर्स - कोकणी पद्धतीची पारंपरिक रेसिपी...

४. पाण्याने खलबत्ता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो संपूर्णपणे कोरडा करुन घ्यावा. खलबत्ता कॉटनच्या फडक्याने पुसून घ्यावा. त्यानंतर मोहरीचे तेल किंवा कोणत्याही प्रकारचे कुकिंग ऑइल घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करून ते संपूर्ण खलबत्त्याला लावून घ्यावे. असा हा तेल लावलेला खलबत्ता रात्रभर तसाच ठेवून द्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळी हा खलबत्ता नुसत्या पाण्याने धुवून घ्यावा. 

५. सगळ्यांत शेवटी ४ ते ५ लसूण पाकळ्या, आल्याचा लहान तुकडा, चमचाभर जिरे खलबत्त्यात घालून कुटून घ्यावे. त्यानंतर पुन्हा एकदा हा खलबत्ता पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. 

अशाप्रकारे आपला दगडी खलबत्ता हा वापरण्यायोग्य होईल. 

एकदाच बनवून ठेवा हे डोसा प्रिमिक्स आणि अगदी १० मिनिटांत करा उडुपी डोसा...

उरलेल्या भाताचा नेहमी फोडणीचा भातच का करावा ? ही घ्या एक झटपट होणारी मसालेदार रेसिपी... 

रोज खलबत्ता वापरून झाल्यावर कसा स्वच्छ करावा ?

दगडी खलबत्ता स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबू व बेकिंग सोड्याचा देखील वापर करू शकता. खलबत्यात घाण साचून राहते. ती स्वच्छ करण्यासाठी आपण लिंबाच्या रसात बेकिंग सोडा घालूंन त्याचे मिश्रण वापरून खलबत्ता स्वच्छ करु शकता. त्याचबरोबर पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळा आणि हा घोळ खलबत्त्यात घालून काही वेळ तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.

Web Title: How to Season a Brand New Mortar and Pestle How to Season a Mortar and Pestle Stone Khalbatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.