Join us  

उपम्यासाठी परफेक्ट रवा कसा निवडाल? सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्या खास टिप्स, चविष्ट उपमा करायचा तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 6:23 PM

Special Tips And Tricks For Making Upma: कधी कधी उपमा एकदमच चिकट, आसट होऊन जातो. नेमकं असं का होतं कुठे चुकतं याविषयीच तर सांगत आहेत, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur). 

ठळक मुद्देउपम्यासाठी परफेक्ट रवा कसा निवडायचा, याविषयीचा एक छोटासा पण अतिशय उपयुक्त ठरणारा व्हिडिओ सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

उपमा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. सकाळी नाश्त्याला उपमा (upma as a breakfast) केला की तो अगदी पोट भरूनही होतो शिवाय पौष्टिकही असतो. उपमा पचायला हलका असल्याने घरातल्या लहान- मोठ्या व्यक्तींना तर चालतोच, पण आजारी व्यक्तींनाही तो आपण देऊ शकतो. पण बऱ्याचदा उपमा करण्यासाठी रव्याची निवड चुकली तर सगळाच रंगाचा बेरंग होतो आणि उपम्याची चव तसंच त्याचं टेक्स्चर हे दोन्हीही बिघडून जातं. त्यामुळे उपम्यासाठी परफेक्ट रवा कसा निवडायचा (How to select perfect sooji or rava for making upma), याविषयीचा एक छोटासा पण अतिशय उपयुक्त ठरणारा व्हिडिओ सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Tips for making delicious upma)

 

या व्हिडिओमध्ये ते सांगत आहेत की सामान्यपणे बाजारात रव्याचे दोन प्रकार मिळतात. त्यापैकी एक रवा अगदी बारीक असतो, तर दुसरा रवा जाडाभरडा, दाणेदार असतो.

कांदा अगदी बारीक, दाणेदार चिरण्यासाठी ही बघा सोपी ट्रिक, झटपट चिरून होतील कांदे

जो बारीक रवा असतो तो पुरी, डोसा किंवा पराठा, थालिपीट यांच्या पिठामध्ये घालायला वापरावा. आणि जो जाडसर रवा असतो तो नेहमी उपमा करण्यासाठी वापरावा. जर जाड रव्याऐवजी बारीक रवा वापरून तुम्ही उपमा करत असाल तर तो खूपच जास्त आसट आणि चिकट होऊन जातो. एखाद्या पेस्टप्रमाणे तो एकजीव होतो. असा उपमा खायला अनेकांना आवडत नाही. 

 

चवदार उपमा करण्यासाठी काही टिप्स१. सगळ्यात पहिली सूचना तर कुणाल कपूर यांनीच केली आहे. ती म्हणजे उपम्यासाठी नेहमी जाडसर रवा वापरावा. २. उपमा करताना आपण रवा भाजून घेतो. रवा खूप जास्त लालसर होऊ देऊ नये. तसेच अगदी पांढरटही ठेवू नये. त्यांचा रंग हलकासा बदललेला असेल, अशा पद्धतीने रवा भाजावा.

कोवळ्या मुगाच्या शेंगांची झणझणीत आमटी! नेहमीच्या भाज्या- वरणाचा कंटाळा आला, करून बघा चवदार रेसिपी ३. रवा भाजताना गॅस नेहमी मंद ते मध्यम ठेवावा. मोठ्या गॅसवर रवा भाजल्यास रव्याचा काही भाग जळतो, तर काही भाग कच्चाच राहतो.४. फोडणी झाल्यानंतर कढईत रवा शिजण्यासाठी जे पाणी घालाल, ते नेहमी गरम असावं. थंड पाणी वापरलं तर उपम्यात गाठी होतात.५. उपम्यात पाण्याचा अंदाज परफेक्ट असावा. साधारण एक वाटी रवा असेल तर त्याला दुप्पट पाणी टाकावं. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुणाल कपूरकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.