हिवाळा असो किंवा उन्हाळा दुपारच्या जेवणात दही खाण्याची सवय अनेकांना असते. काहीजण थंडीच्या दिवसात दही खाणं टाळतात पण त्यांच्या आहारात कढी किंवा दह्याच्या इतर पदार्थांचा समावेश असतोच. (How To Set Curd In Winter) बाजारातून आणलेलं दही फारसं चविष्ट लागतंच असं नाही आणि थंडीच्या दिवसात घरात दही बनवणं अवघड होतं. वातावरणात गारवा असल्यानं दही लवकर गोठत नाही. दही लावण्याच्या सोप्या ट्रिक्स समजून घेऊया. जेणेकरून तुम्हाला फ्रेश दह्याचे पदार्थ बनवता येतील. (2 Secret Tricks to Making Perfect, Creamy Yogurt in the Cold)
१) सगळ्यात आधी फूल फॅट दूध एका पातेल्यात घालून उकळून घ्या. या दुधावर साय येणार नाही याची काळजी घ्या आणि ढवळत राहा. दूध थंड करायला ठेवा आणि बिटरच्या मदतीनं दुधावर बुडबुडे येईपर्यंत फिरवून घ्या. कुकरमध्ये गरम पाणी घालून एक स्टॅण्ड ठेवा. त्यानंतर एका पातेल्यात तळाशी विरजण लावून त्यात वरून दूध घाला. त्यानंतर हे भांडं कुकरमध्ये ठेवून झाकण बंद करून ४ तासांसाठी दही सेट होण्यासाठी ठेवा.
२) एका भांड्यात दह्याचं विरजण घालून त्यात कोमट दूध घाला आणि ढवळून घ्या. एक भांडं चपातीच्या डब्यात ठेवा आणि झाकण लावा. मग हा डबा एका कापडात गुंडाळून घ्या. काही तासातच मलईदार दही तयार होईल.