उन्हाळ्यात आहारात दह्याचा प्रमाण वाढतं (Curd Making). दही खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. भारतीय स्वयंपाकामध्ये कढी, ताक, मठ्ठा, कोशिंबिरीमध्ये दह्याचा वापर केला जातो (Dahi). निरोगी आणि सृदृढ शरीरप्रकृतीसाठी दररोजच्या आहारात कमीतकमी एक वाटी दह्याचा जरूर समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण विकतचे दही खाण्यापेक्षा घरगुती दही खाणे केव्हाही उत्तम. पण घरी दही लावल्यास विकतसारखी चव दह्याला येत नाही. किंवा दह्याला हवा तसा घट्टपणा येत नाही.
तर काही वेळेला ८ तास उलटूनही व्यवस्थित दही लागत नाही. जर आपल्याला विकतपेक्षा घरीच घट्ट दही लावायचं असेल तर, प्रेशर कूकरचा वापर करा. आता तुम्ही म्हणाल प्रेशर कूकरमध्ये ते पण दही? कसं शक्य आहे? तर हो, आपण अवघ्या १५ मिनिटात प्रेशर कूकरमध्ये दही तयार होईल. ते कसे पाहूयात(How To Set Thick Curd in 15 minute at pressure cooker).
दही लावण्याची युनिक ट्रिक(Dahi Making in Marathi)
लागणारं साहित्य
ना डाळ - ना सोडा, कपभर तांदुळ घ्या, करा मऊ जाळीदार नारळाचा डोसा! पौष्टिक आणि पोटभर
दही
हिरवी मिरची
अशा पद्धतीने लावा दही
सर्वप्रथम, एका भांड्यात दूध गरम करण्यासाठी ठेवा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. दूध कोमट झाल्यानंतर गॅस बंद करा. आता एक मातीचा छोटा माठ घ्या. माठ स्वच्छ धुवून घ्या. एका बाऊलमध्ये ३ चमचे दही घ्या. दही चमच्याने फेटून घ्या, व माठाच्या आत दही लावून कव्हर करा.
पोटाचे विकार छळणाऱ्यांनी दहीभात खावा का? न्यूट्रिशनिस्ट सांगतात, दही - भात खाण्याचे फायदे..
छोट्या माठाच्या आत दही लावून कव्हर केल्यानंतर त्यात दूध ओता, व त्यात एक हिरवी मिरची घाला. ॲल्युमिनियम फॉइलने कव्हर करा. आता प्रेशर कूकरमध्ये पाणी घालून गॅसवर ठेवा. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवा. त्यात छोटा माठ ठेवा. त्यावर प्रेशर कूकरचं झाकण लावा, व त्याची शिटी काढून ठेवा. १५ मिनिटानंतर गॅस बंद करा. माठ बाहेर काढून ठेवा.
थंड झाल्यानंतर ॲल्युमिनियम फॉइल काढून, त्यातून हिरवी मिरची देखील काढा. अशा प्रकारे १५ मिनिटात घट्टसर दही खाण्यासाठी रेडी.