हिवाळ्यात दही तयार व्हायला खूप वेळ लागतो. शिवाय दही व्यवस्थित लागत नाही, पातळ होतं अशी अनेक जणींची तक्रार असते. थंडीमुळे बऱ्याचदा दूध विरझून त्याचं दही व्हायला वेळ लागतो. शिवाय आपण ते जास्त वेळ बाहेर ठेवलं तर मग दह्याला वास लागतो. असं दही मग खावं वाटत नाही. म्हणूनच दही लावताना या काही साध्या- सोप्या गोष्टी लक्षात ठेवा (How to make curd). फक्त हिवाळ्यातच नाही, तर एरवीही वर्षभर याच पद्धतीने दही लावा (how to set curd in few hours in winter?). एकदम घट्ट, खूप अंबट नसणारं अगदी गोड- मधूर चवीचं दही कसं लावायचं ते पाहा.. ( simple trick for setting very thick curd in winter)
दही लावण्याची योग्य पद्धत
घट्ट गोड दही लावण्याची पद्धत rekhadiwekar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
यामध्ये असं सांगितलं आहे की दही लावण्यासाठी सिरॅमिकचं किंवा मग मातीचं भांडं वापरणं अधिक चांगलं.
१ लिटरची तेलाची स्मार्ट बुधली घ्यायची? पाहा ३ पर्याय, स्वस्तात मस्त आणि भरपूर टिकाऊ
तर सगळ्यात आधी दही लावण्यासाठी दूध थोडं कोमट करून घ्या. दही लावण्यासाठीचं दूध कोमटच असावं, याची काळजी घ्या. कारण खूप थंड, रुम टेम्परेचरचं किंवा गरम, कडक दूध असेल तर दही चांगलं लागत नाही. त्यामुळे दही लावण्यासाठीचं दूध नेहमी कोमटच असावं.
कोमट केलेलं दूध सिरॅमिकच्या किंवा मातीच्या भांड्यात ओता. यानंतर यात फक्त २ थेंब ताक किंवा २ थेंब दही घाला. एवढंच दही किंवा ताक विरझण म्हणून पुरेसं आहे.
तुळस सुकली- पानं गळू लागले? हिवाळ्यात तुळशीची काळजी घेण्यासाठी ३ टिप्स- पुन्हा होईल हिरवीगार
यानंतर भांड्याला घट्ट झाकण लावून टाका आणि ७ ते ८ तास त्याला अजिबात हलवू नका.
उन्हाळ्याच्या दिवसांत ४ ते ५ तासांत दही तयार होतं. पण हिवाळ्यात मात्र ते ८- ९ तास ठेवावं लागतं.
हिवाळ्यात पटकन दही लागावं म्हणून उपाय
हिवाळ्यात दही तयार होण्यासाठी खूप वेळ लागू नये म्हणून दही ज्या भांड्यात लावणार आहात त्या भांड्याच्या तोंडावर आधी वर्तमान पत्राची एक घडी ठेवा आणि त्यानंतर झाकण लावा.
World Saree Day: ऐश्वर्या की शिल्पा? बघा कोणत्या अभिनेत्रीने नेसली सगळ्यात महागडी साडी
तसेच त्या भांड्यावर एखादी शाल किंवा टॉवेल टाका आणि ते भांडं पुर्णपणे झाकून ठेवा. यामुळे भांड्याला उब मिळेल आणि दही लवकर विरझेल.