Lokmat Sakhi >Food > छोले- भटूरे करायचे, पण छोले भिजत टाकायलाच विसरलात? सोपा उपाय- १ तासात भिजतील हरबरे

छोले- भटूरे करायचे, पण छोले भिजत टाकायलाच विसरलात? सोपा उपाय- १ तासात भिजतील हरबरे

Cooking Tips For Soaking Chana: छोले भिजत टाकायलाच आपण विसरलो, तर ऐनवेळी काय करावं बरं? बघा १ सोपी ट्रिक (how to soak chhole or chickpeas instantly?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2024 04:00 PM2024-11-30T16:00:36+5:302024-11-30T16:01:19+5:30

Cooking Tips For Soaking Chana: छोले भिजत टाकायलाच आपण विसरलो, तर ऐनवेळी काय करावं बरं? बघा १ सोपी ट्रिक (how to soak chhole or chickpeas instantly?)

how to soak chhole or chickpeas instantly, how to soak chana in 1 hour  | छोले- भटूरे करायचे, पण छोले भिजत टाकायलाच विसरलात? सोपा उपाय- १ तासात भिजतील हरबरे

छोले- भटूरे करायचे, पण छोले भिजत टाकायलाच विसरलात? सोपा उपाय- १ तासात भिजतील हरबरे

Highlightsकेवळ छोले भिजत टाकायला विसरलात म्हणून तुमचा मेन्यू बदलण्याची वेळ येणार नाही...

बऱ्याचदा असं होतं की कधीतरी आपला छोले भटूरे किंवा छोले उसळ किंवा असंच छोले वापरून आणखी काहीतरी करायचा विचार असतो. आता छोले वापरून कोणताही पदार्थ करायचा म्हटलं तरी सगळ्यात आधी आपल्याला छोले भिजत घालावे लागतात. चांगले ७ ते ८ तास ते जेव्हा पाण्यात भिजत घातले जातात, तेव्हा त्यानंतर त्यांच्यामध्ये थोडा मऊपणा येतो आणि मग ते शिजवण्यासाठी तयार असतात. पण जर आपण छोले भिजत टाकायचंच विसरलो, तर अशावेळी काय करावं हे एकदा पाहून घ्या (how to soak chhole or chickpeas instantly?).. म्हणजे मग केवळ छोले भिजत टाकायला विसरलात (how to soak chana in 1 hour?) म्हणून तुमचा मेन्यू बदलण्याची वेळ येणार नाही...(how to soak chana in 1 hour?)

 

छोले इंस्टंट पद्धतीने कसे भिजवावे?

१. झटपट छोले भिजवण्याची एक अतिशय सोपी पद्धत बघा. यामध्ये सगळ्यात आधी एका भांड्यात गरम पाणी करा. तुमचे छोले जेवढे असतील त्याच्या साधारण तिप्पट अगदी कडक पाणी करा.

नैनीतालच्या लोकांना आवडते आहे कांदा- लसूणची खीर!! हा कोणता पदार्थ- का झाला एवढा लोकप्रिय?

त्यानंतर छोले एका हॉटपॉटमध्ये घ्या. त्यामध्ये कडक पाणी टाका आणि हॉटपॉटचं झाकण लावून ठेवा. एखाद्या तासात छोले व्यवस्थित भिजलेले असतील.


 

२. दुसरी पद्धत म्हणजे एका पातेल्यात छोले घ्या. छोले पुर्णपणे पाण्यात भिजतील आणि साधारण जेवढे छोले असतील त्याच्यावर दोन- तीन इंच जास्त राहील एवढं पाणी त्यात घाला.

कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह, जिलेटीन न घालता करा पेरूची जेली, फक्त ३ पदार्थ वापरून होणारी सोपी रेसिपी 

यानंतर हे पातेले गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याला १० ते १५ मिनिटे उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि पातेल्यावर झाकण ठेवून द्या. साधारण २ तासांत छोले बऱ्यापैकी मऊ झालेले असतील.

 

३. तिसरी पद्धत म्हणजे छोले कुकरमध्ये टाका. त्यात जेवढे छोले असतील त्याच्यावर दोन- तीन इंच जास्त राहील एवढं पाणी घाला. चिमूटभर बेकिंग सोडा घाला.

टाकाऊ पेनांपासून आकर्षक हेअर स्टीक बनविण्याची भन्नाट युक्ती! ५ मिनिटांत होईल तयार- दिसेल सुंदर

कारण बेकिंग सोड्यामुळे छोले पटकन मऊ होतात. यानंतर गॅस मोठा ठेवून ३ ते ४ शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर मंद आचेवर पुन्हा १० ते १५ मिनिटे छोले शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. कुकरचं प्रेशर गेल्यावर ते उघडा. छोले व्यवस्थित नरम झाले असतील. 

 

Web Title: how to soak chhole or chickpeas instantly, how to soak chana in 1 hour 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.