Lokmat Sakhi >Food > साबुदाणा नीट भिजतच नाही? कधी कच्चा राहतो तर कधी खिचडी खूपच गचका होते? बघा २ सोप्या ट्रिक्स...

साबुदाणा नीट भिजतच नाही? कधी कच्चा राहतो तर कधी खिचडी खूपच गचका होते? बघा २ सोप्या ट्रिक्स...

2 Methods For Soaking Sabudana Properly: साबुदाणा चांगला भिजला तरच त्याची खिचडी चवीला चांगली लागते. पण बऱ्याच जणींना नेमकी त्यातच अडचण येते. म्हणूनच साबुदाणा कशा पद्धतीने भिजवावा, याच्या या २ सोप्या ट्रिक्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 06:59 PM2023-01-11T18:59:39+5:302023-01-11T19:01:02+5:30

2 Methods For Soaking Sabudana Properly: साबुदाणा चांगला भिजला तरच त्याची खिचडी चवीला चांगली लागते. पण बऱ्याच जणींना नेमकी त्यातच अडचण येते. म्हणूनच साबुदाणा कशा पद्धतीने भिजवावा, याच्या या २ सोप्या ट्रिक्स.

How to soak sabudana perfectly to make non-sticky Sabudana Khichdi, How to soak sabudana within 2 hour? | साबुदाणा नीट भिजतच नाही? कधी कच्चा राहतो तर कधी खिचडी खूपच गचका होते? बघा २ सोप्या ट्रिक्स...

साबुदाणा नीट भिजतच नाही? कधी कच्चा राहतो तर कधी खिचडी खूपच गचका होते? बघा २ सोप्या ट्रिक्स...

Highlightsसाबुदाणा चांगला भिजला नाही किंवा गरजेपेक्षा खूप जास्त भिजला तरी खिचडीची चव परफेक्ट जमून येत नाही. म्हणूनच साबुदाणा उत्तम भिजविण्याच्या या २ पद्धती पाहून घ्या..

साबुदाण्याची खिचडी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. अनेक घरांमध्ये आठवड्यातून एकदा उपवासाच्या निमित्ताने साबुदाणा खिचडी केलीच जाते. काही घरांमध्ये साबुदाणे वडे खूप आवडतात. त्यामुळे मग महिन्यातून एकदा उपवास नसतानाही गरमागरम साबुदाणे वडे तळण्याचा बेत अनेक घरांमध्ये आखला जातो. पण अशावेळी जर तुमचा साबुदाणा चांगला भिजलेला असेल, तरच साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणे वडे खाण्यात मजा आहे. साबुदाणा चांगला भिजला नाही किंवा गरजेपेक्षा खूप जास्त भिजला तरी खिचडीची चव परफेक्ट जमून येत नाही. म्हणूनच साबुदाणा उत्तम भिजविण्याच्या या २ पद्धती पाहून घ्या..(How to soak sabudana perfectly)

साबुदाणा भिजविण्याच्या योग्य पद्धती (proper method of soaking sabudana)
या पद्धती इन्स्टाग्रामच्या seemassmartkitchen या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.
१. साबुदाणा कमी वेळेत भिजवायचा असेल तर..
कधी कधी उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचा लक्षातच राहात नाही. अशावेळी ही पद्धत वापरा. ही पद्धत वापरून २ तासांतच साबुदाणा चांगला भिजतो.

थंडीच्या दिवसांत इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित खा ७ पदार्थ, तब्येत वर्षभर ठणठणीत

यासाठी सगळ्यात आधी साबुदाणा २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भांड्यात भरपूर पाणी घालून त्यात साबुदाणा भिजवा. त्यावर झाकण ठेवून द्या. एखाद्या तासाने भांड्यातलं सगळं पाणी काढून टाका आणि पुन्हा भांड्यावर झाकण ठेवून साबुदाणा भिजू द्या. पुढच्या एक तासात साबुदाणा चांगला भिजलेला असेल. 

 

२. साबुदाणा भिजविण्याची दुसरी पद्धत
यामध्येही साबुदाणा २ ते ३ वेळा पाण्याने धुवून घ्या.

नाटू.. नाटू म्हणत गोल्डन ग्लाेब पुरस्कार जिंकणाऱ्या 'RRR' स्टार्ससोबत उपासना कामिनेनीचीही चर्चा, पाहा फोटो

त्यानंतर साधारण १ वाटी साबुदाणा असेल तर तो अर्धी वाटी पाण्यात भिजत घाला आणि भांड्यावर झाकण ठेवून द्या. ७ ते ८ तासांत साबुदाणा चांगला भिजला जाईल. 

 

Web Title: How to soak sabudana perfectly to make non-sticky Sabudana Khichdi, How to soak sabudana within 2 hour?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.