साबुदाण्याची खिचडी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. अनेक घरांमध्ये आठवड्यातून एकदा उपवासाच्या निमित्ताने साबुदाणा खिचडी केलीच जाते. काही घरांमध्ये साबुदाणे वडे खूप आवडतात. त्यामुळे मग महिन्यातून एकदा उपवास नसतानाही गरमागरम साबुदाणे वडे तळण्याचा बेत अनेक घरांमध्ये आखला जातो. पण अशावेळी जर तुमचा साबुदाणा चांगला भिजलेला असेल, तरच साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणे वडे खाण्यात मजा आहे. साबुदाणा चांगला भिजला नाही किंवा गरजेपेक्षा खूप जास्त भिजला तरी खिचडीची चव परफेक्ट जमून येत नाही. म्हणूनच साबुदाणा उत्तम भिजविण्याच्या या २ पद्धती पाहून घ्या..(How to soak sabudana perfectly)
साबुदाणा भिजविण्याच्या योग्य पद्धती (proper method of soaking sabudana)या पद्धती इन्स्टाग्रामच्या seemassmartkitchen या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.१. साबुदाणा कमी वेळेत भिजवायचा असेल तर..कधी कधी उपवासाच्या दिवशी साबुदाणा भिजत घालायचा लक्षातच राहात नाही. अशावेळी ही पद्धत वापरा. ही पद्धत वापरून २ तासांतच साबुदाणा चांगला भिजतो.
थंडीच्या दिवसांत इम्युनिटी वाढवण्यासाठी नियमित खा ७ पदार्थ, तब्येत वर्षभर ठणठणीत
यासाठी सगळ्यात आधी साबुदाणा २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भांड्यात भरपूर पाणी घालून त्यात साबुदाणा भिजवा. त्यावर झाकण ठेवून द्या. एखाद्या तासाने भांड्यातलं सगळं पाणी काढून टाका आणि पुन्हा भांड्यावर झाकण ठेवून साबुदाणा भिजू द्या. पुढच्या एक तासात साबुदाणा चांगला भिजलेला असेल.
२. साबुदाणा भिजविण्याची दुसरी पद्धतयामध्येही साबुदाणा २ ते ३ वेळा पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर साधारण १ वाटी साबुदाणा असेल तर तो अर्धी वाटी पाण्यात भिजत घाला आणि भांड्यावर झाकण ठेवून द्या. ७ ते ८ तासांत साबुदाणा चांगला भिजला जाईल.