Join us  

मटकीला भरपूर आणि लांबसडक मोड येण्यासाठी १ सोपी ट्रिक, मटकीची उसळ होईल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 4:46 PM

How to Sprout Matki, Moth Beans Know Trick मटकीला मोड आले नाही, नीट भिजली नाही तर उसळीची चव बिघडतेच.

फळे, भाज्या यासह कडधान्य खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यातून आपल्या शरीराला आवश्यक अन्नघटक मिळतात. मटकीमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते, यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. याव्यतिरिक्त शरीराला ऊर्जा देखील मिळते. यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी देखील आढळते, यामुळे आपले शरीर निरोगी राहते.

महाराष्ट्रात तरी मटकीची उसळ फार फेमस आहे. मटकी भिजत घालणे देखील एक कला आहे. मटकी योग्यप्रकारे भिजली नाही तर ती खाताना टचटचीत लागते. लवकर शिजतही नाही. आणि मटकीला उत्तम मोड येणंही फार महत्त्वाचं असतं. त्यासाठीच मटकी भिजत घालतानाच करायची ही खास ट्रिक(How to Sprout Matki, Moth Beans Know Trick).

उकड न काढता, न थापता करा मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी, कोकणी स्टाईल रेसिपी

मटकीला मोड आणण्यासाठी ट्रिक

सर्वप्रथम एक भांडं घ्या, त्यात ४ वाट्या मटकी घाला. त्यात पाणी घालून २ ते ३ वेळा धुवून घ्या, जेणेकरून त्यातील घाण निघून जाईल. आता त्यात भांडं भरून पाणी घालून भिजत ठेवा. मटकी भिजल्यानंतर फुगते, त्यामुळे पाणी जास्त घाला. कमी पाणी घातल्यावर मटकीला कुबट वास येतो. यासह ती व्यवस्थित भिजली जात नाही. ४ तासांसाठी त्यावर झाकण ठेऊन मटकी भिजत ठेवा.

मटकी भिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. मोड आणण्यासाठी एक भांडं घ्या व भांड्यावर बरोबर बसणारी चाळणी घ्या. त्यावर मटकी पसरवून घ्या, यामुळे मटकीला वारा मिळतो व त्याला कुबट वास येत नाही, ती चिकटही होत नाही. आता एक सुती कापड भिजवून घ्या, हे सुती कापड मटकीवर पसरवून झाकून ठेवा.

कुकरमध्ये बासूंदी? करा झटपट ‘कुकर बासूंदी’, ना खाली लागण्याची भीती-न उतू जाण्याची..

आता त्यावर एक झाकण ठेऊन सुती कपड्याला कव्हर करा. आता ही मटकी ८ तासांसाठी किंवा रात्रभरासाठी ठेवा. ८ तास झाल्यानंतर मटकीला उत्तम लांबसडक मोड येतात.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.