फळे, भाज्या यासह कडधान्य खाणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं (Sprouts). यातून आपल्या शरीराला आवश्यक पौष्टिक घटक मिळतात. मटकीमध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते, यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात (Kitchen Tips). याव्यतिरिक्त शरीराला ऊर्जा देखील मिळते (Cooking Tips). मटकीचे अनेक पदार्थ केले जातात. प्रत्येक घरात मटकी आधी भिजत घातली जाते.
मोड आलेली मटकी चवीला भन्नाट लागतात. पण घरात मटकी भिजत घातल्याने त्याला मोड येत नाही. घरात मटकी भिजत घातल्यानंतर मोड येत नसेल तर, या पद्धतीने मटकी भिजत घालून पाहा. मटकीला मोड येईल त्यातून कुबट वासही येणार नाही(How to Sprout Matki - Sprouting Moth Beans at Home).
या पद्धतीने मटकी भिजत घातल्यास मोड येईल परफेक्ट
- सर्वात आधी एक भांडं घ्या. त्यात मटकी आणि पाणी घालून मटकी धुवून घ्या. नंतर त्यात पाणी घालून मटकी भिजत ठेवा. ६ ते ७ तासानंतर मटकी छान फुगेल. मटकी भिजत घालत जास्त प्रमाणात पाणी घाला. कमी पाणी घातल्याने मटकीला कुबट वास येतो.
- मटकी भिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून टाका. चाळणीवर एक ओलं सूती कापड पसरवून घ्या. त्यावर मटकी पसरवा आणि सूती कपड्याने झाकून ठेवा. आता ही मटकी रात्रभरासाठी ठेवा.
खराब - चवीला कडू शेंगदाणे ओळखायचे कसे? खरेदी करण्यापूर्वी 'असे ' पाहा, शेंगदाणे खवट आहेत का..
- रात्रभर मटकीला छान मोड येईल. आणि त्याला कुबट वासही येणार नाही.
- आपण या पद्धतीने कोणते कडधान्य भिजत घालू शकता.