आरोग्यासाठी कडधान्य फायदेशीर ठरते. मुग, मटकी, काबोली चणे, यासह इतर प्रकारच्या कडधान्यांचा समावेश आपण आहारात करतो. कडधान्यात विविध प्रकारचे पौष्टीक घटक आढळतात. प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत कडधान्यांना मानले जाते. पण कडधान्य खाण्याआधी ती भिजत घालावी लागते. अनेकदा घाईगडबडीत आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो आणि मग स्वयंपाकाच्या काही तास आधी कडधान्य भिजत घालतो. यामुळे ते भिजतात पण त्यांना मोड येतातच असे नाही. कडधान्य भिजत घालताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्यात (kitchen tips).
कडधान्यांना लांबसडक मोड येण्यासाठी भिजत घालताना काय लक्षात ठेवावे? पाहूयात(How to sprout moth bean at home).
नाव लबाड पण चव भन्नाट, पाहा पारंपारिक 'लबाड वांगे' करण्याची झणझणीत रेसिपी..
कडधान्य भिजत घालण्यासाठी वापरा एक टिप
सर्वप्रथम, कडधान्य निवडून घ्या. नंतर एका बाऊलमध्ये कडधान्य काढून घ्या. त्यात पाणी घालून कडधान्य स्वच्छ धुवून घ्या. त्यावर ५ ते ६ तासांसाठी झाकण ठेवा. ६ तासानंतर त्यात पाणी घालून भिजवलेले कडधान्य धुवून घ्या. जेणेकरून त्यातून कुबट गंध निघून जाईल. आता एका चाळणीवर सुती कापड ठेवा. त्यावर भिजवलेले कडधान्य पसरवून ठेवा, व कापडाने कव्हर करा. कडधान्य सूर्यप्रकाशाजवळ ठेवू नका. यामुळे कडधान्य खराब होऊ शकतात.
मेदूवड्याचं पीठ सैल झालं, तेलात सोडताना वड्याचा आकार बिघडतो? ३ टिप्स- मेदूवडा होईल परफेक्ट कुरकुरीत
एक दिवस पूर्णपणे कडधान्य कव्हर करून ठेवा. दुसऱ्या दिवशी सुती कापड उघडून मोड आलेले कडधान्य एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा, गरजेनुसार कडधान्यांचा वापर करा. आपण प्रत्येक प्रकारचे कडधान्य भिजत घालू शकता.