Join us  

पनीर फ्रिजमध्ये ठेवलं की कडक होतं? कापताना भुगा होतो? पाहा पनीर साठवण्याची सोपी ट्रीक, टिकेल आठवडाभर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 4:07 PM

How To Store and Cut Paneer : हे पनीर थोडे जरी उघडे राहीले तर ते कडक होते आणि वापरणे अवघड होऊन जाते.

ठळक मुद्देपनीर आपण नेहमीच आणतो, पण ते उरले की ते वाळून जाते नाहीतर कडक होतेअशावेळी पनीर साठवण्याची आणि कापण्याची योग्य पद्धत कोणती हे पाहूया...

पनीर हा शाकाहारी जेवणातील एक महत्त्वाचा पदार्थ असतो. प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असलेले हे पनीर आहारात असायला हवे म्हणून आपण अनेकदा आणतो. कधी पनीरचा गरमागरम पराठा, पनीरची भाजी किंवा पनीर पुलाव नाहीतर आणखी काही करण्यासाठी आपण आवर्जून पनीर वापरतो. खाण्यासाठी चविष्ट लागणारे हे पनीर अनेकांना आवडणारे असते. मात्र आपण एकावेळी आणलेले पनीर लगेच संपतेच असे नाही. अशावेळी हे राहीलेले पनीर फ्रिजमध्ये कसे ठेवायचे असा आपल्याला प्रश्न पडतो. हे पनीर थोडे जरी उघडे राहीले तर ते कडक होते आणि वापरणे अवघड होऊन जाते. इतकेच नाही तर ते डब्यात ठेवले तरी त्यातले मॉईश्चर कमी होऊन जाते (How To Store and Cut Paneer).  

अशावेळी पनीर साठवण्याची कोणती योग्य पद्धत वापरावी असा आपल्याला प्रश्न पडतो. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. पनीर आठवडाभर नीट टिकून राहावे यासाठी ते साठवण्याची योग्य पद्धत कोणती हे तर त्या सांगतातच पण पनीर कापताना त्याचा भुगा होऊ नये आणि नीट एकसारखे तुकडे करता यावेत यासाठी त्या एक सोपी आयडीयाही आपल्याशी शेअर करतात. पंकज के नुस्खे या अंतर्गत त्या याविषयीची माहिती शेअर करतात. 

कसे करायचे पनीर स्टोअर? 

एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये पनीरचा क्यूब ठेवायचा. अशाप्रकारे पनीर पाण्यात ठेवले की ते १-२ दिवस नाही तर तब्बल आठवडाभर चांगले राहते. पनीरमधील मॉईश्चर टिकून राहण्यासाठी हा अतिशय सोपा आणि सहज करता येईल असा उपाय आहे. त्यामुळे आपल्याला उपलेले पनीर काही दिवसांनी वापरायचे असेल तरी आपण ते एकदम फ्रेश असल्यासारखे वापरु शकतो. 

पनीर कट कसे करायचे? 

पनीर कापताना त्याचा काहीवेळा भुगा होतो. त्यामुळे आपल्याला हवे तसे तुकडे करता येत नाहीत. आपण पनीर सुरीने कापत असल्याने असे होण्याची शक्यता असते. त्यासाठीच पनीर सुरीने न कापता दोऱ्याने कापायला हवे असे सांगत पंकज आपल्याला दोऱ्याने पनीर कसे कापायचे हेही या व्हिडिओमध्ये दाखवतात. यामुळे पनीर एकसारखे कापले जाण्यास मदत होत असल्याचे दिसते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.