Join us  

भेंडी हिरवीगार ताजी राहावी म्हणून ४ सोप्या टिप्स, फ्रिजमध्ये ठेवून भेंडी काळी पडणार नाही-सुकणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2023 6:12 PM

How To Store Fresh Okra To Last A Longer Time & Stay Slimy : भेंडीची भाजी आवडते पण फ्रिजमध्ये ठेवूनही भेंडी लवकर सुकते, त्यावर उपाय काय?

भेंडी ही अतिशय लोकप्रिय अशी भाजी आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरात आठवड्यातून एकदा तरी भेंडीची भाजी बनत असेल. भेंडी ही अनेकांच्या आवडीची भाजी. झटपट होणारी आणि चवीलाही छान लागणारी अशी भाजी आहे. भेंडीची भाजी आपण कधी कांदा, दाण्याचा कूट आणि गोडा मसाला घालून, कधी नुसतीच मिरची आणि धणे-जीरेची पूड घालून तर कधी भरली भेंडी अशी वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. भाजीच नाही तर भेंडी फ्राय किंवा कुरकुरी भेंडी हाही स्नॅक म्हणून अनेकांच्या आवडीचा प्रकार आहे. 

भेंडीची भाजी किंवा त्याचा कोणताही प्रकार हा छान, चविष्ट व्हावा असे वाटत असेल तर मुळात भेंडी विकत घेतानाच ती ताजी विकत घेतली पाहिजे. कित्येकवेळा आपल्या घरातील गृहिणी भेंडी विकत घेताना ती फ्रेश आहे की नाही हे तपासून मगच घेणे पसंत करतात. काहीवेळा आपण भेंडी बाजारातून विकत आणली आणि जर ती लगेच बनवायची नसल्यास आपण फ्रिजमध्ये स्टोअर करून  ठेवतो. अशाने भेंडी लगेच खराब होते. यासाठी जर आपल्याला विकत आणलेली भेंडी दीर्घकाळ टिकवून ठेवायची असल्यास काही महत्वाच्या टिप्स फॉलो करुयात(How to Store Bhendi (Okra) With 4 Simple Methods, To Keep Bhendi (Okra) Fresh For a Long Time).  

भेंडी दीर्घकाळ फ्रिजरमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स...  

१. ताजी भेंडी निवडून वेगळी काढावी :- जर आपण विकत आणलेली भेंडी आपल्याला खराब होऊ न देता बराच काळ टिकवून ठेवायची असल्यास सर्वप्रथम या भेंडीमधून सगळ्या ताज्या भेंडी निवडून वेगळ्या कराव्यात. भेंडी ताजी आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्या घरातील गृहिणी भेंडी विकत घेताना ती फ्रेश आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी त्याच्या शेवटच्या टोकाकडचा भाग थोडासा मोडून बघतात. हा शेवटचा भाग जर अगदी चटकन तुटला तर भेंडी ताजी आहे असे आपण मानतो. अशी ताजी भेंडी निवडून बाजूला काढून घ्यावी.

घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...

 २. भेंडी अशी धुवा :- भेंडी स्टोअर करुन ठेवण्याआधी ती नीट स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी एक चमचा व्हिनेगर पाण्यात मिसळून घ्यावे, आता सर्व भेंडी त्यात भिजवून काही वेळ तशीच राहू द्या. किमान १५ ते २० मिनिटे या व्हिनेगरच्या पाण्यांत भेंडी भिजवून ठेवा. त्यानंतर ही भेंडी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यांत घालून धुवून घ्यावी. 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

३. अशाप्रकारे भेंडी स्टोअर करून ठेवा :- भेंडी स्टोअर करून ठेवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हव्या त्या आकारात भेंडी चिरून घ्यावी. भेंडी चिरून झाल्यानंतर ती एका झिपलॉक बॅगमध्ये भरून स्टोअर करून ठेवावी. भेंडी झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करून ठेवल्यानंतर त्यात हवा जाणार नाही याची काळजी घ्यावी. आता ही झिपलॉक बॅग फ्रिजरमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवावी. आता आपण आपल्या गरजेनुसार, आपल्याला हवी तेव्हा ही भेंडी बाहेर काढू शकता आणि वर्षभर कधीही खाऊ शकता. भेंडी स्टोअर करून ठेवलेली बॅग पुन्हा बंद करून फ्रिजरमध्ये ठेवल्यावर त्यातील सर्व हवा बाहेर निघाली आहे याची खात्री करून घ्यावी. 

सुके खोबरे खवट होते, काळे पडते ? २ उपाय, खोबरे टिकेल भरपूर...

४. फ्रिज करून ठेवलेली भेंडी खाण्याआधी :- भेंडी जास्त वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ती पूर्णपणे गोठते. अशा परिस्थिती, संपूर्णपणे गोठलेली भेंडी  वापरण्याआधी ती पिशवीतून न काढता कोमट पाण्यात, पिशवी ठेवून द्यावी. मग ती भेंडी थोडी नॉर्मल तापमानावर आल्यावर मऊ झाल्यानंतर पिशवीतून बाहेर काढून वापरावी.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स