हिवाळ्यात भाजीपाला, फळं अगदी फ्रेश आणि ताजी विकत मिळतात. थंडीच्या दिवसात बाजारांत आवळा, मुळा, गाजर विकायला ठेवलेली असतात. गाजर बाजारात बाराही महिने मिळत असले तरी लालचुटूक, चवीला गोड अशा गाजराचा सिझन म्हणजे हिवाळा. एरवी उपलब्ध असलेल्या गाजरांना चव, गुण आणि रुपाच्या बाबतीत हिवाळ्यातल्या गाजरांची सर नसते. थंडीच्या दिवसांत बाजारात विकायला ठेवलेले फ्रेश, लालचुटुक गाजर आपण आवर्जून घरी आणतो. कोशिंबीरमध्ये, गाजराचा हलवा, लोणचं अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण गाजराचे अनेक पदार्थ तयार करतो(best way to store fresh carrots).
हिवाळ्यात मिळतात तसे फ्रेश, लालचुटुक गाजर वर्षभर मिळत नाहीत. अशावेळी हे लालचुटुक, फ्रेश आणि चवीला गोड असणारे गाजर स्टोअर करुन ठेवावेसे वाटतात. परंतु गाजर फ्रिजमध्ये जास्त दिवस स्टोअर करून ठेवले तर ते एकतर खराब तरी होत किंवा मऊ पडत. अशावेळी विकत आणलेले महागडे गाजर नेमके कसे स्टोअर करावे (How to Store Carrots So They Stay Crunchy) असा प्रश्न आपल्याला पडतो. यासाठी यंदाच्या हिवाळ्यात जर तुम्ही गाजर विकत आणले असेल आणि जर तुम्हाला ते स्टोअर करायचे असतील तर एका सोप्या ट्रिकचा आपण वापर करु शकतो. या ट्रिकचा वापर करुन आपण गाजर खराब न होता किमान महिनाभर तरी स्टोअर करुन ठेवू शकतो. गाजर स्टोअर करण्याची ही नवी भन्नाट ट्रिक कोणती ते पाहूयात(How to Store Carrots So They Last for Months).
गाजर खराब न होता स्टोअर करण्याची नवी पद्धत...
स्टेप १ :- बाजारांतून विकत आणलेले गाजर सगळ्यात आधी वाहत्या पाण्याखाली ठेवून स्वच्छ धुवून घ्यावेत. गाजर स्वच्छ धुवून त्यावरील माती स्वच्छ धुवून घ्यावीत.
पोटभर खा गूळ मखाणे! ऐन थंडीत कडकडून भूक लागली की खा हा मस्त पदार्थ-पाहा सोपी रेसिपी...
स्टेप २ :- गाजर स्वच्छ धुतल्यानंतर कॉटनचा किंवा सुती पातळ रुमाल किंवा कपडा घेऊन ही धुवून घेतलेली गाजर स्वच्छ पुसून घ्यावीत. गाजर २ ते ३ वेळा रुमालाने व्यवस्थित संपूर्ण सुकेपर्यंत पुसून घ्यावीत. गाजर स्टोअर करताना त्यात पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर स्टोअर केलेली गाजर खराब होण्याची शक्यता असते. यासाठी गाजर धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यावे.
स्टेप ३ :- गाजर पुसून झाल्यानंतर त्याचा देठाकडील थोडासा भाग सुरीने कापून घ्यावा. याचबरोबर, जर गाजर आकाराने खूप लांब असतील तर अशी गाजर २ ते ३ तुकड्यात कापून घ्यावीत.
स्टेप ४ :- २ ते ३ लहान लहान तुकडे करुन घेतलेली गाजर एका स्वच्छ प्लॅस्टिकच्या झिपलॉक बॅगमध्ये पॅक करुन फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवावीत.
हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...
स्टेप ५ :- गाजर फ्रिजमध्ये स्टोअर करताना सफरचंद आणि केळं यांच्यापासून लांब स्टोअर करुन ठेवा. नाहीतर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.
अशाप्रकारे आपण सोप्या ५ स्टेप्स फॉलो करून हिवाळ्यात विकत मिळणारे गाजर खराब न होता पुढील किमान महिनाभर तरी स्टोअर करुन ठेवू शकतो.