बाजारात जाऊन किंवा घरासमोर येणाऱ्या भाजीविक्रेत्यांकडून भाज्यांचीखरेदी नेहमीच करणं हे प्रत्येक घरातल्या महिलेसाठी अगदी रोजचं काम आहे. अगदी सहज करण्यासारखं ते काम. आता त्यात आणखी वेगळं ते काय, असं वाटणं अगदी साहजिक आहे. पण आपण घेत असणाऱ्या भाज्या ताज्या असाव्या तसेच त्या जास्त दिवस टिकाव्या, यासाठी काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देणं गरजेचं आहे (How to store cauliflower or gobhi in fridge?). सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी फुलकोबी म्हणजेच फ्लावर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची खात्री करून घ्यावी (5 Tips for buying gobhi), याविषयीची खास माहिती एका व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. (How to choose perfect fresh cauliflower from market?)
फुलकोबी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?
१. फुलकोबी खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारखी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फुलकोबीच्या वरच्या फुलाचा गड्डा हा नेहमी एकसंध असावा. त्या फुलामध्ये स्पष्ट दिसण्याइतक्या भेगा पडल्या असतील तर ती भाजी घेऊ नका.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या 'बजेट स्पेशल' ६ सुपर साड्या, बघा साड्यांची खास बात..
२. ऑफव्हाईट किंवा पांढऱ्या रंगाची फुलकोबी घ्या. त्याला पिवळसर छटा आली असेल, तसेच त्याच्यावर लहानसे काळे ठिपके दिसत असतील, तर ती भाजी घेऊ नका.
३. फुलकोबीच्या वरच्या फुलाच्या गड्ड्यावर हलक्या हाताने दाब देऊन पाहा. जर दाब दिल्यावर फुलकोबी तुटली किंवा तिचे दाणे- दाणे होऊन गळून पडली तर ती भाजी घेऊ नये.
फुलकोबी फ्रिजमध्ये कशी साठवून ठेवावी?
१. काही जणी बाजारातून जशी फुलकोबी आणली तशीच ती प्लास्टिकच्या पिशवीसकटच फ्रिजमध्ये ठेवून देतात. ही पद्धत सगळ्यात जास्त चुकीची आहे. कारण प्लास्टिकमध्ये फुलकोबी खराब होण्याची प्रक्रिया लगेचच सुरू होऊन जाते.
तुम्हीही आलं फ्रिजमध्ये ठेवता का? 'हे' ३ पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, बघा काय होतं....
२. त्यामुळे ती प्लास्टिकच्या पिशवीतून मोकळी करून ठेवा. तसेच बास्केटमध्ये ठेवताना तिचं फूल वर आणि दांडी खाली अशा पद्धतीने ठेवा.