Lokmat Sakhi >Food > रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात

रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात

How to store chapati so that it remains soft for 3 Months : रेडी टू इट चपात्या करण्याची सोपी ट्रिक; हवं तेव्हा फक्त पोळ्या तव्यावर भाजून खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 04:35 PM2024-05-30T16:35:14+5:302024-06-07T13:22:04+5:30

How to store chapati so that it remains soft for 3 Months : रेडी टू इट चपात्या करण्याची सोपी ट्रिक; हवं तेव्हा फक्त पोळ्या तव्यावर भाजून खा..

How to store chapati so that it remains soft for 3 Months | रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात

रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात

भारतीय घरांमध्ये चपाती -  भाजी हमखास केली जाते (Ready To Eat Chapati). काहींना चपातीशिवाय जमत नाही. चपाती नसेल तर, काहींचं पोट भरत नाही. पण रोजच चपाती करण्याचा कंटाळा अनेकांना येतो (Chapati Making). कणिक भिजवा, मग पोळ्या लाटा आणि शेवटी शेका. नंतर मग मऊ चपाती तयार होते (Cooking Tips). पण हीच पोळी सायंकाळपर्यंत कडक आणि वातड होते.

उरलेली पोळी कोणी खात नाही (Kitchen Tips). आजकाल इन्स्टंट गोष्टींचा जमाना आहे. प्रीमिक्सपासून रेडी टू इट, बाजारात सर्व काही उपलब्द आहे. पण रेडी टू इट चपात्या नाही. जर आपल्याला ३ महिने आरामात टिकतील अशा रेडी टू चपात्या करायच्या असतील तर, एका  ट्रिकचा वापर करा. या ट्रिकमुळे आपलं काम सोपं होईल. फक्त तव्यावर चपात्या भाजून आपण खाऊ शकता(How to store chapati so that it remains soft for 3 Months).

रेडी टू इट चपात्या कशा करायच्या?

सायंकाळी व्यायाम केल्याने वजन झरझर घटते? ४ आरोग्यदायी फायदे; स्ट्रेस कमी होईल आणि..

लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

पाणी

'या' पद्धतीने करा रेडी टू इट पोळ्या..

सर्वात आधी कणिक भिजवून घ्या. यासाठी एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ आणि गरजेनुसार पाणी घालून कणिक मळून घ्या. कणकेचे गोळे घ्या, आणि चपात्या लाटून घ्या. चपात्या लाटताना थोडे जाडसर लाटा, जेणेकरून त्या अधिक काळ सॉफ्ट राहतील. कणिक मळताना शक्यतो तेल आणि दुधाचा वापर टाळावा. यामुळे चपात्या लवकर खराब होणार नाही.

वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

चपात्या लाटून झाल्यानंतर दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. गरम तव्यावर चपात्या ३० टक्के शेकून घ्या. आता उन्हाखाली सुती कापड पसरवा. त्यावर शेकलेल्या चपात्या १५ मिनिटांसाठी वाळत घाला. १५ मिनिटानंतर फॅनखाली ठेवा. नंतर झिपलॉक बॅगमध्ये चपात्या ठेवून बंद करा, आणि बॅग फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा पोळ्या खाण्याची इच्छा होईल, तेव्हा तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर पोळ्या दोन्ही बाजून तेल किंवा तूप लावून शेकून घ्या. पोळ्या छान फुलतील.

Web Title: How to store chapati so that it remains soft for 3 Months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.