Lokmat Sakhi >Food > फ्रिजमध्ये ठेवल्यावर हिरवी कोथिंबीर पिवळी होते? पाणी सुटते? १ ट्रिक; कोथिंबीर राहील फ्रेश

फ्रिजमध्ये ठेवल्यावर हिरवी कोथिंबीर पिवळी होते? पाणी सुटते? १ ट्रिक; कोथिंबीर राहील फ्रेश

How To Store Cilantro (Kothimbir) So It Lasts For Weeks : कोथिंबीरीची जुडी दोन दिवसात सडत असेल तर, १ ट्रिक फॉलो करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 10:00 AM2024-11-15T10:00:00+5:302024-11-15T10:00:01+5:30

How To Store Cilantro (Kothimbir) So It Lasts For Weeks : कोथिंबीरीची जुडी दोन दिवसात सडत असेल तर, १ ट्रिक फॉलो करून पाहा..

How To Store Cilantro (Kothimbir) So It Lasts For Weeks | फ्रिजमध्ये ठेवल्यावर हिरवी कोथिंबीर पिवळी होते? पाणी सुटते? १ ट्रिक; कोथिंबीर राहील फ्रेश

फ्रिजमध्ये ठेवल्यावर हिरवी कोथिंबीर पिवळी होते? पाणी सुटते? १ ट्रिक; कोथिंबीर राहील फ्रेश

कोथिंबीर (Kothimbir) भुरभुरली की पदार्थाची चव कैक पटीने वाढते (Kitchen Tips). कोथिंबीर आपल्या रोजच्या आहाराचा महत्वपूर्ण भाग आहे. चटणी असो किंवा खमंग खुसखुशीत वडी, सुगंधित कोथिंबीर घालताच पदार्थ अधिक रुचकर लागते. पुदिना चटणी, कोशिंबीर, भजी किंवा एखाद्या पेयाची चव वाढवण्यासाठी कोथिंबीरीचा वापर आपण करतोच. यामुळे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कोथिंबीर फक्त सजावटीसाठी तर, याने अनेक आजारांपासून बचावही होतो.

कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक सापडतात. पण घरात कोथिंबीर आणल्यानंतर ती निवडून आपण डब्यात घालून फ्रिजमध्ये ठेवतो. पण काही काळानंतर कोथिंबीरीला पाणी सुटते. एका किडलेल्या पानामुळेही कोथिंबीर खराब होते. कोथिंबीर अधिक वेळ फ्रेश टिकावे म्हणून काय करावे? कोथिंबीर नेमकी कशी स्टोअर करावी? पाहा(How To Store Cilantro (Kothimbir) So It Lasts For Weeks).

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

कोथिंबीर जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी टिप्स

- बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर स्वच्छ पाण्यात ठेवा आणि त्याची मुळे कात्रीने कापून टाका. यानंतर ते स्वच्छ पाण्यात टाका आणि त्याची पाने वर फॉइलने बांधा. असे केल्याने ते बरेच दिवस ताजे राहते.

- ज्या पाण्यात आपण कोथिंबीरीची जुडी ठेवणार आहात, त्यात थोडे व्हिनेगर घाला. यामुळे कोथिंबीर लवकर खराब होणार नाही.

- जर आपण कोथिंबीरीची जुडी निवडून घेतली असेल तर, आपण कपड्यातही गुंडाळून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. यामुळे कोथिंबीर लवकर खराब होणार नाही. शिवाय फ्रिजमध्ये ठेवल्यानं त्याचा ताजेपणा कायम राहील.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

- याशिवाय आपण निवडलेली कोथिंबीर एका टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. यामुळे कोथिंबीर लवकर खराब होणार नाही. 

Web Title: How To Store Cilantro (Kothimbir) So It Lasts For Weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.