भारतातील प्रत्येक घरात खोबऱ्याचा वापर होतो. खोबऱ्याचा दोन्ही प्रकारे वापर केला जातो. ओलं खोबऱ्याचं वाटण किंवा त्याचा वापर विविध पदार्थ करण्यासाठी होतो, तर सुक्या खोबऱ्याचा वापर चटणी किंवा चिवड्यामध्ये होतो. नारळ फोडल्यानंतर ओलं खोबरं आपण त्याच वेळी वापरतो, कारण ते खराब होण्याची शक्यता असते.
पण सुकं खोबरं आपण अनेक दिवस साठवून ठेऊ शकतो. मात्र, पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे ते लवकर खराब होते. त्यावर बुरशी येते. कुबट वासामुळे आपण खोबरं वापरणे टाळतो. अशावेळी सुकं खोबरं पावसाळ्यात कसे साठवून ठेवावे असा प्रश्न पडतो. सुक्या खोबऱ्यातून कुबट वास येऊ नये, यासाठी काही टिप्स फॉलो करून पाहा(How To Store Coconut For Long Time).
खोबरेल तेल
पावसाळ्यात अर्धी वाटी सुकं खोबरं जेव्हा आपण साठवून ठेवतो, तेव्हा त्यातून खवट वास येऊ लागते, असे होऊ नये म्हणून खोबरेल तेलाचा वापर करा. यासाठी आधी सुकं खोबरं एका नॅपकीनने पुसून काढा. त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीला आतून व बाहेरून खोबरेल तेल लावा. व व्यवस्थित सुकवून एका प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवा.
तांदळाच्या डब्यात ठेवा
बहुतांश गृहिणी सुकं खोबरं खवट होऊ नये म्हणून तांदळाच्या डब्यात ठेवतात. तांदूळ सुक्या खोबऱ्यातून ओलावा शोषून घेते, ज्यामुळे सुक्या खोबऱ्यावर बुरशी तयार होत नाही.
कुरडईची भाजी नूडल्सहून भारी, करुन पाहा पारंपरिक झणझणीत आणि चविष्ट कांदा-कुरडई!
मीठ
सर्वप्रथम, सुकं खोबरं आणल्यानंतर एक तास पेपरवर पसरून ठेवा. एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात एक टेबलस्पून मीठ घाला, पाण्यात मीठ विरघळल्यानंतर नॅपकीन मिठाच्या पाण्यात बुडवा, नंतर सुक्या खोबऱ्याची वाटी आतून- बाहेरून पुसून काढा. खोबरं सुकल्यानंतर स्टोर करून ठेवा.
एक पुरी किती तेल पिते, सांगता येईल? पुऱ्या आवडत असतील तरी हे वाचाच..
तुरटी
तुरटीच्या वापराने सुकं खोबरं अधिक काळ टिकून राहू शकते. यासाठी एका बाऊलमध्ये एक कप पाणी घ्या, त्यात तुरटीचा एक खडा घाला. तुरटी पाण्यात विरघळल्यानंतर नॅपकीन पाण्यात बुडवून, याने खोबऱ्याची वाटी पुसून काढा. खोबऱ्याची वाटी दोन दिवस फॅनच्या हवेखाली वाळू द्या. यानंतर खोबरे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवा.