Lokmat Sakhi >Food > कॉफी कडक झाली, बाटलीतून निघता निघत नाही? ६ सोप्या टिप्स- कॉफी वाया जाणार नाही...

कॉफी कडक झाली, बाटलीतून निघता निघत नाही? ६ सोप्या टिप्स- कॉफी वाया जाणार नाही...

How To Store Coffee Powder To Keep Fresh For Months : 6 Simple Tips : ऋतूंनुनसार वेगवेगळ्या पद्धतीने कॉफी पावडर स्टोअर करुन ठेवल्यास, कॉफी पावडर जास्त काळ टिकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2023 03:36 PM2023-03-13T15:36:29+5:302023-03-13T15:41:05+5:30

How To Store Coffee Powder To Keep Fresh For Months : 6 Simple Tips : ऋतूंनुनसार वेगवेगळ्या पद्धतीने कॉफी पावडर स्टोअर करुन ठेवल्यास, कॉफी पावडर जास्त काळ टिकते.

How To Store Coffee Powder To Keep Fresh For Months : 6 Simple Tips | कॉफी कडक झाली, बाटलीतून निघता निघत नाही? ६ सोप्या टिप्स- कॉफी वाया जाणार नाही...

कॉफी कडक झाली, बाटलीतून निघता निघत नाही? ६ सोप्या टिप्स- कॉफी वाया जाणार नाही...

गरमगरम वाफाळती कॉफी प्यायला सगळ्यांनाच आवडत. काम करतांना अचानक आळस आला तर मूड रिफ्रेश करण्यासाठी आपण चहा - कॉफी पितो. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात कॉफी पिऊनच होते. कॉफी हे जगभर विकले जाणारे, तरतरी आणणारे, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय आहे. काही लोकांना कॉफी इतकी आवडते की, ते कॉफी प्यायल्याशिवाय राहूच शकत नाही. वाफाळती गरमागरम कॉफी समोर आली की आपल्याला ती पिण्याचा मोह आवरत नाही हे खरं आहे. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे या कॉफीचा अरोमा म्हणजेच कॉफीचा सुगंध. कॉफीचा सुगंध येताच आपलं अर्ध पोट भरत. 

कॉफी प्यायल्याने आपण रिफ्रेश फील करतो. आपण सहसा घरांत बरीच माणसं कॉफी पिणारी असली की, कॉफीची मोठी बरणी विकत आणतो. ही कॉफीची बरणी सिलपॅक असलेली एकदा उघडली की ती परत सिलपॅक करता येत नाही. परिणामी, हवेच्या संपर्कात आल्यामुळे बरणीत कॉफीचे गठ्ठे तयार होतात. काहीवेळा वातावरणातील आर्द्रतेमुळे ही कॉफी ओली होऊन तिचे गठ्ठे तयार होतात. अशी कॉफी वापरण्यायोग्य रहात नाही. अशावेळी नक्की काय करावे असा प्रश्न गृहिणींना पडतो. कॉफी बराच काळ स्टोअर करुन ठेवल्यामुळे काहीवेळा तिचा रंग आणि चवदेखील बदलते. असे होऊ नये म्हणून कॉफी स्टोअर करण्याची योग्य पद्धत समजून घेऊ(How To Store Coffee Powder To Keep Fresh For Months : 6 Simple Tips). 


नक्की कोणते उपाय करता येऊ शकतात ?  

१. आपण कॉफीच्या बाटलीतून चमच्याच्या मदतीने आपल्याला हवी तेवढी कॉफी बाहेर काढतो. ही कॉफी आपण चमच्याने गरम दुधात किंवा पाण्यात घालतो. जेव्हा आपण कॉफी चमच्याने गरम दुधात किंवा पाण्यांत घालतो, तेव्हा त्याची गरम वाफ चमच्याला लागते. परिणामी, चमचा ओला होऊन कॉफी त्या चमच्यालाच चिकटून बसते. असा ओला चमचा जर आपण परत त्या कॉफीच्या बाटलीत ठेवला तर कॉफीचे गठ्ठे तयार होऊन ती खराब होण्याची शक्यता असते. या कारणांमुळे शक्यतो, कॉफीच्या बाटलीत ओला चमचा ठेवू नये किंवा कॉफी करताना प्रत्येकवेळी नवीन चमच्याचा वापर करावा. 

२. काचेच्या बाटलीत कॉफी पावडर भरून ती फ्रिजमध्ये ठेवावी. यामुळे कॉफी पावडर ओलसर होणार नाही. तसेच बरेच महिने कॉफी पावडर टिकून ठेवण्यासाठी हा उपाय अधिक चांगला आहे. मात्र ज्या डब्यात किंवा बरणीमध्ये आपण कॉफी पावडर ठेवणार आहात ते हवाबंद (एअरटाईट) असावे याची आपण काळजी घेतली पाहिजे.  

३. आपण ज्या बाटलीत किंवा जारमध्ये कॉफी पावडर स्टोअर करुन ठेवणार आहात, त्यामध्ये आधी काही तांदळाचे दाणे टाकावे आणि मग त्यात कॉफी पावडर ओतावी. यामुळे कॉफीचा स्वाद टिकून राहतो. अशाप्रकारे आपण अनेक महिन्यांपर्यंत या स्टोअर केलेल्या कॉफी पावडरचा वापर करू शकतो.  या ट्रिकचा वापर करुन आपण कॉफीचा स्वाद जसा आहे तसाच टिकवून ठेऊ शकता. यामुळे कॉफीचा स्वाद बदलत नाही आणि आपल्याला योग्यरित्या कॉफी पावडर स्टोअर करता येते.

४. अनेकदा असे होते की, काचेच्या बाटलीत भरुन ठेवलेल्या कॉफी पावडरला लगेच काही दिवसातच त्यामध्ये गाठ किंवा गठ्ठे तयार होतात. कॉफी पाडवर जमू लागण्याची ही सुरूवात असते. अशावेळी या कॉफी पावडरचे गठ्ठे तयार होऊ नयेत म्हणून आपण एक सोपा उपाय करु शकतो. कॉफी पाडवर काचेच्या बाटलीतून बाहेर काढा. ही बरणी व्यवस्थित स्वच्छ करा आणि बाटलीच्या तळाशी एक टिश्यू पेपर ठेवा. आता त्यात १ चमचा चहा पावडर घाला आणि मग वरून कॉफी पावडर ओता, असं केल्यामुळे कॉफीमध्ये गुठळ्या तयार होत नाहीत.

५.  कॉफीच्या बाटलीचे सिल्पकिंग एकदा उघडल्यानंतर परत ते सिल्पकिंग करता येत नाही. अशावेळी एका चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकने त्या बाटलीचे तोंड झाकून घ्या. त्यानंतर त्यावर बाटलीचे झाकण लावून फ्रिजमध्ये व्यवस्थित स्टोअर करुन ठेवा. इतकंच नाही तर कॉफी जारमध्ये कायमचा चमचा ठेऊ नका. याशिवाय, कॉफी काढताना कोरड्या चमच्याचा किंवा लाकडी चमच्याचा वापर करावा. यामुळे कॉफी खराब होणार नाही आणि अधिक काळ टिकण्यास मदत होईल.

६. ऋतू कोणताही असो कॉफी पावडर जर योग्यरित्या स्टोअर केली नाही तर ती खराब होतेच. यासाठी प्रत्येक ऋतूंनुनसार वेगवेगळ्या पद्धतीने कॉफी पावडर स्टोअर करुन ठेवावी. आपण वेगवेगळ्या ऋतूंमध्ये कॉफी पावडर स्टोअर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करु शकता. जसं उन्हाळ्याच्या दिवसात आपण कॉफी पावडरच्या डब्यात खडीसाखरेचे तुकडे घालू शकतो. हिवाळ्याच्या दिवसात कॉफी पावडरच्या डब्यात आपण सुंठ घालून ठेवू शकतो.  तर पावसाळ्याच्या दिवसात कमळाच्या बी चा वापर करू शकतो. असं केल्यामुळे कॉफी खराब होत नाही आणि त्याच्या गुठळ्याही होत नाहीत. 

या ६ किचन हॅक्सचा वापर करून आपण कॉफी पावडर अधिक काळ स्टोअर करू शकता. या सोप्या टिप्सचा वापर करून आपण कॉफी खराब होण्यापासून वाचवू शकतो.

Web Title: How To Store Coffee Powder To Keep Fresh For Months : 6 Simple Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न