बरेचदा आपल्याला घाई गडबडीच्यावेळी भाज्या चिरण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. यामुळेच स्वयंपाक वेळेत तयार करण्यासाठी गृहिणी काहीवेळा भाज्या चिरुन स्टोअर करुन ठेवतात. काही भाज्या चिरुन दीर्घकाळासाठी स्टोअर करता येतात. परंतु काही भाज्या चिरुन लगेच तयार कराव्या लागतात, त्या फारशा स्टोअर करुन ठेवता येत नाहीत. काहीवेळा घरात काही खास कार्यक्रम असेल तर फार मोठ्या प्रमाणात भाजी चिरुन ठेवली जाते. परंतु काहीवेळाने ही चिरुन ठेवलेली भाजी खराब होते, किंवा चिरुन ठेवल्याने तिची चव पाहिजे तशी लागत नाही. अशावेळी नेमके काय करावे असा प्रश्न घरच्या गृहिणीला पडतो(How to store cut vegetables in the fridge for a long time).
भाज्या आधीच चिरुन ठेवल्याने आपला बराच वेळ वाचतो, याचबरोबर आयत्या वेळी घाईगडबड होत नाही. भाज्या फ्रिजमध्ये आहेत तशाच ठेवण्यापेक्षा त्या चिरून स्टोअर करणे अधिक फायदेशीर ठरते. काही गृहिणी किंवा वर्किंग वुमन भाज्या चिरुन त्या स्टोअर करुन ठेवणे पसंत करतात. परंतु या चिरुन स्टोअर केलेल्या भाज्या जर काही ठराविक (How to store vegetables in Fridge) दिवसांत तयार केल्या नाहीत तर त्या खराब होतात. काहीवेळा त्यांची चव देखील बदलते. असे होऊ नये म्हणून चिरून ठेवलेल्या भाज्या स्टोअर करण्याच्या काही सोप्या ट्रिक्स पाहूयात(How to Store Cut Vegetables in the Fridge).
चिरुन ठेवलेल्या भाज्या स्टोअर करण्यापूर्वी करा हे सोपे उपाय...
१. तेलाचा वापर करा :- बटाटे, वांगी यांसारख्या भाज्या कापल्यानंतर त्यांना हलकेच तेल लावा. यामुळे बाहेरील हवा आणि बटाटे, वांगी यांच्यात अडथळा निर्माण होईल आणि ती दीर्घकाळ ताजी राहू शकते. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही भाजी खराब होण्यापासून तर वाचवू शकताच पण तिचा ताजेपणाही टिकवून ठेवू शकता.
२. लिंबाचा रस लावा :- भोपळा, फणस यांसारख्या भाज्या कापून फ्रिजमध्ये ठेवायच्या असतील, तर त्यावर आंबट लिंबाचा रस लावा. त्यामुळे भाजी लगेच खराब न होता दीर्घकाळासाठी चांगली टिकेल व त्यांचा ताजेपणाही कायम राहील.
फक्त ५ मिनिटांत करा कांद्याची चटणी, पावसाळ्यात कच्चा कांदा नको- खा अशी मस्त चमचमीत चटणी...
३. एअर टाईट कंटेनरमध्ये करा स्टोअर :- भाज्या चिरुन स्टोअर करून ठेवायच्या असतील तर त्या नेहमी एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवाव्यात. असे केल्याने कापलेल्या भाज्या खुल्या हवेच्या संपर्कात येणार नाहीत, आणि याच कारणामुळे भाज्या दीर्घकाळासाठी चांगल्या टिकून राहतील. एअर टाईट कंटेनरमध्ये कापून घेतलेल्या भाज्या स्टोअर करण्यापूर्वी त्या कंटेनरच्या तळाशी एक कॉटनचा टॉवेल किंवा कपडा घालायला विसरु नका. या ट्रिकमुळे भाज्यांमधील जास्तीचे पाणी शोषून घेतले जाऊन भाज्या अधिक काळासाठी फ्रेश राहतील.
४. भाज्या कोरड्याच स्टोअर करा :- भाज्या स्टोअर करताना त्या नेहमी कोरड्याच आहेत ना याची खात्री आधी करून घ्या. कापलेल्या भाज्यांमध्ये ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होऊ शकते, त्यामुळे भाज्या कोरड्या ठेवणे अत्यंत आवश्यक असते. अशा स्थितीत भाजी कापल्यानंतर ती साठवून ठेवायची असेल तर ती धुवू नका, पण तरीही भाजीमध्ये ओलावा असल्यास ती आधी पूर्णपणे वाळवावी. टिश्यू पेपर किंवा टॉवेलने कंटेनर व्यवस्थित कोरडे होईपर्यंत पुसून घ्या. अतिरिक्त ओलावा कमी करण्यासाठी तुम्ही कंटेनरच्या तळाशी टिश्यू पेपर किंवा कॉटनचा फडका ठेवू शकता, नंतर कोरड्या भाज्या स्टोअर करून वरून व्यवस्थित झाकण लावून घ्यावे. भांड्याचे झाकण देखील कोरडे आहे ना याची आधी पूर्ण खात्री करावी.
घरच्याघरी तयार करा ढोकळा प्रिमिक्स, विकतसारखा सॉफ्ट - स्पॉंजी ढोकळा करा अगदी १० मिनिटांत..
५. लक्षात ठेवा :- कापलेल्या भाज्या या नेहमी फ्रिजमध्ये ठेवताना इतर पदार्थांपासून वेगळ्या स्टोअर करुन ठेवाव्यात. टोमॅटो इथिलीन वायू सोडतात म्हणून कापलेल्या टोमॅटोला पालेभाज्या, कोबी, गाजर, ब्रोकोलीपासून वेगळे स्टोअर करुन ठेवावे. त्याचबरोबर, भेंडी लगेच धुवून कापली तर चांगली लागत नाही, म्हणून काहीजण ती आधीच कापून स्टोअर करुन ठेवतात.
अशा परिस्थितीत, भेंडीचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी, भेंडी धुतल्यानंतर आधी संपूर्णपणे वाळवा आणि नंतरच कापून घ्या, आणि नेटबॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवा. या ट्रिकचा वापर करून स्टोअर केलेली भेंडी आपण ४ ते ५ दिवस वापरू शकता. फरसबी आणि मटार आधी नीट सोलून घ्या, त्यानंतर त्या कापून घ्या त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करा.
फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत...