Join us  

पावसाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं? ही घ्या एक खास युक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 7:13 PM

How to prevent souring of curd in rainy season and tips to store it right : पावसाळ्यात दही खराब होऊ नये म्हणून ते नीट कसे लावायचे?

दही हा आपल्या रोजच्या आहारातला एक महत्वपूर्ण पदार्थच मानला जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दही खायला आवडत. सध्या बाजारांत रेडिमेड दही विकत मिळते, परंतु अजूनही काही घरांमध्ये पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीनेच दही तयार केले जाते. अजूनही अनेकजणींना विकतचे दही आणण्यापेक्षा घरात दही तयार करण्याची सवय असते. आपल्या रोजच्या जेवणात बऱ्याचदा दह्यापासून तयार केलेले रायता, ताक, लस्सी यांचा समावेश असतोच. दही खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानले जाते. कडक उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात दही लवकर आंबट होते आणि खराब होऊ लागते. इतर सर्व गोष्टींप्रमाणे, हवेतील ओलावा देखील त्यावर परिणाम करते, म्हणून काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन, आपण त्यात खराब बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखू शकता, जेणेकरून ते लवकर आंबट होणार नाही आणि ते सहजपणे दीर्घकाळ ताजे राहील(How to Store Dairy Products in Monsoon Season).

विकतच्या दह्यापेक्षा घरी तयार केलेले दही (Curd) हे अधिक चविष्ट व घट्टसर असते, म्हणून शक्यतो घरीच दही बनवले जाते. बरेचदा पावसाळ्यात घरी तयार केलेले दही लगेच खराब होते. काहीवेळा तर हे घरगुती दही वातावरणातील ओलाव्याने खराब होऊन जाते. दही व्यवस्थित सेट करून ठेवले नाही तर दही खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळच्या (How To Maintain The Quality Of Your Curd In The Rainy Season) दिवसात घरात दही तयार करताना योग्यरीत्या सेट केले पाहिजे. त्याचबरोबर पावसाळ्यात दही खराब होऊ नये म्हणून ते योग्य पद्धतीने स्टोअर करणे देखील तितकेच महत्वाचे असते. पावसाळ्यात घरी लावलेले दही खराब होऊ नये म्ह्णून नेमकं काय करावं ते पाहूयात(Best ways to store curd during the monsoon season). 

पावसाळ्यात दही खराब होऊ नये म्हणून नेमके काय करावे ? 

१. दही सेट करण्याची योग्य वेळ :- दही जास्त काळासाठी फ्रेश राहावे म्हणून, ते योग्य वेळी सेट करणे देखील तितकेच महत्वाचे असते, म्हणून शक्यतो दही हे फक्त रात्रीच सेट करावे. दही रात्री सेट झाल्यानंतर सकाळी ते सेट झाल्यावर काही वेळासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून द्यावे. अशा प्रकारे ते लवकर आंबट होत नाही. 

२. योग्य भांड्यांचा वापर करावा :- दही फ्रेश ठेवण्यासाठी योग्य भांडे निवडणे देखील खूप महत्वाचे असते. दही चांगल्या प्रकारे सेट करण्यासाठी शक्यतो मातीच्या भांड्यांचा वापर करावा कारण त्यात दही आणि पाणी वेगळे होत नाही आणि दही घट्ट सुद्धा होते. मातीच्या भांड्यात ठेवलेले दही दीर्घकाळ ताजे राहते. 

पराठ्यासाठी कणीक कशी मळायची पाहा, चपातीसारखेच भिजवाल तर पस्तावाल! परफेक्ट पराठ्यांसाठी खास युक्ती...

३. दही या पदार्थांपासून दूर ठेवा :- दही सेट करण्यासाठी ठेवताना दह्याच्या भांड्यांजवळ फळे किंवा भाज्या ठेवू नये. दह्याच्या भांड्यांजवळ जर फळे किंवा भाज्या ठेवल्या तर यामुळे ते दही लवकर खराब होण्याची शक्यता असते. दूध किंवा दुधापासून तयार झालेल्या पदार्थांच्या बाजूला हे दह्याचे भांडे ठेवू शकता.

४. दही थंड जागी स्टोअर करुन ठेवा :- दही चुकीच्या किंवा थंडावा नसलेल्या जागी स्टोअर करुन ठेवणे, हे दही खराब होण्याचे मुख्य कारण असू शकते. दही नेहमी रुम टेम्परेचरपेक्षा किंचित थंड असलेल्या ठिकाणी स्टोअर करुन ठेवले पाहिजे, यामुळे ते लवकर खराब न होता दिर्घकाळ चांगले टिकून राहील.

हा घ्या ताकदीचा सुपरडोस; १५ मिनिटांत करा मखाण्याचा उत्तपा- नाश्ता हेल्दी, पुरेल दिवसभर एनर्जी...

टॅग्स :अन्नकिचन टिप्समोसमी पाऊस