स्वयंपाकघरात आपण अनेकदा महिनाभराचे सामान भरून ठेवतो. त्यात तांदूळ, गहू आणि अनेक डाळींचा समावेश आहे. पण कधी कधी धान्यांमध्ये किंवा पीठामध्ये कीड लागते, किंवा अळ्या तयार होतात. मुख्य म्हणजे पीठामध्ये कीड लागण्याचे प्रमाण जास्त असते (Best way to store Flour). ज्यामुळे पीठ तर खराब होतेच, शिवाय त्या पिठाचा वापर करावा की नाही? असा प्रश्न निर्माण होतो. हिवाळ्यात स्टोअर करून ठेवलेल्या पिठात कीड किंवा अळ्या तयार होण्याची शक्यता जास्त असते. थंड आणि दमट वातावरणामुळे पुरेसं ऊन घरात येत नाही. अशावेळी डब्यात साठवलेले पीठ लवकर खराब होते.
पिठाला लागलेली कीड, किंवा अळ्या सहसा चाळणीने चाळून निघत नाही (Kitchen Tips). अशावेळी पिठाला कीड लागू नये म्हणून काय करावे? पीठ महिनाभराच्या आत खराब होऊ नये, यासाठी स्टोअर करताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्या? पाहूयात(How to Store Flour and Avoid Flour Bugs-3 Kitchen Tips).
कोणत्या डब्यात पीठ स्टोअर करून ठेवावे?
बरेच जण प्लास्टिकच्या डब्यात पीठ स्टोअर करून ठेवतात. पण प्लास्टिकच्या डब्यात दीर्घकाळ पीठ चांगले राहत नाही. ते लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते. एअर टाईट डब्यात साठवल्याने पिठाला लगेच हवा लागते. ज्यामुळे पीठ लवकर मॉईश्चर पकडू शकते. त्यामुळे नेहमी घट्ट झाकणाच्या स्टील किंवा प्लास्टिकच्या डब्यात पीठ साठवून ठेवा.
रवीने घुसळून लोणी काढून करा रवाळ तूप, दाणेदार तुपाची सोपी रेसिपी-बनते १० मिनिटात
मीठ
कीटकांना पिठापासून दूर ठेवायचं असेल तर, मिठाचा वापर करा. जर एक किलो पीठ असेल तर, त्यात अर्धा किंवा एक चमचा मीठ घालून मिक्स करा. मिठामुळे पीठ अधिक काळ फ्रेश राहते. शिवाय त्यात कीड किंवा अळ्या तयार होत नाही.
तमालपत्र
मिठाऐवजी आपण तमालपत्राचा देखील वापर करू शकता. तमालपत्रातील उग्र गंधामुळे पिठात कीड किंवा अळ्या तयार होणार नाही. आपण पीठ साठवताना त्यात २ ते ३ तमालपत्रे ठेवू शकता. यामुळे पीठ दीर्घकाळ फ्रेश राहील.
कांदा चिरताना डोळ्यातून पाण्याच्या धारा? कांदा चिरताना ३ प्रकारच्या पाण्यात ठेवा - कांदा रडवणार नाही
फ्रिज
फ्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात पीठ साठवून ठेवण्यात येऊ नाही शकत. पण फ्रिजमध्ये पीठ साठवून ठेवल्यास कीड लागत नाही. आपण डब्यात पीठ घालून, डबा फ्रिजरमध्ये ठेवू शकता. जर फ्रिजरमध्ये जास्त जागा नसेल तर, एअर टाईट प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करा. या ट्रिकमुळे पीठ लवकर खराब होणार नाही.