कोणत्याही पदार्थाला शेवटचा टच म्हणून वरून कोथिंबीर भुरभुरली जाते. कोथिंबीर टाकताच पदार्थाची चव वाढते. कोथिंबीरीचे अनेक पदार्थ केले जातात. पण काहींना कोथिंबीर निवडून - साठवून ठेवायला खूप कठीण जाते. कोथिंबीर बाहेर ठेवल्यास लवकर खराब होते. कोथिंबीरीचे पानं लवकर पिवळी पडतात.
कोथिंबीर व्यवस्थित स्टोर न केल्यास ती लवकर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर आपल्याला आठवडाभर कोथिंबीर साठवून ठेवायची असेल तर या ४ ट्रिक वापरून पाहा. या ट्रिकमुळे कोथिंबीर अधिक काळ टिकून राहेल. मुख्य म्हणजे ती सुकणार नाही - फ्रेश राहेल. कोथिंबीर फ्रेश व अधिक काळ टिकवून ठेवायची असेल तर, या ट्रिक्स आपल्याला मदत करतील(How To Store Fresh Coriander? 4 Expert Tips To Remember).
कोथिंबीर अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी ट्रिक
कोथिंबीरीची मुळं पाण्यात बुडवून ठेवा
जेव्हा कोथिंबीर घरी विकत घेऊन आणाल, तेव्हा सर्वप्रथम एका ग्लासामध्ये किंवा डब्यात पाणी भरून ठेवा. त्यात कोथिंबीरीची मुळं बुडवून ठेवा. असे केल्याने ते कोरडे होणार नाहीत आणि ताजे राहतील. हवं तसं आपण कोथिंबीरीची पानं काढून घेऊ शकता. मात्र, कोथिंबीरीवर पाणी शिंपडत राहा. जेणेकरून ती लवकर सुकणार नाही.
टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत आगरी पद्धतीची सुरेख भाकरी करण्याची १ सोपी ट्रिक
सावलीत ठेवा
कोथिंबीर धुवून झाल्यानंतर सूर्यप्रकाशासमोर ठेऊ नका. यामुळे कोथिंबीर लवकर सुकण्याची शक्यता निर्माण होते. कारण कोथिंबीरीची पानं नाजूक असतात, त्या लवकर सुकतात. उन्हामुळे कोथिंबीर फ्रेश राहत नाही. म्हणून सावलीत कोथिंबीर वाळत ठेवा.
एअर टाइट कंटेनरचा वापर करा
कोथिंबीर धुवून - निवडून झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा. कोथिंबीर सुकण्याची भीती असल्यास त्यात ओला टिश्यू पेपर टाकून ठेवा. असे केल्याने त्याचा सुगंधही कायम तसाच राहेल. व सुकण्याची शक्यता देखील कमी होते.
दही कधी आंबट-कडसर तर कधी पातळ होते? ४ सोप्या टिप्स, दही लागेल गोडसर-घट्ट
बर्फाच्या पाण्याने धुवा
कोथिंबीर सुकू नये असे वाटत असेल तर, कोथिंबीर बर्फाच्या पाण्यात धुवा. असे केल्याने पाने कोमेजणार नाहीत, व ती अधिक काळ ताजी राहतील.