Join us  

आता वर्षभर खा स्ट्रॉबेरी, फ्रिजमध्ये वर्षभर स्ट्रॉबेरी साठवून ठेवण्याची सोपी ट्रिक, सिझन संपला तरी टेंशन नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2023 1:43 PM

How to Store Fresh Strawberries: Tips for Storing Strawberries स्ट्रॉबेरी मिल्कशेक ते सॅलेड यासाठी वर्षभर स्ट्रॉबेरी वापरा, कशी साठवून ठेवायची पाहा.

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारांत फळे व भाज्या अतिशय ताज्या आणि फ्रेश विकत मिळतात. परंतु जसजसा थंडीचा सीजन संपून कडक ऊन्हाळा सुरु होतो तेव्हा भाज्या फारश्या ताज्या मिळत नाहीत. ऊन्हामुळे भाज्या व फळे जास्तकाळ टिकवणं कठीण होत. काही फळांचा व भाज्यांचा काही मोजकाच सीजन असतो. तर काही भाज्या आणि फळे बारमही बाजारांत विकत मिळतात. बारमही बाजारांत विकत मिळणाऱ्या भाज्या व फळे आपण कधीही खरेदी करुन आणू शकतो. परंतु काही ठराविक सिजनमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांच्या व फळांचा आस्वाद हा त्या ठराविक सिजनपुरताच घेता येतो.

आंबा, स्ट्रॉबेरी, फणस ही काही अशी निवडक फळ आहेत ज्यांचा आस्वाद वर्षभर घेता येत नाही. ऐन थंडीच्या दिवसांत मिळणारी आंबट - गोड, लालचुटुक स्ट्रॉबेरी खाण्याची मजा काही वेगळीच असते. थंडीच्या दिवसांत मिळणारी लालचुटुक स्ट्रॉबेरी कितीही खाल्ली तरी आपले मन भरत नाही. काही फळ ही सिजनल असल्याकारणाने काही ठराविक काळापुरतीच खाऊ शकतो. अशावेळी आपल्या आवडीच्या फळांचा आस्वाद वर्षभर घेता यावा असे मनोमन वाटते. आता थंडीच्या दिवसांत मिळणारी लालचुटुक स्ट्रॉबेरी आपण स्टोअर करुन कधीही ती खाऊ शकतो. पाहूयात स्ट्रॉबेरी साठवून ठेवण्याची सोपी पद्धत(How to Store Fresh Strawberries: Tips for Storing Strawberries).

नक्की काय उपाय करता येऊ शकतो? 

१. सगळ्यांत आधी स्ट्रॉबेरी किमान २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. २. आता एका सुती कापडावर किंवा पाणी शोषून घेईल अशा टॉवेलवर स्ट्रॉबेरी अंथरून घ्यावी. ३. त्या स्ट्रॉबेरीतील अतिरिक्त पाणी टॉवेलच्या मदतीने पुसून घ्यावे. स्ट्रॉबेरी सुकून संपूर्ण कोरडी होऊ द्यावी.४. त्यानंतर स्ट्रॉबेरीवर असणारे हिरवे देठ हाताने अलगद मोडून घ्यावे. 

५. स्ट्रॉबेरीवर असणारा हिरवा देठ काढून घेतल्यानंतर, देटाकडील पांढरा भाग सुरीचे कापून घ्यावा. ६. आता या सगळ्या स्ट्रॉबेरीज, एका मोठ्या झिप लॉक बॅगमध्ये भरुन व्यवस्थित पॅकिंग करुन ठेवाव्यात. ७. ही झिप लॉक बॅग आता फ्रिजमध्ये रेफ्रिजरेट करण्यासाठी ठेवावी. 

अशाप्रकारे केवळ काही सिजनपुरतीच मिळणारी स्ट्रॉबेरी आता आपण व्यवस्थित स्टोअर करुन कधीही स्ट्रॉबेरी खाण्याचा आनंद लुटू शकता. स्ट्रॉबेरीज स्टोअर करण्याच्या अजून २ पद्धती या व्हिडीओच्या माध्यमातून समजून घेऊयात.   

टॅग्स :अन्न