Lokmat Sakhi >Food > ४- ५ दिवसांतच आलं सुकून जातं? २ खास उपाय- ६ महिने आलं राहील एकदम ताजं- सुगंधी 

४- ५ दिवसांतच आलं सुकून जातं? २ खास उपाय- ६ महिने आलं राहील एकदम ताजं- सुगंधी 

Simple Method For The Storage Of Ginger For Long: आलं तब्बल ६ महिने एकदम फ्रेश आणि सुगंधी ठेवण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा..(how to store ginger for 6 months?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 09:21 AM2024-10-11T09:21:51+5:302024-10-11T14:15:01+5:30

Simple Method For The Storage Of Ginger For Long: आलं तब्बल ६ महिने एकदम फ्रेश आणि सुगंधी ठेवण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून पाहा..(how to store ginger for 6 months?)

how to store ginger for 6 months, simple method for the storage of ginger for long | ४- ५ दिवसांतच आलं सुकून जातं? २ खास उपाय- ६ महिने आलं राहील एकदम ताजं- सुगंधी 

४- ५ दिवसांतच आलं सुकून जातं? २ खास उपाय- ६ महिने आलं राहील एकदम ताजं- सुगंधी 

Highlightsबऱ्याच जणींचा असा अनुभव आहे की आपण ते फ्रिजमध्ये ठेवलं तरी ४ ते ५ दिवसांतच ते कोमेजून जातं, सैलसर पडतं, सुकून जातं.

आलं आपल्याला नेहमीच स्वयंपाक घरात लागतं. कधी भाज्यांमधे, कधी चहामध्ये तर कधी वेगवेगळ्या रेसिपींमध्ये..  आलं घालून  केलेल्या चहाचा सुगंध आणि चव दोन्हीही लगेचच थकलेल्या मनाला आणि शरीराला रिफ्रेश करणारं असतं (kitchen tips). मसालेदार भाज्यांमध्येही आलं हमखास लागतंच. त्यामुळे ते आपल्या घरात  नेहमीच असावं असं वाटतं (how to store ginger for 6 months?). पण बऱ्याच जणींचा असा अनुभव आहे की आपण ते फ्रिजमध्ये ठेवलं तरी ४ ते ५ दिवसांतच ते कोमेजून जातं, सैलसर पडतं, सुकून जातं.(simple method for the storage of ginger for long)

 

आलं जास्तीतजास्त दिवस फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याचा उपाय

आलं जास्तीतजास्त दिवस फ्रेश आणि सुगंधी ठेवण्यासाठी नेमका काय उपाय करावा, याविषयीची माहिती suman.ranganath.gowda या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

दसरादिवाळी स्पेशल : घराची शोभा वाढविणाऱ्या पाहा सुंदर रांगोळी डिझाइन्स- पायऱ्यांवर काढा रंगबिरंगी रांगोळ्या

यामध्ये २ उपाय सुचविण्यात आले आहेत. पहिल्या उपायानुसार तुम्ही आलं तब्बल ६ महिने टिकवून ठेवू शकता आणि दुसऱ्या उपायानुसार ते १ महिना तरी चांगले राहाते. जेव्हा आलं स्वस्त असतं, तेव्हा ते भरपूर प्रमाणात घ्या आणि या पद्धतीने साठवून ठेवा.

बाळंतपणापुर्वी अनुष्का शर्माने घेतला होता खास डाएट प्लॅन! काय होतं त्या प्लॅनमध्ये- का होता गरजेचा?

यामध्ये असं सांगितलं आहे की आलं घेतल्यानंतर ते बारकाईने पाहा आणि त्याला काही कोंब आले असतील तर ते काढून टाका.

त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्या. त्यात थोडी हळद टाका आणि त्या हळदीच्या पाण्यात आलं स्वच्छ धुवून घ्या..

 

स्वच्छ धुवून घेतलेलं आलं एका स्वच्छ कपड्यावर काढा आणि ते व्यवस्थित पुसून घ्या. काही तास ते तसेच मोकळ्या हवेत राहू द्या.

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मानसी पारेखने नेसली ‘साडी विथ जॅकेट’-बघा फोटो-करा दिवाळीत स्पेशल लूक

जेव्हा आलं पुर्णपणे सुकेल तेव्हा ते एका झिपलॉक पिशवीमध्ये घाला. पिशवीतली हवा पुर्णपणे काढून घ्या आणि मग ते आलं फ्रिजरमध्ये ठेवून द्या. अशा पद्धतीने ठेवलेलं आलं अगदी ६ महिने जशास तसं राहील. शिवाय त्याचा सुगंधही टिकून राहण्यास मदत होईल.


 

जर आलं एवढे दिवस टिकवून ठेवण्याची इच्छा नसेल तर वरीलप्रमाणे आलं हळदीच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ते सुकलं की पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळा आणि झिपलॉक बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवून द्या. ते आलं फ्रिजरमध्ये ठेवण्याची गरज नाही. 

 

Web Title: how to store ginger for 6 months, simple method for the storage of ginger for long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.