Lokmat Sakhi >Food > आलं-लसणाची पेस्ट लवकर खराब होते? शेफ पंकज यांची १ खास ट्रिक, महिनोंमहिने चांगली राहील पेस्ट

आलं-लसणाची पेस्ट लवकर खराब होते? शेफ पंकज यांची १ खास ट्रिक, महिनोंमहिने चांगली राहील पेस्ट

How To Store Ginger Garlic Paste For Long Time : पाकीटातील आलं लसूण पेस्टमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:19 IST2025-01-09T16:51:40+5:302025-01-09T17:19:02+5:30

How To Store Ginger Garlic Paste For Long Time : पाकीटातील आलं लसूण पेस्टमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो.

How To Store Ginger Garlic Paste For Long Time Chief Pankaj Bhadoria Tips | आलं-लसणाची पेस्ट लवकर खराब होते? शेफ पंकज यांची १ खास ट्रिक, महिनोंमहिने चांगली राहील पेस्ट

आलं-लसणाची पेस्ट लवकर खराब होते? शेफ पंकज यांची १ खास ट्रिक, महिनोंमहिने चांगली राहील पेस्ट

लसूण आणि आल्याची पेस्ट तब्येतीसाठी आणि चवीला फायदेशीर मानली जाते. याव्यतिरिक्त स्वंयपाकात या पेस्टचा समावेश केल्यास चव दुप्पटीनं वाढते. (Cooking Hacks) अनेक भारतीय पदार्थांमध्ये आलं-लसूण पेस्टचा वापर केला जातो. या पेस्टमुळे जेवणाचा फ्लेवर वाढतो. तसंच दुप्पटीनं चव वाढते.  सतत आलं-लसणाची पेस्ट बनवणं खूप कठीण वाटतं. अशावेळी लोक बाजारात रेडी उपलब्ध असलेल्या आलं-लसूण पेस्टचा वापर करतात. पाकीटातील आलं लसूण पेस्टमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो. म्हणून या  पेस्टचा वापर करणं टाळायला हवं. (How To Store Ginger Garlic Paste For Long Time Chief Pankaj Bhadoria Tips)

जर तुम्ही घरीच आलं-लसणाची पेस्ट बनवली  तर अनेक दिवस ती चांगली राहील तसंच फ्रेश चव येईल. लोक जास्त प्रमाणात आलं-लसणाची पेस्ट बनवत नाहीत कारण पडून पडून ही पेस्ट खराब होते. शेफ पंकज भदौरीया यांनी लसूण-आल्याची  पेस्ट साठवण्याची खास पद्धत सांगितली आहे. शेफ पंकज सांगतात की आलं-लसणाची पेस्ट स्टोअर केल्यास ती अनेक आठवडे खराब होत नाही. याशिवाय या पेस्टची टेस्ट आणि फ्लेवरही चांगला राहतो. 


आलं-लसणाची पेस्ट कशी चांगली ठेवावी?

आलं-लसणाची पेस्ट दीर्घकाळ ताजी राहण्यासाठी योग्य प्रमाणात लसूण आणि आलं मिक्स करून घ्या. शेफ पंकज भदौरीया यांनी जिंदर गार्लिक पेस्ट बनवण्यासाठी ६० टक्के लसूण, ४० टक्के आलं एकत्र करण्याचा सल्ला दिला आहे. हे सर्व साहित्य सोलून झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये  घाला. नंतर यात तेल, व्हिनेगर, मीठ मिसळा. सर्व साहित्य एकजीव करून घ्या.

प्रोटीनसाठी 'हे' पदार्थ खाता पण त्यात प्रोटीन आहे का? आहारतज्ज्ञ सांगतात, कोणत्या पदार्थांत प्रोटीन नसतं..

ही पेस्ट तयार करण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करू नका. लसूण आणि आल्याची पेस्ट तयार केल्यानंतर तुम्ही ही पेस्ट एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता किंवा फ्रिजमध्ये ठेवू शकता.  या पद्धतीनं आलं, लसणाची पेस्ट बनवल्यास फ्लेवर, अरोमा चांगला राहील.

Web Title: How To Store Ginger Garlic Paste For Long Time Chief Pankaj Bhadoria Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.