Lokmat Sakhi >Food > फ्रिजमध्ये ठेवताच आलं सुकतं-खराब होतं? ५ सोप्या टिप्स; महिनाभर आलं राहील फ्रेश

फ्रिजमध्ये ठेवताच आलं सुकतं-खराब होतं? ५ सोप्या टिप्स; महिनाभर आलं राहील फ्रेश

How to Store Ginger So It Stays Fresh and Potent : आलं सुकल्यावर फेकून देऊ नका, स्टोर करतानाच ५ युक्त्या वापरून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2024 10:00 AM2024-05-03T10:00:12+5:302024-05-03T10:05:01+5:30

How to Store Ginger So It Stays Fresh and Potent : आलं सुकल्यावर फेकून देऊ नका, स्टोर करतानाच ५ युक्त्या वापरून पाहा..

How to Store Ginger So It Stays Fresh and Potent | फ्रिजमध्ये ठेवताच आलं सुकतं-खराब होतं? ५ सोप्या टिप्स; महिनाभर आलं राहील फ्रेश

फ्रिजमध्ये ठेवताच आलं सुकतं-खराब होतं? ५ सोप्या टिप्स; महिनाभर आलं राहील फ्रेश

उष्णता वाढली की, प्रत्येक पदार्थ लवकर खराब होते (Summer). अन्न लवकर खराब होऊ नये म्हणून, आपण फ्रिजमध्ये साठवून ठेवतो. अन्नव्यतिरिक्त आपण भाज्या देखील फ्रिजमध्ये ठेवतो. भाज्या, फळे, कोथिंबीर, आलं (Ginger), हिरवी मिरची आपण डब्यात ठेवतो. कोथिंबीरसोबत हिरवी मिरची आणि आलं देखील सुकून जाते. अशावेळी आलं स्टोर कसे करावे असा प्रश्न निर्माण होतो.

आल्याचा छोटासा तुकडा पदार्थाची चव बदलते. ज्यामुळे चव दुपट्टीने वाढते. पण फ्रिजमध्ये आलं लवकर सुकते. ज्यामुळे आल्याची चवही बिघडते. आलं अधिक दिवस फ्रेश टिकावे. शिवाय लवकर खराब होऊ नये, असे वाटत असेल तर, ५ टिप्स फॉलो करा.यामुळे आलं अधिक दिवस फ्रेश टिकेल(How to Store Ginger So It Stays Fresh and Potent).

आलं स्टोर करण्याची योग्य पद्धत..

- बाजारातून आलं आणल्यानंतर धुवून घ्या. नंतर टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे स्टोर केल्याने त्याच्या भोवतीने ओलावा निर्माण होणार नाही. शिवाय अधिक दिवस फ्रेश राहील.

- जर आपण आले जास्त प्रमाणात विकत घेतले असेल आणि ते वाया घालवायचे नसेल तर, आल्याचे तुकडे करा. तुकडे केलेले आले हवाबंद डब्यात साठवून ठेवा. त्यात व्हिनेगर घाला. यामुळे महिनाभर आले खराब होणार नाही.

दही आंबट तर कधी पातळ होते? दही लावताना लक्षात ठेवा १ ट्रिक, घट्टसर कवडी दह्याची गॅरंटी

- आलं खराब होऊ नये असे वाटत असेल तर, आल्याची पेस्ट तयार करा. त्यात मीठ घाला, जेणेकरून आल्याची पेस्ट खराब होणार नाही. आपण तयार आल्याची पेस्ट एअर टाईट डब्यात भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊ शकता.

- आपण अधिक प्रमाणात आलं विकत आणलं असेल तर, धुवून उन्हात सुकवण्यासाठी ठेवा. आलं वाळल्यानंतर भाजून पावडर करा. तयार पावडर हवाबंद डब्यात स्टोर करा. आपण आल्याची पावडर विविध पदार्थात वापरू शकता.

डाळ-तांदूळ भिजवायची गरजच नाही, करा १० मिनिटांत सुपरसॉफ्ट इडली; उन्हाळ्यात खा हलकेफुलके

- आपण आलं प्लास्टिकच्या झिपलॉकमध्ये देखील स्टोर करून ठेऊ शकता. यात आठवडाभर फ्रेश राहील. 

Web Title: How to Store Ginger So It Stays Fresh and Potent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.