Lokmat Sakhi >Food > खवलेलं नारळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी सुकतंच? ‘हा’ पदार्थ कालवून ठेवा, खवट न होता टिकेल खूप दिवस...

खवलेलं नारळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी सुकतंच? ‘हा’ पदार्थ कालवून ठेवा, खवट न होता टिकेल खूप दिवस...

How to store coconut, freeze grated coconut : How to Store Grated Coconut up to a Month : the best ways to preserve grated coconut for long : Store grated coconut in freezer for longer shelf life : ओलं खोबरं सुकून खराब होऊ नये यासाठी ते स्टोअर करण्याची भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 06:21 PM2024-11-22T18:21:02+5:302024-11-22T18:21:37+5:30

How to store coconut, freeze grated coconut : How to Store Grated Coconut up to a Month : the best ways to preserve grated coconut for long : Store grated coconut in freezer for longer shelf life : ओलं खोबरं सुकून खराब होऊ नये यासाठी ते स्टोअर करण्याची भन्नाट ट्रिक...

How to Store Grated Coconut up to a Month How to store coconut, freeze grated coconut the best ways to preserve grated coconut for long | खवलेलं नारळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी सुकतंच? ‘हा’ पदार्थ कालवून ठेवा, खवट न होता टिकेल खूप दिवस...

खवलेलं नारळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी सुकतंच? ‘हा’ पदार्थ कालवून ठेवा, खवट न होता टिकेल खूप दिवस...

स्वयंपाक करण्यासाठी आपण सुकं आणि ओलं खोबरं वापरतो. पदार्थात खोबरं घातल्याने त्याची चव अधिकच सुंदर लागते आणि तो पदार्थ चवीला उत्तमच लागतो. पदार्थांची चव वाढवण्यासाठी खोबरं वापरतो परंतु हे खोबरं किसायच म्हणजे अनेकजणींना फार कंटाळवाणे काम वाटते. खोबरं हवं असेल तर सर्वात आधी नारळ फोडून घ्यावा लागतो. हा फोडलेला नारळ मग विळीवर किसावा लागतो. काहीवेळा खोबरं किसताना हात दुखून येतो तर घाईच्या वेळी खोबरं किसण्यात फार वेळ जातो. यासाठी काहीजणी आठवडाभर लागेल इतके खोबरं एकाचवेळी एकदम किसून ठेवतात. हे किसून घेतलेलं खोबरं आपण एका एअर टाईट कंटेनर किंवा स्टीलच्या डब्यांत (How to store coconut, freeze grated coconut) स्टोअर करुन ठेवतो. अशा पद्धतीने किसून ठेवलेलं खोबर लगेच वापरायला सोपं जात, आणि आयत्यावेळी गडबड देखील होत नाही(How to Store Grated Coconut up to a Month).

परंतु हे एकदाच किसून ठेवलेलं खोबरं व्यवस्थित स्टोअर करून ठेवल नाही तर लगेच खराब होते. इतकचं नाही तर काहीवेळा हे खोबरं दीर्घकाळ स्टोअर (Store grated coconut in freezer for longer shelf life) करुन ठेवले तर ते सुकतं, किंवा फ्रिजमध्ये ठेवल्याने ते गोठून दगडासारखे कडक होते. अशा खोबऱ्याची चव नीट लागत. त्यामुळे किसून ठेवलेलं खोबर खराब न होता किंवा सुकू नये यासाठी ते स्टोअर करण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करु शकतो. ही ट्रिक वापरुन आपण किसलेलं ओलं खोबरं खराब न होता दीर्घकाळासाठी स्टोअर करुन ठेवू शकतो(the best ways to preserve grated coconut for long).

किसलेलं ओलं खोबरं असे करा स्टोअर...   

किसलेलं ओलं खोबरं स्टोअर करण्याची नवी ट्रिक premasculinary या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. किसलेलं ओलं खोबरं स्टोअर करण्यासाठी, सर्वात आधी नारळ फोडण्यापूर्वी तो पाण्याखाली धरुन स्वच्छ धुवून घ्यावा. नारळ धुतल्यानंतर तो फोडून त्यातील पाणी काढून घ्यावे. 

पोटभर खा गूळ मखाणे! ऐन थंडीत कडकडून भूक लागली की खा हा मस्त पदार्थ-पाहा सोपी रेसिपी...

आता नारळ किसून त्याच खोबरं काढून घ्यावं. खोबरं काढल्यानंतर ते स्टोअर करण्यापूर्वी त्यात १ टेबलस्पून तांदुळाचे पीठ घालून हे हाताने सगळ्या खोबऱ्यात कालवून घ्यावे. त्यानंतर खोबरं काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यांत भरुन ठेवावे. खोबरं स्टोअर करण्यासाठी आपण झिपलॉक बॅगेचाही वापर करु शकता. 

खोबरं हवाबंद डब्यांत भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करण्यासाठी ठेवून द्यावे. जर आपल्याला हे किसलेलं खोबरं महिनाभर स्टोअर करायचे असेल तर ते डिप फ्रिझरमध्ये ठेवून द्यावे, आणि जर पुढील ३ ते ४ दिवसांसाठी स्टोअर करायचे असेल तर फ्रिजमध्ये ठेवावे. 

हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...


हिंदी सिनेमात गाजलेले ‘मुली के पराठे’ हिवाळ्यात तर खायलाच हवे, पाहा सोपी आणि पौष्टिक रेसिपी...

अशा पद्धतीने किसलेलं खोबरं स्टोअर केल्यास ते खराब न होता महिनाभर चांगले टिकून राहते. तांदुळाचे पीठ मिक्स केलेलं खोबरं आपण कोणत्याही पदार्थ वापरू शकता, परंतु त्यात तांदुळाच्या पिठाची चव येणार नाही यामुळे आपण अगदी बिनधास्तपणे सगळ्या पदार्थात असे स्टोअर केलेलं खोबरं वापरु शकता.

Web Title: How to Store Grated Coconut up to a Month How to store coconut, freeze grated coconut the best ways to preserve grated coconut for long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.