रोजचा स्वयंपाक करायचा म्हटलं तर आपल्याला हिरवी मिरची लागतेच. जेवणाला झणझणीत चव येण्यासाठी आपण मिरच्यांचा वापर करतो. कधी आपण लाल सुक्या मिरच्यांचा वापर करतो तर कधी हिरव्यागार गर्द मिरच्या जेवणात घालूंन जेवणाची टेस्ट वाढवतो. अगदी चटणी असो किंवा वरणाची फोडणी हिरव्या मिरचीच्या तडक्याशिवाय त्याला चवच येत नाही. भारतात हिरव्या मिरच्यांचा वापर अधिक होतो. महाराष्ट्रात तिखट खाण्याचे शौकीन भरपूर संख्येने उपलब्ध मिळतील. हिरव्या मिरच्यांशिवाय भारतीय जेवण अपुरेच आहे. हिरव्या मिरच्यांमुळे पदार्थाचे स्वाद द्विगुणीत होतात मात्र, हिरव्या मिरच्यांना स्टोर करून ठेवणे कठीण जाते.
या हिरव्या मिरच्या रोजच्या वापरात लागतातच त्यामुळे आपण त्यांचा पुरेसा साठा करुन त्या फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु काहीवेळा या हिरव्या मिरच्या अगदी व्यवस्थित स्टोअर केलेल्या तरीही त्या लवकर खराब होतात. या साठवून ठेवलेल्या हिरव्या मिरच्या लवकर लाल पडतात, काहींची चव लवकर बदलते. त्यामुळे आपण अधिक प्रमाणात एकाच वेळी मिरच्या साठवून ठेवू शकत नाही. अशा स्थितीत एक ट्रिक मिरच्या स्टोर करण्यासाठी उपयुक्त पडेल. ही ट्रिक फॉलो केल्याने हिरव्या मिरच्या स्टोअर करणे सोपे जाईल. त्याचबरोबर त्या खूप दिवस टिकतील(4 Easy Way To Preserve Green Chillies For Longer Period Without A Refrigerator).
हिरव्या मिरच्या खूप दिवस चांगल्या टिकवून ठेवण्यासाठी :-
१. टिश्यू पेपरचा करा असा वापर :- हिरवी मिरची साठवण्यासाठी आपण टिश्यू पेपरची मदत घेऊ शकता. सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्यात चांगल्या प्रकारे धुवून घ्या. आता एका भांड्यात थंड पाणी घ्या, या पाण्यात हिरव्या मिरच्या भिजवा. काही वेळानंतर हिरवी मिरची पाण्यातून काढा, त्यावरील देठ तोडून घ्या. यासह खराब हिरव्या मिरच्या काढून वेगळे करा. आता हिरव्या मिरच्या सुकण्यासाठी ठेवा. मिरच्या सुकल्यानंतर टिश्यू पेपरमध्ये ठेवा आणि चांगले गुंडाळा. यामुळे मिरच्या महिनाभर ताज्या आणि हिरव्या राहतील.
२. झिप लॉक बॅग :- हिरव्या मिरच्या अधिक काळ टिकवायच्या असतील तर त्या झिप लॉक बॅगेमध्ये साठवून ठेवाव्यात. मिरच्या बाहेर ठेवल्या तर त्या सुकतात आणि फ्रिजमध्ये ठेवल्यास अति थंड वातावरणामुळे काळ्या पडतात. या हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून संपूर्ण कोरड्या करुन झिप लॉक बॅगेमध्ये भरुन ठेवा म्हणजे त्या अधिक काळ टिकतील. मिरचीचा देटाकडचा भाग काढून त्या झिप लॉक बॅगेमध्ये साठवल्यास अधिक दिवस टिकतात. मात्र झिप लॉक करताना त्यामध्ये हवा जाणार नाही याची काळजी घ्यावी. झिप लॉक केलेली बॅग आपण फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता.
टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...
कोथिंबीर स्वस्त झाली तर जास्तीची साठवून ठेवता येईल का? पाहा झटपट सोपी ट्रिक...
३. हवाबंद डब्यांत ठेवा मिरच्या :- झिप लॉक बॅंगेप्रमाणेच हवाबंद डब्यामध्येही मिरच्या अधिक दिवस टिकतात. डब्यामध्ये एक रूमाल अंथरुन ठेवा. त्यानंतर मिरच्या त्यामध्ये झाकून ठेवा म्हणजे मिरच्यांमधील ओलेपणा शोषला जातो, व यामुळेच मिरच्या जास्त काळासाठी फ्रेश राहून टिकवून ठेवता येतात.
४. अॅल्युमिनियम फॉईलचा वापर :- हिरव्या मिरच्यांना अधिक काळ टिकवायच्या असतील तर अॅल्युमिनियम फॉईलमध्ये त्या कव्हर करून ठेवाव्यात. डबा किंवा प्लेटमध्ये हिरव्या मिरच्या ठेवून त्यावर ऑल्युमिनियम फॉईल लावा. ही प्लेट किंवा डबा ६ ते ७ तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर मिरच्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा. हा डबा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. यामुळे मिरच्या काही महिने ताज्या ठेवता येऊ शकतात.