थंडीच्या सिझनमध्ये मटार (Green Peas) मोठ्या प्रमाणात मिळतात. या दिवसात मटारचे अनेक पदार्थ केले जातात. शिवाय अनेक पदार्थात मटारचा समावेश केला जातो. मटारचे कबाब, मटारची भाजी, भजी आपण या सिझनमध्ये आवडीने खातो. पण मटारचा सिझन संपला तर, पुन्हा बाजारात मिळत नाही. काही जण मटार मिळत नाही म्हणून स्टोअर करून ठेवतात. शिवाय स्टोअर करून ठेवलेल्या मटारचा वापर वर्षभर करतात. पण जर मटार योग्यरित्या स्टोअर करून ठेवलं नाही तर ते लवकर खराब होतात. यासह मटारची चवही बिघडते.
अनेकांना मटार स्टोअर करण्याची योग्य पद्धत ठाऊक नसते. अशावेळी मटार सोलण्याची मेहनत, वेळ आणि पैसाही वाया जातो. जर आपल्याला वर्षभर मटार टिकवून ठेवायचं असेल, शिवाय स्टोअर करण्याची पद्धत जाणून घ्यायची असेल तर, एकदा ही ट्रिक पाहा. या ट्रिकच्या मदतीमुळे मटार वर्षभर आरामात टिकतील(How to store green peas for a long time in the fridge).
मटार स्टोअर करून ठेवण्याची सोपी ट्रिक
- मटार सोलताना समोर दोन भांडे ठेवा. एका भांड्यात मटारचे मोठे दाणे ठेवा. तर दुसऱ्या भांड्यात लहान कोवळे दाणे ठेवा. कोवळे दाणे पदार्थात वापरून घ्या आणि मोठे दाणे साठवून ठेवा.
एलपीजी गॅस बचत करण्याच्या ५ खास टिप्स
- एका भांड्यात पाणी घ्या, त्यात सोळलेले मटार घालून धुवून घ्या. दुसरीकडे एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात स्वच्छ धुवून घेतलेले मटार घाला, गॅस मध्यम आचेवर ठेवा. २ मिनिटानंतर चाळणीने पाणी निथळून मटार वेगळे करा.
- एका सुती कापडावर मटार पसरवून ठेवा. जेणेकरून त्यातील पाणी कापड शोषून घेईल. नंतर एका मोठ्या भांड्यात मटार घालून त्यात एक चमचा मोहरी तेल घालून मिक्स करा. जेणेकरून मटार दीर्घकाळ टिकेल.
मुलाखत देताना त त प प होते? ३ सोप्या गोष्टी, नोकरीसाठी सिलेक्शन होणारच
- शेवटी एका पॉलिथिनमध्ये मटार भरून त्यावर रबर बॅण्ड लावून पॅक करा. आपण हे मटार प्लास्टिकच्या डब्यात देखील साठवून ठेऊ शकता. या काही ट्रिक्समुळे मटार दीर्घकाळ फ्रेश टिकतील, शिवाय लवकर खराब होणार नाही.