Lokmat Sakhi >Food > कोथिंबीर १५ दिवस राहणार एकदम फ्रेश- हिरवीगार, निवडण्याचीही गरज नाही, बघा सोपा उपाय..

कोथिंबीर १५ दिवस राहणार एकदम फ्रेश- हिरवीगार, निवडण्याचीही गरज नाही, बघा सोपा उपाय..

How to Store Kothimbir For 15 Days: हा उपाय करून बघा. कोथिंबीरचा (coriander leaves) ताजेपणा आणि तिचा सुवास १५ ते २० दिवस कमी होणार नाही.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2023 01:23 PM2023-01-14T13:23:28+5:302023-01-14T13:24:27+5:30

How to Store Kothimbir For 15 Days: हा उपाय करून बघा. कोथिंबीरचा (coriander leaves) ताजेपणा आणि तिचा सुवास १५ ते २० दिवस कमी होणार नाही.. 

How to store kothimbir or coriander leaves for 15 to 20 days? Simple trick for the storage of kothimbir | कोथिंबीर १५ दिवस राहणार एकदम फ्रेश- हिरवीगार, निवडण्याचीही गरज नाही, बघा सोपा उपाय..

कोथिंबीर १५ दिवस राहणार एकदम फ्रेश- हिरवीगार, निवडण्याचीही गरज नाही, बघा सोपा उपाय..

Highlightsहा उपाय करण्यासाठी कोथिंबीर निवडून ठेवण्याचीही गरज नाही. अगदी ५ मिनिटांत झटपट होणारा हा उपाय आहे. शिवाय कोणत्याही सिझनमध्ये तुम्ही तो करू शकता.

केलेल्या पदार्थांवरून कोथिंबीरची छानशी पेरणी झाली की मग पदार्थाची चव तर वाढतेच पण सुवासातही आणखी भर पडते. त्यामुळे स्वयंपाक घरात कोथिंबीरीचा वापर आवर्जून केलाच जातो. आता दररोज थोडी- थोडीच कोथिंबीर आपण वापरतो (Simple trick for the storage of kothimbir). त्यामुळे एकदा घेतलेली कोथिंबीरची जूडी पुढचे काही दिवस सहज वापरता येऊ शकते. पण ती टिकत नाही, त्यामुळे मग नाईलाजाने टाकून द्यावी लागते. (How to store kothimbir or coriander leaves for 15 to 20 days?)

किंवा कधी कधी असंही होतं की बाजारात वारंवार जाणं होत नाही. त्यामुळे आठवड्याभराच्या भाज्या आपण एकदाच घेऊन ठेवतो. अशावेळी कोथिंबीरच्याही फ्रेश दिसणाऱ्या २- ३ जुड्याही आपण उत्साहात घेऊन येतो. पण त्यातली एखादीच जुडी वापरून होते आणि बाकीच्या मात्र खराब होऊन जातात. अशावेळी या जुड्या कशा पद्धतीने साठवून ठेवाव्या, जेणेकरून त्या पुढचे १५ ते २० दिवस तरी फ्रेश राहतील, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एकदा बघाच. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या mucherla.aruna या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

कोथिंबीर १५ ते २० दिवस फ्रेश ठेवण्याचा उपाय
१. हा उपाय करण्यासाठी कोथिंबीर निवडून ठेवण्याचीही गरज नाही. अगदी ५ मिनिटांत झटपट होणारा हा उपाय आहे. शिवाय कोणत्याही सिझनमध्ये तुम्ही तो करू शकता.

तीळ -खव्याची वडी, जुही परमारने शेअर केली संक्रांत स्पेशल रेसिपी, वडीसाठी हव्या फक्त ३ गोष्टी

२. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काचेची बरणी आणि पाणी एवढ्या दोनच गोष्टी लागणार आहेत.

३. सगळ्यात आधी तर बाजारातून आणलेली कोथिंबीरची जुडी मोकळी करून घ्या. त्यात काही गवत वगैरे असेल तर ते बघून घ्या.

 

४. एका काचेच्या बरणीमध्ये पाणी टाका. साधारण बरणी अर्धी भरेल एवढे पाणी टाकावे.

भाेगीच्या दिवशी तीळ लावून केलेली बाजरीची भाकरीच का खायची? काय त्याचे महत्त्व? वाचा ५ फायदे

५. त्या बरणीत कोथिंबीरची जुडी खोचून ठेवून द्या. फ्लॉवर पॉटमध्ये जशा पद्धतीने आपण फुलं ठेवतो, तशाच पद्धतीने कोथिंबीरीचे देठ पाण्यात बुडतील, अशा पद्धतीने ती ठेवावी. ही बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या आणि जेवढी पाहिजे तेवढीच कोथिंबीर दरवेळी तोडून घ्या. 

 

Web Title: How to store kothimbir or coriander leaves for 15 to 20 days? Simple trick for the storage of kothimbir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.