वारंवार बाजारात जाणं होत नाही. त्यामुळे मग आपण कधी बाजारात गेलो तर किंवा मग दारावर भाजीवाला आला तर एकदमच ३- ४ दिवस पुरेल एवढी भाजी घेऊन ठेवतो. त्यात फळभाज्या घेतल्या तर त्या आपण पटापट फ्रिजमध्ये टाकून देतो. पण पालेभाजी असेल तर मात्र ती निवडूनच ठेवावी लागते. काही वेळा पालेभाजी निवडायला वेळ नसतो, तर काही वेळा ती निवडण्याचा कंटाळा येतो. अशावेळी हे काही उपाय करून पाहा. पालेभाजी न निवडताही २ ते ३ दिवस टिकू शकते. (How to store leafy green vegetables for long without picking them?)
पालेभाजी निवडायला वेळ नसेल तर काय करावे?
१. भाज्यांची देठं कापून घ्या
पालेभाजी निवडत बसणं हे खरंच खूप वेळखाऊ काम आहे. बऱ्याचदा आपण एवढं थकून गेलेलो असतो की भाजी निवडण्याचा खूपच कंटाळा येतो. पण ती भाजी न निवडता तशीच ठेवून दिली तर ती खराब होण्याची भीती असतेच.
रणबीरच्या वाढदिवसासाठी आणलेल्या स्पेशल केकवर आई नितू कपूरने लिहिले, राहाज् पापा....
म्हणूनच अशावेळी पालेभाजीची जुडी ज्या ठिकाणी बांधलेली असते, त्याच्या आणखी थोड्या वरच्या बाजूने सरळ चाकू फिरवा आणि ती जुडी कापून टाका. कापताना भाजी वाया जाणार नाही, याची मात्र काळजी घ्या. आता ही कापलेली भाजी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
२. ग्लासमध्ये घालून ठेवा
न निवडता पालेभाजी टिकवायची असेल तर त्यासाठी हा एक आणखी सोपा उपाय आहे. यासाठी एका ग्लासमध्ये किंवा मोठ्या कॉफी मगमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यात भाजीची देठं बुडवून ठेवा.
आपण एखाद्या फ्लॉवरपॉटमध्ये ज्याप्रमाणे फुलांच्या काड्या बुडवून ठेवतो, त्याप्रमाणे भाज्या ठेवा. हा ग्लास आता फ्रिजमध्ये ठेवून द्या. भाज्या २- ३ दिवस ताज्या राहतील.