दिवाळीचा फराळ (Diwali Faral) तयार करताना किंवा तो विकत मागवायचा असला तरी आपण तो भरपूर मागवतो. जेणेकरून कुणाला काही कमी पडू नये. शिवाय शेजाऱ्यांना, मित्रपरिवाराला, नातलगांनाही तो पाठवायचा असतो. किंवा त्यांना घरी फराळासाठी बोलवायचे असते. त्यामुळे फराळाचे पदार्थ नेहमीच जास्त केले जातात. म्हणूनच दिवाळी संपली तरी घरोघरी फराळ मात्र उरलेला असतो. मोठ्या कष्टाने तयार केलेले हे फराळाचे पदार्थ अधिक काळ टिकवण्यासाठी किंवा त्यांना फ्रेश ठेवण्यासाठी ते योग्य पद्धतीने साठवून ठेवणं (How to store leftover diwali faral properly?) गरजेचं आहे. त्यासाठीच या काही टिप्स बघा.
फराळाचे पदार्थ कसे साठवून ठेवावे?
१. प्लास्टिकमधून बाहेर काढा
जेव्हा कुणाकडून फराळ आपल्या घरी येतो, तेव्हा तो प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेला असतो. या पिशव्या फोडून आपण पदार्थ वाढून घेतो आणि पुन्हा प्लास्टिकची पिशवी तशीच ठेवून देतो.
दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल?
प्लास्टिकमध्ये ठेवलेले पदार्थ लवकर खराब होतात. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशवीत कधीही फराळ अधिक काळ ठेवू नका. तो लगेचच डब्यात भरा.
२. शेव- चकल्या, चिवडा साठविण्यासाठी
शेव- चकल्या, चिवडा यासारखे तिखटाचे पदार्थ अधिक काळ फ्रेश ठेवण्यासाठी ते स्टील किंवा जर्मनच्या डब्यात भरून ठेवावेत.
बाबा म्हणाला लॅपटॉपमध्ये गार्बेज फार, लेकीनं साबणानं घसाघसा कसा धुतला पहा.. व्हायरल व्हिडिओ
प्लास्टिकच्या डब्यात असे तेलकट पदार्थ ठेवल्यास त्यांना काही दिवसांतच तेलाचा वास येऊ लागतो आणि मग तो पदार्थ खाल्ला जात नाही.
३. गोड पदार्थ साठविण्यासाठी
गुलाबजाम, रसगुल्ला असे पाक असणारे गोड पदार्थ त्यांच्या पॅकिंगच्या डब्यात अधिक काळ ठेवू नका. असे पदार्थ नेहमी काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवावेत.
थंडीच्या दिवसांत केसांना लावा हे खास तेल, केसांतला कोंडा होईल कमी- केस राहतील निरोगी
तसेच पेढा, बर्फी, लाडू असे पदार्थ जेव्हा आपण दुकानातून आणतो तेव्हा ते कागदी बॉक्समध्ये असतात. असे पदार्थ या बॉक्समध्ये अधिक दिवस राहिल्यास ते कोरडे पडतात. आणि त्यांची चव उतरते. त्यामुळे हे पदार्थ लगेचच प्लास्टिक किंवा स्टिलच्या डब्यात घालून ठेवा. मिठाई शक्यतो फ्रिजमध्ये ठेवा आणि ४ ते ५ दिवसांपेक्षा जास्त शिळी मिठाई खाऊ नका.