उन्हाळ्याच्या दिवसात लिंबाची मागणी वाढते कारण स्वयंपाकाशिवाय इतर थंड पेयांमध्ये लिंबाचा भरपूर वापर केला जातो. लिंबू खाल्ल्यानं शरीराला अनेक आरोग्यवर्धक फायदेसुद्धा मिळतात. लिंबू टिकवून ठेवण्याच्या काही सोप्या ट्रिक्स समजून घेतल्या तर तुम्ही महिनोंमहिने फ्रेश लिंबू साठवून ठेवू शकता. (The right way to store lemons to keep them fresh for longer) कारण लिंबू कधी जास्तच महाग मिळतात तर कधी स्वस्त. लिंबू एकदाच आणून जास्त दिवस टिकवण्याची ही पद्धत तुमच्यासाठी उत्तम ठरेल. (How to store lemon)
लिंबू टिकवून ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स (How to Store and Keep Lemons Fresh For Long Time)
१) सगळ्यात आधी एका काचेच्या बरणीत सर्व लिंबू भरा. त्यात पाणी आणि व्हाईट व्हिनेगर घाला आणि ही बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या. या उपायानं लिंबू दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल.
२) एका बरणीत टिश्यू पेपर ठेवून बरणीला आतल्या बाजूनं तेल लावून घ्या. नंतर लिंबांना तेल लावून भरणीत भरून हे लिंबू फ्रिजमध्ये ठेवा. या ट्रिक्सने ३ ते ४ महिने लिंबू खराब होणार नाहीत.
३) लिंबू साठवण्यासाठी प्लास्टिकचा हवाबंद डबा घ्या. त्यात पाणी घालून लिंबू साठवा. लिंबू साठवण्याची ही पद्धत लिंबू महिनाभर रसदार ठेवेल.
३) एकाच वेळी भरपूर लिंबू विकत घेतले असतील आणि नंतर त्यांचे काय करावे हे समजत नसेल तर तुम्ही फ्रिजमध्ये साठवून ठेवू शकता. यासाठी झिप लॉक बॅग वापरा. यासाठी लिंबू एका पिशवीत टाकून फ्रीजरमध्ये ठेवा आणि पिशवीत एक लहान छिद्र करा जेणेकरून थेट हवा लिंबावर पडणार नाही, पण हवेचा प्रवाह कायम राहील. अशा प्रकारे, लिंबू बरेच दिवस ताजे राहतील आणि जर तुम्हाला ते वापरायचे असतील तर प्रथम फ्रीझरमधून बाहेर काढा आणि बाहेर थोडा वेळ मऊ होण्यासाठी ठेवा आणि नंतर वापरा.
४) घरी वापरात नसलेले कागद असतील तर त्याचे लहान तुकडे करा आणि या तुकड्यांमध्ये लिंबू बंद करून हवाबंद कंटेनर भरा. आता लिंबू धुवून वाळवा आणि या कागदानं बंद करून कंटेनर बंद करा आणि फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे लिंबाची साल ना सडते ना काळी पडते.